The Magic of Thinking Big (Marathi)
Rate it:
Kindle Notes & Highlights
Read between June 8 - August 4, 2024
37%
Flag icon
व्यक्तिगत पातळीवर, एखादं काम तुम्हाला करून हवं असेल, तर ते एखाद्या व्यस्त माणसाकडे सोपवा,
37%
Flag icon
मोठी माणसं जास्त ऐकतात. छोटी माणसं जास्त बोलतात.
39%
Flag icon
‘मला चांगला नफा मिळाला याचं कारण म्हणजे, इतर बुद्धिमान लोकांचे विचार मी ऐकले. माझ्या व्यवसायाशी काडीमात्र संबंध नसलेल्या लोकांच्या गटाबरोबर जेवण्याचं ते आमंत्रण जर मी नाकारलं असतं, तर पैसे कमावण्याची ही यशस्वी योजना माझ्या डोक्यात कधीच आली नसती.’
39%
Flag icon
प्रथम म्हणजे, तुमच्या व्यवसायातल्या एका तरी व्यावसायिक संस्थेचे सभासद व्हा आणि त्यांच्या कार्यक्रमात नियमितपणे भाग घ्या
39%
Flag icon
दुसरं म्हणजे, तुमच्या व्यवसायाव्यतिरिक्त एका तरी व्यावसायिक संस्थेचे सभासद व्हा आणि त्यांच्या कार्यक्रमात नियमितपणे भाग घ्या:
39%
Flag icon
१. कल्पनांना हातून निसटून जाऊ देऊ नका. त्या लिहून ठेवा. लगेच लिहून न ठेवल्यामुळे, रोज अनेक चांगल्या कल्पना जन्मल्या-जन्मल्या लगेच मृत्यूही पावतात.
40%
Flag icon
२. तुमच्या कल्पनांचा फेरआढावा घ्या.
40%
Flag icon
३. तुमच्या कल्पनेला जोपासा, तिला खत-पाणी घाला. तिला वाढवा.
40%
Flag icon
तुमच्या कल्पना विकल्या जाऊ शकतील, अशा स्वरूपात मांडायचा निश्चय करा. लिखित किंवा चित्रं व आकृत्यांच्या स्वरूपात मांडलेली कल्पना, फक्त मौखिक रूपात मांडलेल्या कल्पनेपेक्षा अधिक पटकन् स्वीकारली जाऊ शकते.
41%
Flag icon
तुम्ही कसा विचार करता, यावरून तुमचं वर्तन ठरत असतं. तद्वतच्, तुम्ही कसे वागता यावरून, इतर लोक तुमच्याशी कसे वागतात, हे ठरत असतं. हे यामागचं सूत्र आहे, तर्कशास्त्र आहे.
41%
Flag icon
‘योग्य कपडे परिधान करा! तसं न करणं तुम्हाला परवडणार नाही!’
42%
Flag icon
दिसण्याच्या दृष्टीनं दर्जा महत्त्वाचा, संख्या नाही.
43%
Flag icon
माणसाचे त्याच्या कामाबद्दलचे विचार, त्याच्या स्वतःबद्दल आणि अधिक मोठ्या जबाबदाऱ्या पेलण्याच्या त्याच्या क्षमतेबद्दल खूप काही सांगून जातात.
44%
Flag icon
उत्साही विचार करा. तुमच्यामध्ये आशावाद आणि प्रगतिशील विचारांची आभा आणा,
45%
Flag icon
१. तुमच्या कामाबद्दल नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगा, जेणेकरून तुमची कनिष्ठ मंडळी योग्य विचार करू लागतील. २. रोज काम सुरू करताना, माझी प्रत्येक गोष्ट अनुकरणीय आहे का? माझ्या सवयी माझ्या हाताखालच्या लोकांनी उचललेल्या पाहायला मला आवडतील अशा आहेत का? असं स्वतःला विचारा.
45%
Flag icon
फोन करण्यापूर्वी मनांतल्या मनांत, मी उच्च कोटीचा विक्रेता आहे आणि मी यश मिळवणारच आहे, याची आठवण मी स्वतःला करून देतो आणि मग फोन करतो.’
