More on this book
Community
Kindle Notes & Highlights
दुसरी गोष्ट म्हणजे, माझ्या जीवनात मला काय साध्य करायचं आहे? मला कोण व्हावसं वाटतं आहे? आणि मला कशामुळे समाधान मिळेल? या प्रश्नांची स्पष्ट आणि नेमकी उत्तरं शोधा.
१० वर्षांचं नियोजन करण्यासाठीची मार्गदर्शक पुस्तिका
तुम्ही जेव्हा तुमच्या भविष्याचं चित्र उभं कराल, तेव्हा आपण आकाशाएवढे भव्य असल्याची कल्पना करायला लाजू नका.
‘हाती घेतलेल्या कार्यानं व्यक्तीला पूर्णपणे झपाटून टाकल्याखेरीज, कुठलीही व्यक्ती काही खास कार्य करते आहे असं म्हणता येत नाही.’
आपल्याला खरोखर काय करायचं आहे, याबद्दल आपण सगळेच स्वप्नं पाहत असतो. पण या इच्छेनुसार वागणारे लोक थोडेच असतात. आपल्या तीव्र इच्छेला शरण जाण्याऐवजी आपण तिचा खून करतो.
१. स्व-अवमूल्यन.
२. सुरक्षिततारोग
३. स्पर्धा.
४. पालकांचा शब्द.
५. कौटुंबिक जबाबदारी.
पूर्ण सामर्थ्य, पुढे जाण्यासाठीची संपूर्ण शक्ती मिळवण्याचा एकच मार्ग आहे, तुम्हाला जे करण्याची इच्छा आहे, ते काम करणं, हे लक्षात ठेवा.
काहीतरी साध्य करायचं असेल, तर ते काहीतरी साध्य करण्याविषयीची योजना आपण तयार करायला हवी.
इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा, प्रखर ध्येयं माणसाला जिवंत ठेवत असतात.
पुढचं पान नाही, पुढचं प्रकरण तर नाहीच नाही, फक्त पुढच्या परिच्छेदाचाच विचार मनात ठेवण्याचा प्रयत्न मी केला. अशा पद्धतीनं सहा संपूर्ण महिने, मी फक्त एक एक परिच्छेद लिहिण्याचं काम केलं बस्! दुसरं काहीही मी केलं नाही. माझं पुस्तक ‘आपोआपच’ तयार झालं.’
नव्या सकारात्मक सवयी विकसित करणं आणि जुन्या नकारात्मक सवयी नष्ट करणं, ही एक रोज थोडी थोडी होणारी प्रक्रिया आहे.
पण स्वतःमध्ये केलेली गुतंवणूक, आपल्या मनाची शक्ती आणि क्षमता वाढवणाऱ्या गोष्टींवर पैसे खर्च करणं, ही सर्वाधिक फायद्याची गुंतवणूक असते.
‘उद्योगांना ज्ञान आणि कार्यक्षमतेमध्ये रस असतो, पदवीमध्ये नाही.’
या प्रकरणाचा थोडक्यात आढावा घेताना, यशप्राप्तीची खालील तत्त्वं उपयोगात आणा : १. तुम्हाला जीवनात कुठे पोहोचायचं आहे, हे पक्कं ठरवा. आजपासून दहा वर्षीनंतरची तुमची प्रतिमा तयार करा. २. येत्या दहा वर्षांची तुमची योजना लिहून काढा. तुमचं जीवन मौल्यवान आहे. शक्यता आणि संभाव्यतेवर ते सोडून देऊ नका. तुम्हाला तुमच्या काम, कुटुंब आणि सामाजिक जीवनाच्या विभागात काय साध्य करायचं आहे, हे लिहून काढा. ३. तुमच्या मनातल्या तीव्र इच्छांना शरण जा. अधिक ऊर्जा मिळवण्यासाठी ध्येयं निश्चित करा. प्रत्येक गोष्ट साध्य करण्यासाठी एक ध्येय ठरवा. ध्येयं ठरवण्यामधून जाण्यातला खरा आनंद मिळवा. ४. तुमच्या मुख्य ध्येयाच्या हाती
...more
नेतृत्वाबद्दलचे हे चार नियम वा तत्त्वं म्हणजे : १. तुम्हाला ज्या लोकांवर आपला प्रभाव पाडायचा आहे, त्यांच्या पद्धतीनं विचार करा. २. एखादी परिस्थिती हाताळण्याचा मानवतावादी मार्ग कोणता आहे, याबद्दल विचार करा. ३. प्रगतीचा विचार करा, प्रगतीवर श्रद्धा ठेवा, प्रगतीचा आग्रह धरा. ४. स्वतःच स्वतःशी विचार-विनिमय करण्यासाठी वेळ काढा.
