श्रीमान योगी [Shriman Yogi] Quotes

Rate this book
Clear rating
श्रीमान योगी [Shriman Yogi] श्रीमान योगी [Shriman Yogi] by रणजित देसाई
5,594 ratings, 4.56 average rating, 296 reviews
श्रीमान योगी [Shriman Yogi] Quotes Showing 1-11 of 11
“राजे, आज अमावास्या. उद्या गेलं, तर बरं.’ राजे म्हणाले, ‘आज अमावास्या खरी. पण उद्या प्रतिपदा आहे. प्रतिपदेचा विजय वाढता असतो. तोच घरी येऊ दे. तो मिळवायला अमावास्येला बाहेर पडायला हवं.”
रणजित देसाई, श्रीमान योगी
“शिवाजी टिकतो, की नाही, हा प्रश्न नाही. राज्य टिकतं, की नाही, हा सवाल आहे. राज्य राखलंत, तर असे दहा शिवाजी येतील!”
रणजित देसाई, श्रीमान योगी
“कुंवरजी, हजारो काळे फत्तर जेव्हा स्वत:ला पायात गाडून घेतात, तेव्हाच त्यांवर असं संगमरवरी स्वप्न उभं राहतं, आपल्या सौंदर्यात झगमगतं. जोवर ही इमारत आहे, तोवर आमच्यासारखे अनेक मुसाफीर इथं येतील, याचं सौंदर्य पाहून थक्क होतील, तृप्त होतील; पण या शिल्पाच्या उभारणीसाठी याच्या पायात खर्ची पडलेल्या हजारो फत्तरांचा हिशेब कुणाच्या ध्यानीमनीही येणार नाही. आम्हीही एक स्वप्न उभं करीत आहोत. जगदंबेच्या कृपेनं ते आज ना उद्या साकार होईलही. ते जेव्हा घडेल, तेव्हा त्याचं कर्तृत्व आमच्या माथी मारलं जाईल; पण ज्यांच्या शहादतीवर स्वराज्य उभं राहिलं, आमच्या शब्दाखातर ज्यांनी स्वराज्याच्या पायी कुर्बानी केली, त्या सर्वांची नावनिशाणी कोण सांगणार? आज ताज पाहत असताना आम्हांला आमच्या मोहिमांत कामी आलेल्यांची तीव्रतेनं आठवण होत आहे.’ राजे भानावर आले. ‘...चला, कुंवरजी! ताज पाहू.”
रणजित देसाई, श्रीमान योगी
“ते सौंदर्य पाहिलं, पण फार कमी भासलं. मोहविण्यासारखं त्यात काहीच नव्हतं. सई, सौंदर्य मनाच्या स्नेहातून प्रकट होतं. जिव्हाळ्यानं ते ज्ञात होतं. तशा रूपाला तोड नसते.”
रणजित देसाई, श्रीमान योगी
“निश्चयाचा महामेरू| बहुत जनांस अाधारू| अखंड स्थितीचा निर्धारू| श्रीमंत योगी||१|| परोपकाराचिया राशी| उदंड घडती जयाशीं| जयाचे गुणमहत्त्वाशीं| तुळणा कैशी||२|| नरपति हयपति| गजपति गडपति| पुरंधर अाणि शक्ती| पृष्ठभागीं||३|| यशवंत कीर्तिवंत| सामर्थ्यवंत वरदवंत| पुण्यवंत अाणि जयवंत| जाणता राजा||४|| अाचारशील विचारशील| दानशील धर्मशील| सर्वज्ञपणें सुशील| सर्वां ठायीं||५|| धीर उदार सुंदर| शूरक्रीयेसी तत्पर| सावधपणेंसी नृपवर| तुच्छ केले||६|| तीर्थक्षेत्रें तीं मोडिलीं| ब्राह्मणस्थानें बिघडलीं| सकळ पृथ्वी अांदोळली| धर्म गेला||७|| देवधर्म गोब्राह्मण| करावयासि रक्षण| हृदयस्थ झाला नारायण| प्रेरणा केली||८|| उदंड पंडित पुराणिक| कवीश्वर याज्ञिक वैदिक| धूर्त तार्किक सभानायक| तुमचे ठायीं||९|| या भूमंडळाचे ठायीं| धर्म रक्षी एेसा नाहीं| महाराष्ट्रधर्म राहिला कांहीं| तुम्हां करितां||१०|| अाणखी कांहीं धर्म चालती| श्रीमंत होऊनि कित्येक असती| धन्य धन्य तुमची कीर्ति| विस्तारली||११|| कित्येत दुष्ट संहारिले| कित्येकांस धाक सुटले| कित्येकांसी अाश्रय झाले| शिवकल्याण राजा||१२|| तुमचे देशीं वास्तव्य केलें| परंतू वर्तमान नाहीं घेतलें| ॠणानुबंधें विस्मरण जाहलें| बा काय नेणूं||१३||’ ‘थांबा, मोरोपंत! तो श्लोक परत वाचा.’ राजे मध्येच म्हणाले. मोरोपंत वाचू लागले : ‘तुमचे देशीं वास्तव्य केलें| परंतू वर्तमान नाही घेतलें| ॠणानुबंधें विस्मरण जाहलें| बा काय नेणूं||१३|| सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ति| सांगणें काय तुम्हां प्रती|| धर्मस्थापनेची कीर्ति| सांभाळली पाहिजे||१४|| उदंड राजकारण तटलें| तेथें चित्त विभागलें| प्रसंग नसतां लिहिलें| क्षमा केली पाहिजे||१५”
रणजित देसाई, श्रीमान योगी
“निश्चयाचा महामेरू| बहुत जनांसी अाधारू अखंड स्थितीचा निर्धारू| श्रीमंत योगी|| यशवन्त, कीर्तिवन्त| सामर्थ्यवन्त, वरदवन्त पुण्यवन्त, नीतिवन्त| जाणता राजा|| शिवरायाचें अाठवावें रूप| शिवरायाचा अाठवावा प्रताप शिवरायाचा अाठवावा साक्षेप| भूमंडळीं|| शिवरायाचें कैसें बोलणें| शिवरायाचें कैसें चालणें शिवरायाचें सलगी देणें| कैसी असे|| सकळ सुखाचा केला त्याग| करूनि साधिजे तो योग राज्यसाधनाची लगबग| कैसी केली|| रामदास”
रणजित देसाई, श्रीमान योगी
“Soyara, diamonds shine when they are cut and polished. Else, a diamond is a like an ordinary stone. For that matter, the human mind too is like a diamond. It shines only when it is sharpened by wisdom and practical knowledge.”
रणजित देसाई, Shivaji: The Great Maratha
“तुमच्याकडून”
रणजित देसाई, श्रीमान योगी
“खाणं मागच्या मुक्कामावरच झालं आहे. कदाचित सारी रात्र दौड करावी लागेल, या हिशेबानं आम्ही मांड”
रणजित देसाई, श्रीमान योगी
“I had prayed to Shivai Devi. I wish to call him Shivaji.”
Ranjit Desai, Shivaji: The Great Maratha
“शहाजीप्रमाणे त्याला नाटकशाळाही होत्या. एखाद-दुसरी बाई पळविण्याचे प्रकरण त्याच्या जीवनात आले असण्याचा संभव आहे. पण त्याबद्दल विश्वसनीय पुरावा नाही.”
रणजित देसाई, श्रीमान योगी