(?)
Quotes are added by the Goodreads community and are not verified by Goodreads. (Learn more)
Kiran Gavhane

“माझं शरीर श्रांत होत आहे, पण माझं मन? त्याला गुलाम बनविण्याची ताकद माझ्यात आहे. मना, मी तुला आज्ञा देतोय, तू माझ्या शरीरयातना विसर आणि मला आजूबाजूला असलेल्या विविधरंगी विभूषित कांतीचे दर्शन घडूदे. मला माझे नेत्र उघडायला धैर्य दे. मी आता नेत्र उघडले पाहिजे, तरंच हा आक्रोश थांबेल. त्या आक्रोशाने या देहाबरोबर तुलाही तेवढ्याच यातना होत आहेत, हे मला माहित आहे. तू माझ्यासाठी नव्हे तर स्वतःसाठी तरी लाचारी पत्कर अन या नेत्रांना महादैत्यी अशा ताकदींनी मदत कर.  तू देहयातनांना विसर, तुझ्यात ते सामर्थ्य आहे! समोर उभ्या असलेल्या असंख्यांना या मावळत्या सूर्याबरोबर राहिलेली थोडीफार आशासुद्धा मावळून जाणं म्हणजे तूच तुझ्या अंताच्या वेळी केलेलं भलं मोठं पाप असेल. या देहाला तर यातनेची सवय झालेली आहे. तो पुढे मृत्युलोकीही त्या सहन करण्यास सज्ज आहे, पण तुझ्या या पापाला मृत्युलोकी काय शिक्षा मिळेल याच्या फक्त विचारानेच अंगावर शहारे उमटू लागले आहेत.”

Kiran Gavhane, sangini
Read more quotes from Kiran Gavhane


Share this quote:
Share on Twitter

Friends Who Liked This Quote

To see what your friends thought of this quote, please sign up!

0 likes
All Members Who Liked This Quote

None yet!


This Quote Is From

sangini sangini by Kiran Gavhane
4 ratings, average rating, 2 reviews

Browse By Tag