नेतृत्वनियम क्र. २ : एखादी परिस्थिती हाताळण्याचा मानवतावादी मार्ग कोणता आहे, याबद्दल विचार करा.
प्रथम मी त्यांच्याशी खाजगीत बोलतो. दुसरं म्हणजे, जी गोष्ट ते चांगली करतात, त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो. तिसरं, याक्षणी जी एक गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीनं करणं त्यांना शक्य आहे, ती त्यांच्या लक्षात आणून देतो आणि सुधारणेचा मार्ग शोधण्यात मी त्यांना मदत करतो. चौथं त्यांच्यातल्या चांगल्या गोष्टीचं मी पुन्हा एकदा कौतुक करतो.
लोकांना त्यांच्या चुका सुधारण्यामध्ये मदत करण्यासाठीचं, माझ्या मित्रानं तयार केलेलं सूत्र लक्षात ठेवा. उपहास करणं टाळा. दोषारोप करणं टाळा. लोकांना कमीपणा देणं टाळा. लोकांना त्यांची जागा दाखवून देणं टाळा. ‘लोकांशी वागण्याचा मानवतावादी मार्ग कोणता आहे?’
वेळ येताच तुमच्या हाताखालच्या लोकांची वैय्यक्तिक प्रशंसा करा. त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांचं कौतुक करा. जेव्हा जेव्हा ते जास्त काम करतील, तेव्हा तेव्हा त्यांची प्रशंसा करा. प्रशंसा ही तुम्ही लोकांना देऊ शकत असलेली एक महान प्रेरक गोष्ट आहे आणि त्यासाठी तुम्हाला कुठलीच तोशीस लागत नाही. शिवाय, तुमच्या हाताखालचे लोक कधीतरी अपेक्षा नसताना तुमच्या बचावासाठी, सहाय्यासाठी धावत येऊन तुमच्यावर उपकार करू शकतात.
नेतृत्वनियम क्र. ३ : प्रगतीचा विचार करा, प्रगतीवर श्रद्धा ठेवा, प्रगतीचा आग्रह धरा.
नेतेमंडळींच्या खास गटात सामील व्हा. प्रगतीची दृष्टी मिळवा.
प्रगतिशील दृष्टिकोन विकसित करण्यासाठी तुम्ही दोन विशिष्ट गोष्टी करू शकता : १. तुम्ही करत असलेल्या कुठल्याही गोष्टीत सुधारणा करण्याचा विचार करा. २. तुम्ही करत असलेल्या कुठल्याही गोष्टीत उच्च दर्जा आणण्याचा विचार करा.
माझे विचार प्रगतिशील आहेत का? चाचणी प्रश्न अ. माझ्या कामासंबंधी माझे विचार प्रगतिशील आहेत का? १. ‘मी माझं काम अधिक चांगल्या पद्धतीनं कसं करू शकेन?’ या मनोभूमिकेतून मी माझ्या कामाचं मूल्यमापन करतो का? २. संधी मिळेल तेव्हा मी माझी कंपनी, माझ्या कंपनीतले लोक आणि माझ्या कंपनीची उत्पादनं, यांच्याबद्दल चांगलं आणि प्रशंसापर बोलतो का? ३. माझ्या स्वतःच्या कामाचा दर्जा आणि प्रमाण, ३ किंवा ६ महिन्यांपूर्वी होते त्यापेक्षा अधिक उच्च आहे का? ४. मी ज्यांच्याबरोबर काम करतो, त्या माझ्या सहकारी, कनिष्ठ आणि इतर लोकांपुढे मी उत्तम उदाहरण ठेवतो आहे का? ब. माझ्या कुटुंबाबद्दल माझे विचार प्रगतिशील आहेत का? १. ३
...more
ड. माझ्या सामाजिक गटाबद्दल माझे विचार प्रगतिशील आहेत का? १. माझ्या सामाजिक गटात (राहती सोसायटी, शाळा, मंडळ इ.) ज्यामुळे काहीएक सुधारणा झाली आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं, असं काहीतरी मी गेल्या सहा महिन्यांत केलं आहे का? २. माझ्या सामाजिक गटाशी संबंधित चांगल्या प्रकल्पांना मी उत्तेजन देतो, त्यांना विरोध करतो, त्यांच्यावर टीका करतो की त्याबद्दल तक्रारीचा सूर लावतो? ३. माझ्या समाजगटात काही चांगल्या सुधारणा घडवून आणण्यामध्ये मी कधी पुढाकार घेतला आहे का? ४. माझे शेजारी किंवा इतर लोकांबद्दल मी चांगलै बोलतो का?
