sangini Quotes
sangini
by
Kiran Gavhane4 ratings, 3.75 average rating, 2 reviews
sangini Quotes
Showing 1-6 of 6
“माझ्याशिवाय स्वतःला कित्येकदा रसहीन, अपूर्ण समजणारा तो, आता मात्र दुसऱ्याच कोणाच्या मोहात - खरंतर स्वतःच्या अंतःकरणाने आपलेसे करून घेतलेल्या दुःखाच्या खाईत माझ्यापासूनच दूर होऊन बसला आहे. एखाद्या पुरुषाला स्वतःमध्ये लुब्ध करून ठेवण्याचे एखाद्या स्त्रीमध्ये असणारे कौशल्य माझ्याशी रुसून तर बसले नाही ना? असंख्य समयी असंख्य स्त्रियांना एका अस्सल स्त्रिगुणांची प्रतिभा सांगणारी मी - नाट्याविष्कारात सर्वोत्तम असणारी माझ्यातील नायिका, नाट्याविष्काराच्या असंख्य प्रतिभांची स्वामिनी असलेली मी आणि आज माझ्याच पुरुषाला मुग्ध करून ठेवण्याची क्षमता माझ्यात नाही? एखाद्या पुरुषाला स्वतःत गुंफून न ठेवणे म्हणजे माझ्यातील नायिकेचा, एका स्त्रीचा पराभव तर नाही ना?”
― sangini
― sangini
“अपरिचितपणे नटलेल्या या सृष्टीतील हे गौरसंपन्न सौंदर्य पाहण्याची इच्छा म्हणजे लोभ नव्हे! असं असेल तर प्रत्येक रसिक हा लोभी म्हणून व्याख्यरुपी असेल.”
― sangini
― sangini
“आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करत नाही तोपर्यंत आपण जगतोय असं जाणवतदेखील नाही. मनुष्यभूमीपासून पाच समुद्रे - हजारो कोस दूर असलेल्या व किनाऱ्यावर शांतपणे स्वतःच्याच विचारात मग्न झालेल्या त्या अक्राळाला हा विचार हिणवत होता. तो त्वेषाधिश बनला. त्याला नव्याने हेतू मिळाला. तो त्या हेतूला जगण्यासाठी उत्साही झाला. त्याची पावले त्या किनाऱ्यावरून चालू लागली आणि तिथेच जवळ असणाऱ्या त्याच्याच वस्तीत जाऊन स्थिर झाली. तो मी होतो…!”
― sangini
― sangini
“ती अतिशय सुंदर आहे. जगातील सर्वात सुंदर स्त्रियांपैकी एक असं मी कधीही म्हणणार नाही, कारण हे निर्दिष्ट वाक्य आजतागायत अनेकांच्या मुखातून बाहेर पडलं असेल आणि आता भीक म्हणून माझ्यासमोर येऊ पाहत आहे. या वाक्याला मी माझ्या जगात मुळीच थारा देणार नाही. काहीतरी नवीन शब्दरचना मला तिच्यासाठी सुचली पाहिजे! काय असेल ती रचना? मी प्रयत्न करतोय शब्द-शृंखला जोडण्याचा! नाही, नाही जमणार मला याक्षणी! शब्द-लालसेचा उगम आता तृप्तीवाचून तसाच राहणार, नाही का?”
― sangini
― sangini
“माझं शरीर श्रांत होत आहे, पण माझं मन? त्याला गुलाम बनविण्याची ताकद माझ्यात आहे. मना, मी तुला आज्ञा देतोय, तू माझ्या शरीरयातना विसर आणि मला आजूबाजूला असलेल्या विविधरंगी विभूषित कांतीचे दर्शन घडूदे. मला माझे नेत्र उघडायला धैर्य दे. मी आता नेत्र उघडले पाहिजे, तरंच हा आक्रोश थांबेल. त्या आक्रोशाने या देहाबरोबर तुलाही तेवढ्याच यातना होत आहेत, हे मला माहित आहे. तू माझ्यासाठी नव्हे तर स्वतःसाठी तरी लाचारी पत्कर अन या नेत्रांना महादैत्यी अशा ताकदींनी मदत कर. तू देहयातनांना विसर, तुझ्यात ते सामर्थ्य आहे! समोर उभ्या असलेल्या असंख्यांना या मावळत्या सूर्याबरोबर राहिलेली थोडीफार आशासुद्धा मावळून जाणं म्हणजे तूच तुझ्या अंताच्या वेळी केलेलं भलं मोठं पाप असेल. या देहाला तर यातनेची सवय झालेली आहे. तो पुढे मृत्युलोकीही त्या सहन करण्यास सज्ज आहे, पण तुझ्या या पापाला मृत्युलोकी काय शिक्षा मिळेल याच्या फक्त विचारानेच अंगावर शहारे उमटू लागले आहेत.”
― sangini
― sangini
