जाता गळून पाने
विरल्या जुनाट छाया
वाऱ्यात मुक्ततेच्या
गेली उडून माया
फुलता बहार येथे
चित्ती वसंत सजला
रंगांत प्रेरणेच्या
झाली प्रसन्न काया
गंधात मोहराच्या
वाहून गुपित फुटले -
सृष्टीस ओढ कुठली
दृष्टीत कोण राया
आकाश केशरी अन्
हिरवी धरा इथे ही
तू वेळ मीलनाची
दवडू नकोस वाया
विसरून सर्व काही
येशील का पुनः तू
घेऊन साथ अपुल्या
आता नव्या रुबाया
- कुमार जावडेकर
Published on January 28, 2025 23:07