चेटकीण [Chetkin] Quotes
चेटकीण [Chetkin]
by
Narayan Dharap475 ratings, 4.12 average rating, 29 reviews
चेटकीण [Chetkin] Quotes
Showing 1-8 of 8
“दृष्टी आली की, समोर येईल ते पाहावंच लागतं. प्रिय असो वा अप्रिय असो. मघाशीच म्हणालो ना, देणगी फुकट कधीच मिळत नाही. त्याची काही ना काही किंमत मोजावीच लागते.”
― Chetkin: Ek Bhayavah Kadambari
― Chetkin: Ek Bhayavah Kadambari
“तुमच्या आयुष्यात कितीही उलथापालथ झाली तरी सृष्टीचं दिवसरात्रीचं चक्र चालूच असतं. माणसाने तिकडे जरा डोळसपणे पाहिलं तर त्याच्या ध्यानात येतं खरोखरच, आपण किती क्षुल्लक आहोत!”
― Chetkin: Ek Bhayavah Kadambari
― Chetkin: Ek Bhayavah Kadambari
“कुतूहल म्हणजे मानवाला मिळालेला मोठा वर आहे, शापही आहे.”
― Chetkin: Ek Bhayavah Kadambari
― Chetkin: Ek Bhayavah Kadambari
“व्यवहारात माणसाने सावध राहिलं पाहिजे. माणसांची पारख करता यायला पाहिजे. कुणाला जवळ करायचं, कुणाला चार हात दूर ठेवायचं, कुणाच्या वाऱ्यालासुद्धा उभं राहायचं नाही- हे ज्ञान उपजत नसतं; पण अनुभवांनी शिकून घ्यावं लागतं. स्तुतिपाठक श्रीमंतांभोवती तर गर्दी करणारच; पण त्यांच्यातला कोण आपमतलबी, ढोंगी, फसवा, लबाड हे समजायला हवं.”
― Chetkin: Ek Bhayavah Kadambari
― Chetkin: Ek Bhayavah Kadambari
“साऱ्या जगाला वाटत होतं म्हातारी घरादाराचं रक्षण करण्यासाठी वाडीवर राहते आहे! चोराचिलटांपासून घराचं रक्षण करण्यासाठी! पण सोनाली, लोकानां माहीत नव्हतं की, थोरल्याबाई लोकांचं त्या घरापासून रक्षण करण्यासाठी वाडीवर राहत होत्या!”
― Chetkin: Ek Bhayavah Kadambari
― Chetkin: Ek Bhayavah Kadambari
“बाबा, रघूमामा, रखमा- सगळ्यांचा बोलण्यातून एक अंत:प्रवाह वाहताना जाणवत होता. ती रात्रीची टॉर्च घेऊन जाणार ऐकताच रघूमामाची शीघ्र आणि तीव्र प्रतिक्रिया. ती दुसऱ्या घरापाशी गेली होती हे ऐकताच रखमाचे घाईघाईचे प्रश्न- दार - खिडकी उघडली नाहीस ना?- आणि बाबांनी त्या घराबद्दल बोलण्याची नाराजी- त्यांच्या मनात त्या घराबद्दल शंका-भीती-तिरस्कार अशा भावना होत्या- आणि त्या रास्त होत्या- कारण तिला स्वत:लाच एक लहानसा; पण भीतीचा चटका देणारा अनुभव आला होता- वर्षानुवर्षं बंद असलेल्या घरात ते सावकाश सावकाश बंद करून घेतलं जाणारं दार- कदाचित तिच्या भल्यासाठीच ते काही काही गोष्टी तिच्यापासून लपवून ठेवत असतील;”
― Chetkin: Ek Bhayavah Kadambari
― Chetkin: Ek Bhayavah Kadambari
“माणसाला सगळ्याची सवय होते. भीतीचीसुद्धा सवय होते.”
― Chetkin: Ek Bhayavah Kadambari
― Chetkin: Ek Bhayavah Kadambari
“कोणीही मूर्ख नव्हतं, अव्यवहारी नव्हतं- फक्त सगळे असहाय होते.”
― Chetkin: Ek Bhayavah Kadambari
― Chetkin: Ek Bhayavah Kadambari