46%
Flag icon
तुमच्या विचारांची पातळी वाढवा. महत्त्वाच्या व्यक्ती ज्याप्रमाणे विचार करतात, त्याप्रमाणे विचार करायला लागा.
47%
Flag icon
जीवनात प्रत्येक परिस्थितीमध्ये, एखादा महत्त्वाचा माणूस अशा पद्धतीनं वागतो का? असा प्रश्न स्वतःला विचारा आणि मग या प्रश्नाच्या उत्तराप्रमाणे वागा.
47%
Flag icon
आजपासून एक, पाच, दहा, वीस वर्षांनी तुम्ही काय असाल, हे संपूर्णपणे तुमच्या भावी वातावरणावर अवलंबून आहे,
48%
Flag icon
मोठी माणसं, मोठ्या कल्पनांना हसत नसतात. आता समजा, मी एक मोठ्ठा बंगला घेणार आहे, असं तुम्ही सर्वसामान्य माणसांसमोर बोललात, तर ते लोक तुम्हाला हसतील, कारण त्यांना ते अशक्य वाटतं.
49%
Flag icon
तुमची संगत कशी आहे, यावरून तुमचं मूल्यमापन केलं जात असतंच, पक्षी आपल्या सजातीयांबरोबरच उडत असतात, हे अगदी खरं आहे.
50%
Flag icon
योग्य माणसाचाच सल्ला घेण्याचा नियम स्वत:ला घालून घ्या.
51%
Flag icon
१. नव्या नव्या गटांमध्ये वावरा.
51%
Flag icon
२. तुमच्यापेक्षा वेगळी मतं असलेले मित्र-मैत्रिणी आवर्जून निवडा.
52%
Flag icon
३. क्षुल्लक आणि बिनमहत्त्वाच्या गोष्टींमध्ये अडकून न बसणारे मित्र जरूर निवडा.
52%
Flag icon
एक खूप जहाल विषाचा प्रकारही आहे, विचार-विष किंवा सामान्य भाषेत ‘उणं-दुणं काढणं,’
52%
Flag icon
मोठाल्या बाता मारणं, दिखाऊ बोलणं आणि वाद-विवाद काहीवेळा आवश्यक असतात. ह्या गोष्टी विधायक असतील, तर त्या उपयोगी ठरतात. फालतू गप्पा मारण्याकडे तुमचा कल आहे का, हे तपासून बघण्यासाठी खालील चाचणी करून पाहा.   १. मी इतर लोकांबद्दल कंड्या पिकवतो का? २. इतरांबद्दल मी नेहमी चांगलंच बोलतो का? ३. एखाद्या भानगडीविषयी ऐकायला मला आवडतं का? ४. इतरांबद्दल मत बनवताना मी सत्याचा आधार घेतो का? ५. अफवा घेऊन माझ्याकडे येण्यासाठी मी इतरांना प्रोत्साहन देतो का?
53%
Flag icon
दीर्घ पल्ल्याचा विचार करता, उच्च दर्जाच्या गोष्टींना पडणारी किंमत दुय्यम दर्जाच्या गोष्टींपेक्षा कमीच ठरते, हे मात्र नक्की. त्याशिवाय, मोजक्या पण उत्तम प्रकारच्या गोष्टी असणं, हे भरपूर प्रमाणात, पण हलक्या दर्जाच्या गोष्टी असण्यापेक्षा केव्हाही चांगलंच.
53%
Flag icon
आपण काय विचार करतो आहोत, हे आपल्या कृतींमधून दिसून येतं.
55%
Flag icon
१. अधिक खोलवर शिरा.
55%
Flag icon
उत्साह निर्माण होण्यासाठी, तुम्हाला रस नसलेल्या गोष्टीबद्दल अधिक माहिती मिळवा.
56%
Flag icon
२. जे काही कराल, त्यात जान आणा.
56%
Flag icon
३. चांगली बातमी शक्य तितक्या लोकांना सांगा
57%
Flag icon
‘मला चांगलं काहीतरी सांगा अन्यथा काहीच सांगू नका.’
58%
Flag icon
लोकांना महत्त्व दिल्यास ते तुमच्यासाठी अधिक काहीतरी करत असतात.
