Jump to ratings and reviews
Rate this book

छत्रपती संभाजी : एक चिकित्सा

Rate this book
Chhatrapati Sambhaji Maharaj the great Maratha warrior… a much controversial historical figure…Who is the initiator of this injustice…? Litterateurs? Historians? Bakharkars? Why did the dispute start on Raigad? Why did Sambhaji Raje join Dilerkhan? How true is Vasant Kanetkar’s analysis? It the ‘Godavari’ incidence true? What is Queen Soyara’s role in portraying Sambhaji’s character? Why did Sambhaji Raje punish his Ministers? Was Sambhaji Raje responsible for losing Hindvi Swaraj or was he the saviour? How did Sambhaji Raje face his death? The great senior historian of Maharashtra, Dr. Jayasingrao Pawar has analysed many such questions related to Sambhaji Raje. छत्रपती संभाजी हा एक रंगेल, बेजबाबदार, व्रूâर राजा (युवराज) होता, असं चित्र काही ऐतिहासिक कागदपत्रांमुळे निर्माण झालं; पण त्या कागदपत्रांची शहानिशा करण्याचं काम इतिहासकारांनी केलं नाही. परिणामी, संभाजीराजांची मलीन प्रतिमा साहित्यिक, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली; पण काही मोजक्या इतिहास संशोधकांनी योग्य कागदपत्रांचा शोध घेऊन, उपलब्ध पुराव्यांची शहानिशा करून संभाजीराजांच्या व्यक्तिमत्त्वातील गुणविशेष अधोरखित करण्याचा प्रयत्न केला. संभाजीराजांची विपरीत प्रतिमा निर्माण करणारी कागदपत्रं, संशोधकांनी त्याची केलेली चिकित्सा आणि संभाजीराजा&#

162 pages, Kindle Edition

Published April 1, 2005

32 people are currently reading
83 people want to read

About the author

Jaysingrao Pawar

24 books4 followers
डॉ. जयसिंगराव भाऊसाहेब पवार यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील तडसर या खेडेगावात झाला. सत्यशोधक चळवळीने प्रेरित झालेले गाव आणि शिक्षणाचे महत्त्व जाणलेले वडील, यांमुळे डॉ. पवारांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी कोल्हापूरला जाण्याची संधी मिळाली. शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या ‘प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंंग’मध्ये ते केवळ एक ट्रंक व वळकटी घेऊन दाखल झाले. कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयामधून इतिहास विषयातून ते बी.ए. व नंतर एम.ए. झाले. कोल्हापूरच्याच शिवाजी विद्यापीठात एम.ए.ला त्यांनी इतिहास विषयात प्रथम क्रमांक मिळवला. एम.ए. उत्तीर्ण झाल्यावर शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू व थोर इतिहास संशोधक डॉ. अप्पासाहेब पवार यांनी त्यांची मराठा इतिहास विभागात संशोधन साहाय्यक म्हणून निवड केली (१९६४). वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी इतिहास संशोधक म्हणून त्यांची जडणघडण सुरू झाली.

पुढे १९६९ ते २००१ या काळात डॉ. पवारांनी महाविद्यालयीन क्षेत्रात इतिहास अध्यापनाचे कार्य केले. या तीन दशकांहून अधिक काळात इतिहास विषयाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांची २० पुस्तके त्यांनी लिहिली आणि ती सर्व महाराष्ट्रभर लोकप्रिय झाली. अनेक संदर्भग्रंथ अभ्यासून अत्यंत सोप्या शैलीत इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी या पुस्तकांमध्ये केली असल्यामुळे ती क्रमिक पुस्तके न राहता, इतिहासप्रेमींची संदर्भ पुस्तके झाली.

