The Magic of Thinking Big (Marathi)
Rate it:
Kindle Notes & Highlights
Read between June 8 - August 4, 2024
1%
Flag icon
एखाद्याच्या मेंदूच्या नव्हे, तर त्याच्या विचारांच्या आकारावर त्याचं यश ठरत असतं,
2%
Flag icon
‘जास्त काळ लहान राहण्यात घालवण्याएवढं आपलं आयुष्य मोठं नाही.’
4%
Flag icon
ज्या माणसाला आपण एखादी गोष्ट करू शकतो असा विश्वास असतो, त्याला ती गोष्ट करणं जमतंच.
5%
Flag icon
तुम्हाला यश मिळणारच, असा ठाम विश्वास मनात बाळगा, यश तुमचंच आहे.
5%
Flag icon
‘ठीक आहे, मी प्रयत्न करून बघतो, पण मला नाही वाटत हे होईल’, ही मनोभूमिका अपयशाला जन्म देते.
6%
Flag icon
शेवटी, यशासाठी पुढाकार घेणं हा गुण आवश्यक आहे
7%
Flag icon
स्वतःवर विश्वास ठेवा, चांगल्या गोष्टी घडायला आपोआप सुरुवात होईल.
11%
Flag icon
तुमच्या बुद्धिमत्तेच्या प्रखरतेपेक्षा तिला दिशा देणारे तुमचे विचार अधिक महत्त्वाचे आहेत.
12%
Flag icon
१२० बुद्ध्यांक, पण नकारात्मक, निराशावादी आणि असहकार्यपूर्ण माणसापेक्षा सकारात्मक, आशावादी आणि सहकार्याची मनोभूमिका असेल, तर १०० बुद्धयांक असलेला माणूस जास्त पैसा, मान आणि यश साध्य करेल.
12%
Flag icon
(त्यांना जबाबदारी अंगावर घेण्याची भीती वाटते). ते अविवाहीत राहिले (अनेक विवाहांचा शेवट घटस्फोटातच होतो असं त्यांना वाटतं). त्यांना मित्र फारसे नाहीत (लोकांचा त्यांना कंटाळा येतो).
17%
Flag icon
प्रत्यक्ष कृतीनं भय नाहीसं होतं, द्विधा मनःस्थिती, चालढकल या गोष्टी भीतीला उलट खतपाणीच घालतात.
19%
Flag icon
अयशस्वी लोक एका अर्थी या गोष्टी मनाला लावून घेत असतात. अप्रिय प्रसंग ते मनात सारखे घोळवत राहतात आणि त्यांना आपल्या स्मरणशक्तीत मोक्याची जागा बहाल करतात.
21%
Flag icon
खरंतर मुळात तो एक सज्जन मनुष्य असेल. बहुतेक माणसं सज्जनच असतात.
21%
Flag icon
पुढच्या वेळी कुणी तुमच्याशी भांडण करायला सुरुवात केली, तर ही दोन छोटी वाक्यं लक्षात ठेवा. तुमचा राग आवरा. अशा प्रसंगी समोरच्या व्यक्तीला त्याची वाफ पूर्णपणे बाहेर काढू दया, आणि मग ते सगळं विसरून जा. ते अधिक श्रेयस्कर होईल.
23%
Flag icon
कृती ही भावनांची नांदी असते, हे लक्षात ठेवा.
23%
Flag icon
१. नेहमी पुढच्या रांगेतच बसा.
23%
Flag icon
२. दृष्टीला दृष्टी भिडवण्याचा सराव करा.
23%
Flag icon
३. तुमच्या चालण्याची गती साधारणपणे २५ टक्क्यांनी वाढवा.
24%
Flag icon
४. संभाषणांत भाग घेण्याचा सराव करा.
