अता आर्त हळवी हवा सांज असतेस्मृती पाखरांचा थवा सांज असते
जरी रात्र असते तुझी दाट छायाछटांचा तुझ्या कारवा सांज असते
दिशा क्षितिज संदिग्ध करती पुन्हा अन्पुन्हा जीवनी नाखवा सांज असते
जुने तेच ते रंग लेवून परकेसमारंभ अवघा नवा सांज असते
न तू आज येथे न मी आज तेथेअता रोज ही मारवा सांज असते
- कुमार जावडेकर
Published on February 25, 2024 00:28