विडंबन (बाँड):
बाँड हा वटण्यास थोडा समय आहे
आणि त्याला देणगीचे वलय आहे
बोलणे खोटे तुझे हे जाणतो मी
बातम्या मज वाचण्याची सवय आहे
सांग आता मी खरे बोलू कुणाशी
झूठ येथे बोलण्याला अभय आहे
'देश हा बदलून टाकू' ते म्हणाले
बोललो त्यांना 'कुठे हा विषय आहे?'
शासनाची का तमा मी बाळगावी?
आज झाले आत्मनिर्भर हृदय आहे
रेखतो भक्तांत मी प्रतिमा स्वत:ची
भोवती माझ्या मतांचा प्रलय आहे
- 'सुमार' जावडेकर
बांध (मूळ गझल) -
बांध हा फुटण्यास थोडा समय आहे
आणि मागे जीवनाचा प्रलय आहे
बोलणे खोटे तुझे हे जाणतो मी
चेहरे मज वाचण्याची सवय आहे
सांग आता मी खरे बोलू कुणाशी
झूठ येथे बोलण्याला अभय आहे
'शहर हे बदलून टाकू' ते म्हणाले
बोललो त्यांना 'जुना हा विषय आहे'
वादळाची का तमा मी बाळगावी?
आज झाले पत्थराचे हृदय आहे
मांडतो शब्दांत मी दु:खे जगाची
भोवती माझ्या सुरांचे वलय आहे
- कुमार जावडेकर
Published on March 22, 2024 02:56