24%
Flag icon
तुम्ही हजर असलेल्या प्रत्येक व्यावसायिक परिषद, समिती बैठक आणि सामाजिक व्यासपीठावर उत्स्फूर्तपणे काहीतरी बोला. याला अपवाद करू नका. एखादा शेरा मारा, एखादी सूचना मांडा, एखादा प्रश्न विचारा. आणि हो, सगळ्यांत शेवटी बोलू नका. बोलणारा पहिला माणूस ठरण्याचा प्रयत्न करा.
24%
Flag icon
५. मोठ्ठं स्मित करायला शिका.
26%
Flag icon
भव्य विचार करणारे लोक, त्यांच्या स्वतःच्या आणि इतरांच्याही मनात सकारात्मक, पुरोगामी आणि आशादायक चित्रं निर्माण करण्यात निष्णात असतात.
26%
Flag icon
तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी मोठ्या, सकारात्मक आणि आनंददर्शक शब्द व वाक्प्रचारांचा वापर करा. कुणी तुम्हाला विचारलं, ‘काय, कसं काय वाटतंय?’
26%
Flag icon
इतर लोकांबद्दल बोलताना चांगल्या, आनंददर्शक आणि अनुकूल शब्द व वाक्प्रचारांचा वापर करा.
26%
Flag icon
इतरांना प्रोत्साहन देण्याकरता सकारात्मक भाषेचा प्रयोग करा. संधी मिळताच लोकांचं व्यक्तिगतरित्या कौतुक करा.
26%
Flag icon
आपली योजना सहकाऱ्यांना समजावून सांगताना सकारात्मक शब्द वापरा. ‘एक चांगली बातमी आहे. आपल्याला एक छान संधी चालून आली आहे’
27%
Flag icon
तात्पर्य : कुठल्याही गोष्टीकडे, ती सध्या कशी आहे यापेक्षा, कशी असू शकते याकडे बघा. कल्पनाशक्ती कुठल्याही गोष्टीचं मूल्य वाढवते. भव्य विचार करणारा मनुष्य, भविष्यात काय करता येईल याचं कल्पनाचित्र नहेमी रंगवत असतो. तो वर्तमानात अडकून पडत नाही.
29%
Flag icon
‘मी माझं काम करतोय् ना, मग पुरे!’ ही मानसिकता लघु आणि नकारात्मक विचार करण्याची आहे. भव्य विचार करणारे स्वतःला सांघिक प्रयत्नांतले भागीदार समजतात, ते व्यक्तिगतरित्या नव्हे, संघाबरोबरच यशस्वी किंवा अयशस्वी होतात.
30%
Flag icon
तो ज्या विषयावर बोलणार आहे, त्या विषयाचं उत्तम ज्ञान आणि ते ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याची तीव्र इच्छा.
30%
Flag icon
शेकडा किमान ९९ वेळा, भांडणांची सुरुवात छोट्या, किरकोळ कारणामुळे होत असते. कुणी महाशय अंमल थकून, भागून आणि किंचित चिडचिडं होऊन घरी येतात. आजचं जेवण त्यांना फारसं आवडत नाही, म्हणून ते नाक मुरडून त्याबद्दल तक्रार करतात.
30%
Flag icon
तक्रार करण्यापूर्वी किंवा समोरच्या व्यक्तीवर दोषारोप करण्यापूर्वी, तिच्यावर ठपका ठेवण्यापूर्वी किंवा स्वतःच्या बचावासाठी प्रतिहल्ला चढवण्यापूर्वी, स्वतःला एक प्रश्न विचारा, ‘ही गोष्ट एवढी महत्त्वाची आहे का?’
30%
Flag icon
‘क’ ला ती छोटी केबिन मिळाली. या गोष्टीमुळे ‘क’चा अभिमान दुखावला. तेवढ्यावरून आपल्याबाबतीत भेदभाव केला गेला असल्याचं त्याला वाटायला लागलं. नकारात्मक विचार, नापसंती, कडवटपणा, मत्सर या सगळ्या गोष्टी हळूहळू त्याच्यात वाढत गेल्या. आपण कमी पडतो आहोत असं त्याला वाटायला लागलं, या सगळ्याचा परिणाम म्हणजे, ‘क’ त्याच्याबरोबरच्या इतर अधिकाऱ्यांशी शत्रुत्वानं वागायला लागला. त्यांच्याशी सहकार्य करण्याऐवजी तो त्यांच्या पूर्णपणे विरोधात जायला लागला.
