संक्रमण [Sankraman Quotes
संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
by
Narayan Dharap258 ratings, 4.16 average rating, 16 reviews
संक्रमण [Sankraman Quotes
Showing 1-20 of 20
“निर्वाणीची वेळ आली की, दुर्बळातला दुर्बळ जीवसुद्धा आक्रमक बनतो.”
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
“केवळ संकटाच्या वेळीच देवाची पूजा-अर्चा-प्रार्थना करण्याची आणि आवश्यकता नसली तर त्याला पार विसरून जायचं हा सोयिस्कर स्वार्थीपणा नव्हता का? देव म्हणजे काय एखादा टॉर्च होता की, फक्त अंधार पडला की लावायचा? खासच नाही. तो भक्तीचा दीप सतत मनात तेवत राहिला पाहिजे. शरीराला जसा नियमित व्यायामाने एक घाट येतो तसा नियमित देवअर्चनेने मनालाही एक घाट येत असला पाहिजे - त्यातूनच संकटाला सामोरं जाण्याची शक्ती मनात निर्माण होते;”
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
“शेवटी श्रद्धा आणि आत्मविश्वास- दोन्हीमध्ये प्रकाराप्रकारची शक्ती असतेच.”
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
“पूर्वीचा दिनक्रम केव्हाच उधळला गेला होता. त्यावेळी प्रसंगाना एक निश्चित काळ आणि वेळ होती- आता आयुष्य म्हणजे घड्या घड्या घातलेला एक कागद झाला होता- एक एक घडी उलगडली की, काहीतरी नवीन समोर येत होतं. नुसतं नवीन नाही- अविश्वसनीय, थरारक, भीतिदायक असं काहीतरी.”
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
“शेवटी कल्पनाशक्ती ही माणसास मिळालेली एक अमूल्य देणगी आहे, तशीच ती कधीकधी शापही ठरू शकते.”
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
“तुला योग्य वाटेल तो मार्ग निवडायचं स्वातंत्र्य अर्थात तुला आहे, श्रीकांत. तुला उत्तेजन देणं किंवा परावृत्त करणं- त्यातलं काहीही मी करणार नाही; पण एक विचार तू केला आहेस का? तू निवडलेला मार्ग जगरहाटीला छेदून काटकोनात जाणारा आहे. आजवरचे अनुभव, बाह्मसुष्टीच्या स्वरूपाबद्दलच्या मनातल्या प्रतिमा आणि मनातले संकेत, सर्वकाही निरर्थक ठरणार आहे- त्या मार्गावर पाऊलखुणा नाहीत, खुणेचे दगड नाहीत, लँडमार्क नाहीत स्थळकाळाची चौकट विस्कटून जाते. अशा मितीत वावरताना मनोधैऱ्याची, आत्मविश्वासाची कसोटी लागते. केवळ जीवनच नाही, जीवनानंतरचं अनामिक; पण केवळ आयुष्य यांची बाजी लागते. तू याला तयार आहेस?”
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
“कर्ताकरविता परमेश्वर नाही- तो एक आरसा आहे. तुमच्या सर्व क्रिया, विचार, विश्वास, श्रद्धा, शंका सर्वकाही त्याच्यावर आपटून परावर्तित होऊन (कदाचित शतगुणाने वर्धित होऊन) परत तुमच्याकडेच येतात- जसा भाव तसा देव!”
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
“माणूस स्वत:भोवती अगदी पाषाणाचा कोट उभा करतो आणि आपण आता अगदी सुरक्षित आहोत अशा भ्रमात राहतो; पण त्याला काय माहीत की, लांबवरच्या एखाद्या वड-पिंपळ यासारख्या वृक्षांची मुळं जमिनीखालून येऊन तटाचा पायाच भंगून टाकतात- किंवा वाऱ्यावर उडत आलेलं एखादं बी तटाबाहेरच्या एखाद्या लहानशा खोबणीत अडकतं, रुजतं आणि केसांसारखी सूक्ष्म अशी त्याची मुळं दगडामातीच्या फटीतून आत शिरतात, हळूहळू मोठी होतात, फोफावतात आणि शेवटी तो चिरेबंदी तटच ढासळून टाकतात!”
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
“वाड्यात पैसा- संपत्ती- ऐशआराम सर्वकाही होतं; पण त्यात एक जालीम जहर होतं आणि हे जहर कणाकणाने माझ्या सर्वांगात झिरपणार होतं.”
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
“विजेच्या एखाद्या जिवंत तारेस अज्ञानाने, अजाणतेपणाने स्पर्श झाला तरी शॉक हा बसणारच!”
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
“माणसाचा स्वत:वरचा विश्वास काचपात्रासारखा असतो- एकदा तडकला की तडकलाच.”