58%
Flag icon
इतरांना मोठेपणाची भावना देण्यामधून तुम्ही स्वत:लाही मोठं वाटायला लावत असता.
58%
Flag icon
यश मिळवण्याकरता, आपण महत्त्वाचे आहोत असं वाटणं आवश्यकच आहे. इतरांना महत्त्व वाटायला लावण्यानं तुम्हाला फायदा होतो, कारण त्यामुळे तुम्हला स्वत:लाही आपलं महत्त्व अधिक जाणवतं. याचा प्रयोग करून पाहा.
58%
Flag icon
१. कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय लावून घ्या.
59%
Flag icon
२. लोकांना त्यांचं नाव घेऊन बोलवा.
59%
Flag icon
आणखी एक विशेष सूचना : तुमची नीट ओळख नसलेल्या व्यक्तीशी बोलताना श्री., श्रीमती, सौ., साहेब अशी बिरुदं आवर्जून लावा. ऑफिसमधल्या चपराशालासुद्धा अमुक साहेब, असं म्हटलेलं जास्त आवडत असतं. तसंच तुमच्या कनिष्ठ सहाय्यकाचंही असतं आणि प्रत्येक पातळीवरच्या लोकांचंही असतं.
59%
Flag icon
३. श्रेय लाटू नका, वाटा.
59%
Flag icon
प्रशंसा म्हणजे शक्ती, हे लक्षात ठेवा. तुमच्या वरिष्ठांकडून मिळणाऱ्या शाबासकीची, कौतुकाची गुंतवणूक करा. ते कौतुक, ती प्रशंसा आपल्या हाताखालच्या लोकांना वाटून टाका,
59%
Flag icon
‘माझी बायको आणि माझ्या कुटुंबाला आनंदी करण्यासाठी मी आज काय करू शकतो?’ असा प्रश्न अगदी रोज स्वतःला विचारा.
60%
Flag icon
तुमच्या कुटुंबियांसाठी सतत काहीतरी वेगळं करत राहा. त्यासाठी खूप खर्च करण्याची अजिबात गरज नाही. त्यामागचा विचार महत्त्वाचा आहे. तुम्ही त्यांच्याबद्दल प्राधान्यानं विचार केलात, एवढीच गोष्ट महत्त्वाची आहे.
60%
Flag icon
पैसा कमवायचा आहे? मग आधी-सेवा ही मनोभूमिका निर्माण करा.
62%
Flag icon
लोकांना जेवढी अपेक्षा असेल, त्यापेक्षा नेहमी जास्त काहीतरी द्या.
62%
Flag icon
यश हे इतर लोकांच्या पाठिंब्यावर अवलंबून असतं.
62%
Flag icon
लोकांबद्दल नेहमी चांगलंच बोला.
63%
Flag icon
दहापैकी नऊ लोकांच्या बाबतीत, आवडण्याजोगा हा घटक सगळ्यात आधी चर्चिला जातो. आणि तांत्रिक बाबींपेक्षा या आवडण्याजोगापणाला बहुतांश वेळा जास्त गुण दिले जातात.
63%
Flag icon
ते नियम असे : १. लोकांची नावं लक्षात ठेवण्यास शिका. या बाबतीत चुकारपणा केल्यास, तुम्हाला लोकांमध्ये फारसा रस नाही असे इतरांना वाटू शकेल. २. तुमच्या सहवासात कुणावर ताण येणार नाही अशी सुखद व्यक्ती बना. लोकांना आपल्या नित्य परिचयाचा वाटणारा माणूस बना. ३. शांतपणा आणि गडबडून न जाणं, हे गुण आत्मसात करा म्हणजे काहीही झालं तरी तुम्ही विचलित होणार नाही. ४. अहंभाव सोडून द्या. तुम्हाला सगळं काही कळतं, अशी तुमची प्रतिमा तयार होण्यापासून सावध राहा. ५. तुमच्या संगतीत लोकांना काहीतरी चांगलं मिळेल, अशी गुणसंपन्न व्यक्ती बना. ६. तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये असलेल्या ज्ञात-अज्ञात कंगोऱ्यांचा अभ्यास करा. ७. ...more