More on this book
Community
Kindle Notes & Highlights
मैत्री विकत घेता येत नसते.
मैत्री करण्यात पुढाकार घ्या– नेतृत्वपदावरच्या व्यक्ती असंच करतात.
तिथं हजर असलेल्या लोकांपैकी जो सगळ्यात महत्त्वाचा माणूस असेल, तोच सहसा सगळ्यांशी ओळखी करून घेण्यात आणि त्यांना आपला परिचय देण्यात मग्र असतो.
शोडासा पुढाकार घेण्यानं मित्र कसे जोडता येतात, याचे हे सहा मार्ग बघा : १. संधी मिळताच, इतरांना स्वतःचा परिचय करून द्या. पार्ट्या, बैठकी, प्रवासात, ऑफिसमध्ये असं कुठेही आपला परिचय करून देण्याची संधी सोडू नका. २. समोरच्या व्यक्तीला तुमचं नाव नीट ऐकू येईल, याची काळजी घ्या. ३. समोरची व्यक्ती स्वतःचं नाव ज्या पद्धतीनं उच्चारते, त्याच पद्धतीनं तुम्हीही ते उच्चारता की नाही, याची खात्री करून घ्या. ४. समोरच्या व्यक्तीचं नाव लिहून घ्या आणि ते योग्यप्रकारे लिहिलेलं असल्याची पुन्हा पुन्हा खात्री करून घ्या. आपलं नाव अचूकपणे लिहिलं जावं यावर लोकांचा कटाक्ष असतो. शक्य असेल तर त्या व्यक्तीचा पत्ता आणि फोन
...more
तीन सूचना दिल्या : १. कुणीही परिपूर्ण असू शकत नाही, हे समजून घ्या.
२. दुसऱ्या व्यक्तीला तुमच्यापेक्षा वेगळं असण्याचा पूर्ण अधिकार आहे, हे जाणा.
३. सुधारकाची भूमिका सोडून द्या. जगा आणि जगू द्या,
समोरच्या व्यक्तीनं आपल्या ‘स’ वरून ‘न’ वाहिनीकडे वळवणं टाळण्याचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे, ‘अरे हो मला तुला एक विचारायचं होतं...’ असं काहीतरी बोलून पटकन विषय बदलणं आणि दुसरा म्हणजे, ‘माफ कर मित्रा, पण मला एका ठिकाणी जायचंय आणि आधीच उशीर झालाय...’ असं बोलून तिथून सटकणं.
जास्त बोलणारी व्यक्ती सहसा यशस्वी नसते आणि यशस्वी व्यक्ती सहसा जास्त बोलत नसते, हे माझ्या स्वतःच्या शेकडो प्रयोगांमधून सिद्ध झालेलं आहे.
संभाषणातलं औदार्य, हा मित्र जोडण्याचा सर्वात साधा, सोपा आणि खात्रीचा मार्ग आहे.
संभाषणाच्या बाबतीत आपमतलबी होऊ नका. दुसऱ्यांचं बोलणं ऐका आणि त्याद्वारे मित्र जोडा आणि शिका.
तुम्हाला एखाद्या गोष्टीत अपयश आल्यावर तुम्ही कसल्या प्रकारचा विचार करता, यावरून तुम्हाला पुन्हा यश केव्हा मिळेल, हे ठरत असतं, लवकरच, की उशीरा!
१. तुम्हाला वर उचलून घेणं सोपं जाईल, असे ‘हलके’ व्हा. इतर लोकांना आवडण्याजोगे बना.
२. मैत्री जोडण्यामध्ये पुढाकार घ्या.
३. माणसा-माणसांमधील फरक आणि प्रत्येक व्यक्तीच्या मर्यादा स्वीकारा.
४. ‘स’ वाहिनीवरचेच कार्यक्रम ऐका.
५. तुमच्या संभाषणांमध्ये उदार भूमिका ठेवा.
६. नेहमी सौजन्यानंच वागा.
७. तुम्हाला काही वाईट अनुभव आला, तर त्याचं खापर दुसऱ्यांच्या माथ्यावर फोडू नका, त्यांना दोष देऊ नका. तुम्हाला एखाद्या गोष्टीत अपयश आल्यावर तुम्ही कसल्या प्रकारचा विचार करता, यावरून तुम्हाला पुन्हा यश लवकर मिळेल की उशीरा, हे ठरत असतं, हे लक्षात ठेवा.
उत्तम कल्पना जवळ असणं पुरेसं नाही. एखाद्या बऱ्यापैकी कल्पनेवर प्रत्यक्ष काम करून ती विकसित करणं, हे एखाद्या उत्कृष्ट कल्पनेचा पाठपुरावा न करता ती वाया घालवण्यापेक्षा १०० पटीनं अधिक चांगलं.
संपूर्णपणे योग्य परिस्थिती वा वातावरण निर्माण होण्याची वाट पाहणं म्हणजे आजन्म नुसती वाटच पाहत राहणं होय.
परिपूर्णतेच्या बाबतीत आपल्याला संमजस तडजोड करायलाच हवी, अन्यथा कृती करण्यासाठी आपल्याला अनंतकाळपर्यंत थांबावं लागेल. पूल समोर आल्यावरच तो ओलांडणं शहाणपणाचं असतं.
१. भविष्यात येऊ शकणारे अडथळे आणि अडचणी गृहीत धरायला शिका.
२. समस्या आणि अडचणी, जेव्हा तुमच्यासमोर येतील तेव्हा त्यांचा सामना करायला शिका.
सगळ्याच समस्यांवर विमा काढता येत नाही.
