जा

जा मना, लगेच तू निघून जा दूर या इथून वा तिथून जा
तू न मैफिलीत या नवा सख्या जा खुशाल तू असा उठून जा!
मान्य! केवढा रुबाब हा तुझासर्व सर्व आज तू त्यजून जा 
थांबण्यास पाडले भरीस तर-'हो' म्हणून तू जरा दुरून जा 
साथ तू कशास आज शोधिसी?आपला प्रवास तू करून जा
- कुमार जावडेकर
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on January 28, 2025 23:08
No comments have been added yet.