31%
Flag icon
१. तुमची दृष्टी उच्च ध्येयावर ठेवा.
31%
Flag icon
विवाहसंबंधांत, शांती, आनंद व समाधान मिळवणं, हे उच्च ध्येय आहे. भांडणात विजय मिळवणं नाही.
31%
Flag icon
२. ही गोष्ट खरोखर महत्त्वाची आहे का? असा प्रश्न स्वत:ला विचार.
31%
Flag icon
३. क्षुल्लक गोष्टींच्या जाळयात सापडू नका.
32%
Flag icon
१. स्वत:बद्दल हीन बोलू नका. स्वत:चं अवमूल्यन करणाच्या वाईट सवयीवर मात करा.
32%
Flag icon
२. भव्य विचार करणाऱ्या लोकांची भाषा बोला. मोठे, चमकदार, आनंददर्शक शब्द वापरा.
32%
Flag icon
३. आपल्या दृष्टीचा पल्ला वाढवा. आत्ता काय आहे तेवढंच बघू नका, भविष्यात काय होऊ शकेल, याकडे दृष्टी ठेवा.
32%
Flag icon
४. तुमच्या कामाबद्दल सर्वसमावेशक दृष्टी मिळवा. तुमचं आताचं काम महत्वाचं आहे, असा मनापासून विचार करा.
32%
Flag icon
५. क्षुल्लक गोष्टींचा विचार सोडून द्या.
34%
Flag icon
परंपरागत विचार तुमच्या मनाला गोठवून टाकतात, तुमच्या विकासात खीळ घालतात आणि आपली सृजनशक्ती विकसित करण्यापासून तुम्हाला रोखतात.
34%
Flag icon
१. नव्या कल्पनांचं स्वागत करण्याची सवय लावून घ्या. त्या स्वीकारण्याची तयारी ठेवा.
34%
Flag icon
२. प्रयोगशील बना.
35%
Flag icon
३. प्रगतीची कास धरा, अधोगतीची नाही,
35%
Flag icon
‘कुठल्याही व्यवसायाला सुरुवात करताना त्याबद्दल तुम्हाला किती माहिती आहे, हे तेवढंसं महत्त्वाचं नाही. एकदा सुरुवात केल्यावर तुम्ही काय शिकता आणि अमलात आणता, हे खूप महत्त्वाचं आहे.
36%
Flag icon
क्षमता, ही मनाची एक अवस्था आहे.
36%
Flag icon
तुम्ही अधिक काही करू शकता असा विश्वास जर तुमच्यात निर्माण झाला, तर तुमचं मन सृजनात्मकरित्या विचार करायला लागतं आणि तुम्हाला मार्गदर्शन करतं.
37%
Flag icon
१. अधिक काम करण्याची संधी दोन्ही हातांनी स्वीकारा नवी जबाबदारी घेण्यास सांगितलं जाणं ही कौतुकाचीच गोष्ट आहे.
37%
Flag icon
२. अधिक जबाबदारी स्वीकारल्यानंतर मी अधिक काम कसं करू शकेन? यावर लक्ष केंद्रित करा. त्यानं तुम्हाला तुमच्या सध्याच्या कामाचं अधिक चांगलं आणि नेटकं नियोजन व पुनर्रचना करणं, तुमच्या दैनंदिन कामकाजाला लागणाऱ्या वेळ व श्रमात हुशारीनं काटछाट करणं, अनावश्यक गोष्टींना फाटा देणं, यासारखी सृजनात्मक उत्तरं मिळतील.
« Prev 1 3 4