छत्रपती संभाजी Quotes

Rate this book
Clear rating
छत्रपती संभाजी : एक चिकित्सा छत्रपती संभाजी : एक चिकित्सा by Jaysingrao Pawar
70 ratings, 4.51 average rating, 9 reviews
छत्रपती संभाजी Quotes Showing 1-9 of 9
“सुप्रसिद्ध साहित्यिक गो .नी. दांडेकरांनी शिवाजी महाराजांस ‘गनिमीकावानिपुण सह्याद्रीपुत्र’ म्हटले आहे आणि संभाजीराजाचे”
Jaysingrao Pawar, छत्रपती संभाजी : एक चिकित्सा
“केवळ नऊ वर्षांच्या अल्पकाळात संभाजी महाराजांनी ज्या चौफेर मोहिमा हाती घेतल्या त्यांचे लष्करीदृष्ट्या मूल्यमापन केल्यास ‘एक रणझुंजार युद्धनेता’ हीच त्यांची उज्ज्वल प्रतिमा आपल्यापुढे उभी राहते.”
Jaysingrao Pawar, छत्रपती संभाजी : एक चिकित्सा
“उगवत्या सूर्यास नमस्कार’ करण्याची राजकारणातील प्रवृत्ती त्याच्या ठिकाणी पुरेपूर वसत होती.”
Jaysingrao Pawar, छत्रपती संभाजी : एक चिकित्सा
“महाराज यांणी आज्ञा केली आहे की‚ ‘संभाजी महाराज यांची उग्र प्रकृती. यांस राज्य आवरणार नाही. सर्वांचा नाश करून आपणही नाश पावतील. औरंगजेब महाशत्रू भागानगर प्रांतासमीप येऊन पावला. त्याचा पराभव यांचे वस्तू होणार नाही. राजाराम सुबुद्ध व यांचे हाते राज्यरक्षण होऊन सर्वांचे कल्याण घडेल. त्या अर्थी संभाजीराजे यांस (पन्हाळा) आहेत तसेच तेथील बंदोबस्त करवून कैदेत राखून राजाराम यांसच घेऊन‚ राज्य रक्षून‚ कारभार चालवावा...”
Jaysingrao Pawar, छत्रपती संभाजी : एक चिकित्सा
“संभाजी महाराजांची सर्वांत जास्त बदनामी कुणी केली असेल तर ती मल्हार रामराव चिटणीस याने. त्याने आपल्या शिवछत्रपती व संभाजीराजे यांच्यावर तयार केलेल्या दोन बखरींत निर्माण केलेल्या संभाजीराजाच्या विकृत प्रतिमेचा प्रभाव   १९व्या व २०व्या शतकातील इतिहासकारांवर व साहित्यिकांवर पडला. तेव्हा मल्हार रामरावाचे बखरीतील मूळ लेखन बारकाईने पाहणे या ठिकाणी अगत्याचे ठरते. मल्हार रामराव शिवछत्रपतींवरील बखरीत लिहितो : ‘‘...परंतु (संभाजी राजांची) उग्र प्रकृती. (शिवाजी) महाराजांचे मर्जीनुरूप वागणे पडेना ऐसें होऊ लागले. काही दिवस राजगडी राहून रायगडी गेले... त्यांचा व्रतबंध करून युवराज्याभिषेक करावेसे मनात आणून व्रतबंध केला. परंतु संभाजी महाराजांची मर्जी एक प्रकारची! कोण्हे एके दिवशी हळदकुंकू समारंभ शीतलागौरी यास सर्व सुवासिनी स्त्रिया राजवाड्यात येणार. त्यात कोण्ही रुपवान स्त्री आली. तिजला महालात नेऊन बलात्कार-अविचार जाला. हे वृत्त (शिवाजी) महाराजांसही समजले. ते समयी बहूत तिरस्कार येऊन बोलले जे ‘राज्याचे अधिकारी हे‚ अगम्यागमन श्रेष्ठ वर्णाचे ठायी जाले; सर्व प्रजा हे राजाचे कुटुंब आप्तसमान‚ हे पुत्र जाले तरी काय करावयाचे? यांचा त्याग करीन‚ शिक्षा करीन‚’ ऐसे आग्रह करून बोलले.”
Jaysingrao Pawar, छत्रपती संभाजी : एक चिकित्सा
“न्या. रानडे यांचा ‘Rise of the Maratha Power’ हा ग्रंथ म्हणजे त्यांनी स. १८९३ सालापासून पुढच्या काळात लिहून ठेवलेल्या लेखांचा संग्रह असून‚ तो स. १९०० साली प्रथम प्रकाशित झाला. डफच्या अनेक चुका त्यांनी दुरुस्त केल्या.”
Jaysingrao Pawar, छत्रपती संभाजी : एक चिकित्सा
“अनाजी दत्तो याच्या पक्षपाती लोकांनी त्या महंमदाशी (औरंगजेबाचा पुत्र शहाजादा अकबर) राजाराम याच्या हिताविषयी संभाजीच्या घाताची काही मसलत केली. ते वर्तमान संभाजीस कळाले... त्याने अनाजी दत्तो व शिरके कुळातील जे मुख्य सापडले ते व परभू बाळाजी आवजी चिटणीस व त्याचा पुत्र व त्याचा दुसरा कोणी एक भाऊबंद‚ इतके हत्तीचे पायी दिले. त्याच्या अशा अन्याय कर्मांनी सारे लोक त्यास कंटाळले. का की‚ अनाजी दत्तो शिवाजीचे वेळेस बहुत उपयोगी पडला आणि तो जातीचा ब्राह्मण होता. असे असता त्याचा जीव घेतला हे चांगले केले नाही...”
Jaysingrao Pawar, छत्रपती संभाजी : एक चिकित्सा
“इंग्रजी शिक्षणाने सुशिक्षित झालेल्या पहिल्या पिढीत डफच्या ग्रंथामुळेच संभाजी राजाची विकृत प्रतिमा तयार झाली.”
Jaysingrao Pawar, छत्रपती संभाजी : एक चिकित्सा
“इंग्रज आपल्या पत्रव्यवहारात लिहितात‚ ‘‘बादशहाला आलेल्या अपयशाने तो इतका चिडून गेला की‚ त्याने आपल्या डोक्यावरची पगडी त्राग्याने फेकून दिली असून‚ संभाजीराजाचा नायनाट केल्याशिवाय ती पुन्हा डोकीवर न घालण्याची त्याने शपथ घेतली आहे!”
Jaysingrao Pawar, छत्रपती संभाजी : एक चिकित्सा