Khidkya Ardhya Ughadya Quotes

Rate this book
Clear rating
Khidkya Ardhya Ughadya: खिडक्या अर्ध्या उघड्या Khidkya Ardhya Ughadya: खिडक्या अर्ध्या उघड्या by Ganesh Matkari
38 ratings, 4.32 average rating, 3 reviews
Khidkya Ardhya Ughadya Quotes Showing 1-3 of 3
“क्वीन्स नेकलेस सोडला तर आपली ओळखही विसरत चाललेली मुंबई, आपलं देखणेपण पैशापायी गहाण ठेवून बसलेली मुंबई. या वाढत्या विद्रूपतेकडे पाहताना वाटलं, की एकेकाळी राजबिंड्या असलेल्या या शहराच्या हळूहळू जवळ येणार्‍या अकाली मृत्यूवरही कोणी तरी अशीच कविता लिहिली पाहिजे, या मृत्यूसंदर्भातल्या जबाबदार्‍यांचं पद्धतशीर वाटप करणारी. झोपडपट्ट्या पोसून गिरण्या विकणारे राजकारणी, सगळीकडे एकसारख्या इमारती बांधून मुंबईची ओळख पुसणारे बिल्डर्स, बिग पिक्चर पाहण्याऐवजी तेवढ्यापुरता स्वार्थ पाहणारे आमच्यासारखे आर्किटेक्ट्स, माणसं आणि गाड्यांच्या संख्येवर नियंत्रण न ठेवता आधुनिकीकरणाकडे बोट दाखवणारे ब्युरोक्रॅट्स, आणि हे सारं गुपचूप पाहात राहणारा, किंबहुना या येऊन ठेपलेल्या मृत्यूची कल्पनाही नसलेला सामान्य नागरिक.”
Ganesh matkari, Khidkya Ardhya Ughadya: खिडक्या अर्ध्या उघड्या
“मला स्वतःला टळटळीत दुपार आवडते. इतर वेळा या नेहमीच तुलनेने बर्‍या वाटतात, पण वेळ सरते आणि त्यांचा प्लेझन्टनेस जातो. परिस्थिती अधिक बिकट होते. दुपारचं तसं नाही. तुम्हाला एकदा दुपारची सवय झाली की कोणत्याही प्रहराला तुम्ही बिचकत नाही. मग तुम्ही कायमच कम्फर्टेबल असता. कधी कधी मला वाटतं, की मला दुपार आवडण्याचं आणखीही एक कारण असेल, या स्पष्टीकरणापलीकडे जाणारं. कदाचित ही दुपार माझ्या जुन्या आठवणींशी जोडलेली आहे, उमेदवारीच्या काळातल्या, म्हणूनही ती मला जवळची वाटत असेल. आफ्टरऑल, नॉस्टॅल्जिया इज ए पॉवरफुल ड्रग.”
Ganesh matkari, Khidkya Ardhya Ughadya: खिडक्या अर्ध्या उघड्या
“खरा संताप एक्स्प्रेस करायचा ना, तर तो इंडिजिनस भाषेतूनच इफेक्टिव्ह वाटतो. या इंग्लिश शिव्या अगदीच मिळमिळीत वाटतात. आणि एका ‘फक’ या शब्दाची करून करून किती व्हेरिएशन्स करणार, नाही का?”
Ganesh matkari, Khidkya Ardhya Ughadya: खिडक्या अर्ध्या उघड्या