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
“आपल्याला बाह्य जगाचं ज्ञान होतं ते पंचेद्रियांमार्फत मेंदूपर्यंत पोहोचलेल्या संवेदनांनी होतं. त्या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन मेंदू बाह्यजगाचं एक कामचलाऊ चित्र घडवतो आणि अगदी नाममात्र फरक वगळता सर्वांच्या मनातल्या या प्रतिमा जवळजवळ सारख्याच असतात. हाच तर आपल्या मानवजातीचा विशेष आहे; पण काही वेळा कोठेतरी बिघाड होतो आणि त्या व्यक्तीच्या मनातली जगाची प्रतिमा वेगळी असते. जाणिवा त्याच असतात; पण त्यांचे अर्थ वेगळे लावले जातात. जग आपल्याला दिसते, जाणवते, तसे त्या व्यक्तीला जाणवत नाही. दिनकररावांच्या बाबतीत हेच झालं आहे.”
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
“पण मनाची घडण कशी असते पाहा- मी जर आता काही केलं नाही, समोर (खरी वा काल्पनिक) संधी आली होती तिचा फायदा घेतला नाही, तर तो कृतघ्नपणा ठरेल अशी एक जाणीव सतत मनाला होत होती. प्रत्येकाचाच जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. काय योग्य, काय अयोग्य याचे प्रत्येकाचे निकष वेगवेगळे असतात- त्यामागे त्याचे अनुभव, त्याचं ज्ञान, त्याचे विश्वास हे सर्व असतं.”
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
“माणूस आणि पशू- विचारशीलता हीच माणसाची विशेषता आहे आणि तोच त्या दोघांतला फरक आहे. मानवाखेरीज इतर प्राणिजात (काही अपवाद वगळता) वर्तमानाच्या क्षणात जगत असते. होऊन गेलेल्या प्रसंगांच्या आठवणी, पुढे येणाऱ्या दिवसांबद्दल आशा- अपेक्षा-शंका इत्यादींचा बोजा त्यांच्या मेंदूवर नसतो. भूतकाळ आणि भविष्यकाळ- माणूस त्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष करू शकत नाही. मागच्या घटनांवरून तो शिकत असतो, त्या आधारावर भावी आयुष्याचा मार्ग ठरवत असतो. ही विचारशीलता हेच त्याचं वैशिष्ट्य आहे.”
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
“माणसाच्या मनाचं मोठ विचित्र असतं. तो मनोमन अनेक तोडगे करीत म्हणतो, त्यावर विश्वास ठेवत असतो. आपण असं असं केलं की आपला फायदा होईल, आपल्यावरचं संकट टळेल, आपल्याला समाधान मिळेल अशी त्याची भावना असते- कधी कधी ती इतकी प्रखर होते की, ती ठरावीक वृत्ती हातून झाली नाही तर त्याचा धीर खरोखरच खचतो. काहीतरी अनिष्ट होणार अशी त्याला भीती वाटायला लागते.”
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
“व्यवहार म्हटलं की तडजोड ही आलीच.”
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
“शेवटी हा एक जुगारच आहे आणि आजच्या घटकेस तरी समाजातल्या आपल्या वर्गातला प्रत्येक तरुण, प्रत्येक तरुणी हा जुगार खेळत असतात. मग मी तरी त्याला अपवाद का ठरावं? मीही या जुगाराला तयार आहे- म्हणजे तुमची तयारी असली तर.”
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
“तुम्ही जर आसपास पाहिलंत तर एकट्या एकट्याने आयुष्य कंठणाऱ्या कितीतरी व्यक्ती तुम्हाला दिसतील. त्यांच्या आयुष्याचे इतिहास आपल्याला माहीत नसतात. काहींनी स्वेच्छेने एकाकीपणा पसंत केलेला असतो, तर काहींच्यावर असा एकाकीपणा लादला गेलेला असतो. ते सुखी असतात की दु:खी असतात?.”
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
“पण वकील आणि पोलीस - दोघांचा संबंध झटका देणारा असतो.”
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
“श्रीकांत दामले म्हणजे सर्वसाधारण मानव. समाजातल्या तिशीच्या पिढीचा अगदी प्रतीकात्मक नमुना. या वयोगटातले वरचे वीस टक्के लोक यशामागे, अर्थप्राप्तीमागे मटेरियल वेल्थमागे लागलेले, सतत कामात गुंतलेले- तर खालचे वीस टक्के आयुष्याच्या स्पर्धेत मागे पडलेले, मनोमन खचलेले, सदासर्वदा मागच्याच रांगेत राहणारे. मधला भाग हा बऱ्यापैकी यशस्वी, समाधानी, सामाजिक- कौटुंबिक, व्यक्तिगत नीतिनियमांना मानणारा, कर्तव्याचा आदर करणारा- अशांपैकी श्रीकांत. त्याच्या आयुष्याचा आलेख म्हणजे ठरावीक स्लोपने चढत जाणारी सरळरेषा- बृहन्लेखन अगदी सोपं.”
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
― संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]