नेतृत्वनियम क्र. ४ : स्वतःच स्वतःशी विचार विनिमय करण्यासाठी वेळ काढा आणि तुमच्यातल्या सर्वश्रेष्ठ दर्...
This highlight has been truncated due to consecutive passage length restrictions.
मुद्दा असा, की कुठल्याही क्षेत्रातील यशस्वी व्यक्ती त्याच्या किंवा तिच्या स्वतःशी विचार करण्यासाठी वेळ काढत असते.
सुनियोजित एकांतात घेतलेले निर्णय आणि केलेली निरक्षिणं १०० टक्के अचूक असतात, ही
नेत्याचं मुख्य कार्य म्हणजे विचार करणं, हे लक्षात ठेवा. आणि विचार करणं, हीच नेतृत्वपदाची सर्वोत्तम पूर्वतयारी होय. सुनियोजित पद्धतीच्या एकांतात रोज थोडा वेळ घालवा आणि स्वतःच्या विचारातून यशाकडे प्रवास करा.
ही मार्गदर्शकं खेळायच्या पत्यांसारख्या छोट्या, पुठ्ठ्यांच्या कार्डांवर लिहून काढलति, तर तुमच्या ती कायम बरोबर आणि हाताशी राहू शकतील.
अ. खुजे, लहान लोक जेव्हा तुम्हाला खाली खेचू पाहत असतील, तेव्हा भव्य विचार करा.
लहान लोकांशी संघर्ष करण्यास नकार दिल्यास तुम्ही विजयी होत असता.
ब. ‘आपल्यात हे करण्याची क्षमता वा पात्रता नाही किंवा आपण हे करू शकणार नाही किंवा आपल्याला हे जमणार नाही’ असं जेव्हा वाटायला लागेल, तेव्हा भव्य विचार करा.
स्वतःबद्दल चांगलं न बोलण्याची नैसर्गिक ऊर्मी नष्ट करा. त्यासाठी खालील साधनं तुमच्या उपयोगी पडतील. १. महत्त्वाचे दिसा.
२. तुमच्या जमेच्या बाजूंवर लक्ष केंद्रित करा.
३. इतर लोकांना योग्य परिमाणामध्येच बसवा. समोरची व्यक्ती तुमच्याप्रमाणेच एक माणूसच आहे. तिला भिण्याचं काहीच कारण नाही.
क. वादा-वादी किंवा भांडण अपरिहार्य वाटेल, तेव्हा भव्य विचार करा.
१. ‘वाद घालत बसण्याएवढी महत्त्वाची, ही गोष्ट खरोखरच आहे का?’ असं स्वतःला विचारा. २. वादावादीमधून काही मिळत तर नाहीच, उलट असलेलं काहीतरी गमावतं, याची आठवण स्वतःला करून द्या.
ड. आपला पराभव झाला आहे, असा विचार मनात येईल, तेव्हा भव्य विचार करा.
माघार व पीछेहाट होण्याच्या प्रसंगाला तोंड देताना यशस्वी लोक : १. या अपयशाला एक धडा मानतात. त्यापासून योग्य तो बोध घेतात. त्याबद्दल अधिक माहिती मिळवतात आणि पुढे मुसंडी मारण्यासाठी त्याचा उपयोग करतात. प्रत्येक अपयशातून ते काहीतरी मिळवू पाहतात. २. अनुभवाला चिकाटीची जोड देतात. अपयश आल्यास दोन पावलं मागे येऊन पुन्हा नव्यानं सुरुवात करतात.
ई. प्रेमात अपयश यायला लागेल, तेव्हा भव्य विचार करा नकारात्मक, खुजेपणाची आणि ‘तो (किंवा ती) माझ्याशी अन्याय्य वागल्यामुळे मी या गोष्टीचा बदला घेईन’ अशा प्रकारची विचारपद्धती प्रेमाचा गळा घोटणारी आणि तुम्हाला मिळू शकणारी आपुलकी, नष्ट करणारी असते. प्रेम वा प्रणयाच्या बाबतीत मामला बिघडायला लागला, तर: १. तुम्हाला ज्या व्यक्तीचं प्रेम हवं आहे, त्या व्यक्तीच्या सगळ्यात मोठ्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करा. लहान-सहान गोष्टी त्यांच्या योग्य जागी, म्हणजेच, दुय्यम स्थानी ठेवा. २. तुमच्या जोडीदारासाठी विशेष काहीतरी करा. आणि सारखं करतच राहा.
फ. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रगतीचा वेग मंदावतो आहे असं वाटेल तेव्हा भव्य विचार करा.
तुम्हाला अधिक प्रतिष्ठा आणि अधिक पैसा फक्त एकाच गोष्टीमुळे मिळू शकतो : तुमच्या कामाचा दर्जा आणि संख्या वाढवणं.