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
48 (68%)
4 stars
15 (21%)
3 stars
3 (4%)
2 stars
3 (4%)
1 star
1 (1%)
Displaying 1 - 9 of 9 reviews
Profile Image for Vikram Choudhari.
53 reviews13 followers
August 7, 2022
छत्रपती संभाजी महाराज..!! हे नाव आपल्या डोळयांसमोर कोणती प्रतिमा उभी करतं?? झंझावाती, शूरवीर योध्दा, अध्यात्मशास्त्र, शृंगारशास्त्र व राजनीतिशास्त्र ह्यात पारंगत असलेला शिवपुत्र, कलेवर व तलवरीवर निस्सीम प्रेम असणारा कलावंत, गृहकलहास बळी पडलेला राजा की एक बेजबाबदार, रंगेल आणि क्रूर युवराज? तुमच्या मनात जी कोणती प्रतिमा असेल तिची निर्मिती झाली ती इतिहासकारांनी काही न पडताळलेल्या ऐतिहासिक कागदपत्रांतून, तुम्ही पाहिलेल्या नाट्यकलाकृतीतून.. संभाजी महाराजांची विकृत करण्यात आलेली प्रतिमा, त्याची कारणमीमांसा डॉ. पवार ह्यांनी पुराव्यासकट आपल्या ह्या प्रस्तावनेरूपी पुस्तकात खूप सोप्या भाषेत मांडली आहे. खरंतर हे पुस्तक संभाजी महाराज स्मारक ग्रंथ ह्या पुस्तकाची प्रस्तावना म्हणून लिहिण्यात आले असले तरी संभाजी महाराजांचा खऱ्या चरित्राचा शोध घेण्यात एक मैलाचा दगड आहे..

डॉ. पवार ह्यांनी संभाजी राजांबद्दल उपलब्ध असलेल्या सर्व बखरी (सभासद, रामराव ई.) प्रवासवृतांत, पत्रव्यवहार, मराठी व मोगल चरित्रकारांनी (खाफीखांन, साकी मुस्तेदखान ई.) रचलेली औरंगजेब व संभाजी राजांची चरित्रे इथपासून ते आधुनिक काळातील चरित्रकार (वा. सी. बेंद्रे, कमल गोखले ) ह्यांनी रंगवलेली चरित्रे इत्यादींची केलेली ही एक सत्यशोधक चिकित्सा आहे.. ह्यात लेखकाने स्वतः तटस्थ भूमिकेने सगळ्या ऐतिहासिक पुराव्यांकडे पाहून वाचकांसमोर आपले मत मांडले आहे व त्याचा अन्वयार्थ शोधण्याचे कार्य वाचकांवरच सोपवले आहे. प्रत्येक घटनेचा तपशील पडताळून त्या बद्दलची संदर्भसूची प्रत्येक प्रकरणांनंतर दिलेली आहे.

संभाजींनी सतत 8 वर्षे स्वगृहकलह सांभाळत एकाच वेळी तीन वेगवेगळ्या आघाड्यांवर शत्रूशी दिलेल्या झुंजा पाहता त्याचा ठायी असलेली अचाट इच्छाशक्ती व शौर्य कुणीही नाकारू शकत नाही. पण हेच सगळं सांभाळताना शिवरायांसारखी दूरदृष्टी व आवेगाला मुरड घालण्याची कला संभाजीना अवगत नव्हती आणि संगमेश्वराला त्यांना अकस्मात झालेली अटक व नंतर झालेली क्रूर विटंबना व हत्या हे ह्याचेच परिमाण आहेत. प्रत्येक पातळीवर आत्मतेजाचे प्रखर असे दर्शन घडवणाऱ्या व शिवपुत्र ह्या नावाला साजेसा असा नावलौकिक कमावणाऱ्या ह्या राजाची मालिन झालेली प्रतिमा आपण इतके शतकं मान्य करत आलोय हीच आपली खरी शोकांतिका आहे.. किंबहुना जी आपल्या साठी सोयीची ति प्रतिमा आपण स्वीकारत आलोय आणि क्षात्रतेजाच्या ह्या सूर्याचा कधी गैरसमज व स्वार्थाच्या गहिऱ्या रात्रीतून उदय होऊ दिला नाही..

अश्या ह्या वादळी आयुष्य लाभलेल्या आपल्या छत्रपती संभाजी राजांची खरी व समर्पक ओळख करून घेण्यासाठी नक्कीच हे पुस्तक प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणसांनी वाचायलाच हवे..