कल्पनांवर जर प्रत्यक्ष कृती झाली नाही, तर त्यांना काहीही किंमत नसते. त्यावर काम करण्याची भीती वाटत असल्यामुळे, दररोज हजारो लोक त्यांच्या चांगल्या कल्पना खोलवर कुठेतरी गाडून टाकत असतात. आणि मग या कल्पनांची भुतं परत येऊन त्यांना छळत राहतात.
तोंड अथवा लेखणीतून निघणारे सगळ्यात दुःखद शब्द कोणते असतील, तर ‘असं असलं असतं’ हे,
भीती घालवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रत्यक्ष कृती.
१. ऑफिसमधली किंवा घरातली साधी पण न आवडणारी कामं यांत्रिक पद्धतीनं करायला शिका.
तुम्हाला अजिबात आवडत नसणारी एखादी गोष्ट निवडा. मग त्या कामाबद्दल जास्त विचार न करता ते करायला सरुवात करा. कांटाळवाणी कामं करण्याचा हाच उत्तम मार्ग आहे.
२. कल्पना सुचण्यासाठी, योजना बनवण्यासाठी समस्या साडेवण्यासाठी आणि इतर मानसिक, बौद्धिक कामांसाठी यांत्रिकतेचा उपयोग करा.
कागद आणि पेन्सिल, यांचा उपयोग करा. होय, एकाग्रता साधण्याचं सर्वात परिणामकारक साधन म्हणजे एक साधा पेन्सिलीचा तुकडा. एक
‘पुढाकार घेण्याची सवय लावून घेण्याकरता खाली दिलेल्या दोन गोष्टी करा. १. मोहिमा उघडणारा वीर व्हा.
२. आपण होऊन पुढे व्हा.
‘तो कुणाच्या अध्यात ना मध्यात, तो काहीच करत नाही’, किंवा ‘अमुक एक गोष्ट कर, म्हणून सांगितल्याशिवाय तो काही करत नाही’, म्हणून एखाद्याचं कौतुक होतंय किंवा त्याची प्रशंसा होते आहे, असं मला तरी कधीही आढळलं नाही. तुम्हाला?
१. ‘सकर्मी’ बना. काहीतरी करणारा मनुष्य व्हा. ‘करा-रे’ व्हा ‘नको-रे-बाबा’ नका होऊ. २. परिस्थिती अनुकूल होण्याची वाट बघत बसू नका. भविष्यातल्या अडचणी आणि अडथळे गृहीत धरा, आणि ते समोर आल्यावर त्यांचं निराकरण करा. ३. फक्त कल्पना सुचल्यामुळे यश मिळत नसतं, हे ध्यानात ठेवा. तुम्ही जेव्हा त्यांच्याबाबतीत काही कृती करता, तेव्हाच कल्पनांना किंमत प्राप्त होत असते. ४. भीती घालवण्यासाठी आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी कृतीचा वापर करा. तुम्हाला ज्या गोष्टीची भीती वाटते, ती गोष्ट सरळ करायला सुरुवात करा, तुमची भीती नाहीशी होईल. या तत्त्वाचा प्रयोग करून पाहा. ५. तुमच्या मनाचं इंजिन आपोआप सुरू होण्याची व्यवस्था
...more
हे सगळं वैभव उभं राहिलं, ते केवळ त्याच्या चिकाटीमुळे आणि त्यानं आपला पराभव झाला आहे, असं कधीच न मानल्यामुळे.
विरोध, कठोर परिश्रम आणि माघार घ्यावी लागणं, या गोष्टींचा सामना केल्याशिवाय उच्च दर्जाचं यश मिळवणं शक्यच नसतं.
प्रत्येक अपयशातून काहीतरी धडा घ्या.
तुम्हाला कुणी टोमणा मारला, तर त्यावरून शाब्दिक युद्ध सुरू होऊ शकतं. हे वाग्युद्ध टाळायचं असेल, तर उत्तर देण्यापूर्वी एक दीर्घ श्वास घेणं हा एक उत्तम मार्ग आहे, हे मी शिकलो आहे.
इतरांना दोष देणं ही एक विघातक गोष्ट आहे. इतर कणी चुकलं आहे किंवा चुकत आहे, हे सिद्ध केलं तरी त्यामुळे तुम्हाला काहीही लाभ होत नाही.
१. ‘आपल्याला काही ना काही मार्ग निश्चित सापडले’, असं स्वतःला बजावा.
आपल्याला आपल्या जीवनात पुन्हा आनंद निर्माण करता येणं शक्य आहे, असा विश्वास एका किंवा खरं तर दोघाही जोडीदारांना वाटल्याशिवाय विवाह टिकून राहणं शक्य नसतं. कुठलाही विवाह समुपदेशक तुम्हाला हेच सांगेल.
कुठलीही अडचण, समस्या जोपर्यंत तुम्हाला सोडवता येण्याजोगी वाटते, तोपर्यंत ती सोडवता येणं शक्य असतं.
२. पुन्हा नव्यानं प्रयत्न करा.
पराजयाचं विजयामध्ये रूपांतर करण्यासाठी तुम्हाला साह्यभूत ठरतील अशा पाच मार्गदर्शक गोष्टी
ध्येय म्हणजे, ‘मला हे साध्य करायंच आहे’, असा ठाम, सुस्पष्ट पवित्रा.
तुम्ही पूर्वी कुठे होता, किंवा तुम्ही आत्ता कुठे आहात हे महत्वाचं नाही. तुम्हाला कुठे जायचं आहे, ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे.
आपणही कमीतकमी पुढच्या १० वर्षांच्या योजना आखल्या पाहिजेत. १० वर्षांनंतर आपण कोण असायला हवं, याची प्रतिमा तुमच्या मनात आज निर्माण केलीत, तरच तुम्ही तसे होऊ शकाल.
प्रथम, तुमच्या भवितव्याचं चित्र तीन विभागांच्या स्वरूपात पाहा : काम, घर आणि समाज.