Profile Image for Akash Balwante.
104 reviews4 followers
March 27, 2022
प्रस्तुत पुस्तक संभाजी महाराजांच्या स्मारक ग्रंथ या भल्यामोठ्या पुस्तकाची प्रस्तावना आहे. पुस्तकाच्या नावाप्रमाणे यात संभाजी महारांजावर आतापर्यंत बऱ्यावाईट ज्या काही गोष्टी लिहिल्या आहेत त्यांची यात चिकित्सा करण्यात आली आहे. पूर्वीच्या बखरकारांनी आणि इतिहासकारांनी संभाजी राजांची नकारात्मक प्रतिमा उभी केली होती. जसेजसे त्या काळातील अस्सल कागदपत्रे प्रकाशात आली आणि खरे संभाजी कसे होते हे आपणा सर्वांना समजत गेले. लेखक स्वतः श्रेष्ठ इतिहासकार असल्याने त्यांनी आता पर्यंत ज्या लोकांनी संभाजी राजांवर लिहिले आहे त्यांचे थोडक्यात म्हणणे सांगून आपले स्वतःचे मत व्यक्त केले आहे आणि अनुमान वाचकांवर सोपवले आहे.
संभाजी महाराजांचा संक्षिप्त इतिहास यात सांगितला आहे तसेच त्यांचे दिलेरखान, शहाजादा अकबर आणि कवी कलश यांच्या बरोबरच्या संबंधाचाही आढावा घेतला आहे. त्यांनी औरंगजेबाबरोबर तसेच सिद्दी आणि पोर्तुगिजांविरुद्ध दिलेला लढा त्यांचे शौर्य प्रकट करतो. संभाजी महाराज शूर होते हे वादातीत आहे पण त्यांचा उग्र स्वभाव हा काही प्रमाणात त्यांना नडला हेही तितकेच खरे आहे. त्यांनी केलेली अष्टप्रधान मंडळींची राजकीय हत्या, शेवटच्या लढाईत संगमेश्वर ला मागे न हटता अविचाराने दिलेली लढत, झालेली कैद आणि त्याचीच परिणीती असलेली त्यांची क्रूर हत्या याचेच द्योतक आहे.
संभाजी महाराजांचा बहुअंगाने विचार करायला लावणारे हे पुस्तक सर्वांनी वाचायला हवे.
6 reviews1 follower
October 16, 2021
खरा संभाजी कोण अगदी यथार्थ उत्तर

इतिहासाचा साक्षेपाने अभ्यास करून संभाजी राजांचे यथार्थ दर्शन घडवल आहे.
खरंच आहे जो राजा प्रखर आत्मतेजाचे दर्शन घडवतो त्याला व्यसनी कसे महणावळे जाते हेच काळात नाही.
राजकारण, अध्यात्म, शृंगार तिन्ही आघाड्यांवर आपली बुद्धिमत्ता दाखवणारा माणूस व्यसनी कसा असू शकतो एखाद्याच्या कब्ज्यात कसा जाऊ शकतो एवढे साधे प्रश्न आपणाला पडू नयेत. हे एक मोठे aashchyra आहे.
1 review
March 2, 2022
From our childhood we really don't know the real true history of Sambhaji Maharaj, They was very brave and never loose any war in their entire life. Only because of faith on friend Aurangajeb trapped & killed them. If Sambhaji Maharaj ruled for another 10 years, the Indian map may different than what was that time.

We really salute Sambhaji Maharaj, but no real true story teach to school-college students, its very sad
9 reviews50 followers
August 3, 2018
Those who want to know about Chatrapati Sambhaji Maharaj must read it. Most unbiased and critical explanations given by Dr. Jaysingrao Pawar.
Profile Image for Dhananjay Kulkarni.
147 reviews6 followers
August 31, 2019
Excellent read backed by references and research. Must read for those who like to know "real" history rather than TV version.
Profile Image for Sanket Vijayarani Sanjay.
5 reviews
October 22, 2019
छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून वाचावा असा हा दस्तावेज.
Displaying 1 - 9 of 9 reviews

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.