More on this book
Community
Kindle Notes & Highlights
by
V.P. Kale
Read between
May 21 - December 4, 2023
‘सर, कंटाळ्यात दोन जाती आहेत. कंटाळा कशाचा आलाय ते नेमकेपणाने सांगणारे आणि कशाचा कंटाळा ह्याचा उलगडाच न होणारे. जे नेमकेपणाने सांगू शकतात ते हॉबी शोधतात. स्वतःला वाचवतात.’
आपण काही तरी शोधत आहोत, ह्याच सुखामध्ये माणूस हरवतो. प्रत्यक्षात सुख हातांमध्ये आल्यावर ह्यात सुख नव्हतं, हे प्रत्ययाला येतं.
म्हणूनच अस्तित्वाच्या हातात सगळं द्यायचं आणि मस्तीत जगायचं. आपण ठरवलं होतं, त्यापैकी बालपणापासून काय काय घडवू शकलो? मागून किती आणि न मागता किती मिळालं, हे फक्त प्रत्येकाने आठवून पाहावं.
“कितीही विचारवंत... विचारवंत असं म्हटलं तरीही बुद्धीची एक सीमारेषा आहे. त्या बॉर्डर लाईनवर भक्तीचीच पाटी असते. बुद्धी थकल्यावर भक्तीचाच प्रांत सुरू होतो.
एखाद्या माणसाने आपलं काम केलं तर आपण त्याला ‘थँक्यू कार्ड’ पाठवतो. त्याप्रमाणे माझं पहाटेचं भजन म्हणजे मी अस्तित्वाला पाठवलेलं ‘ग्रीटिंग कार्ड‘च आहे.”
प्रवाहात एखादा खडक आला तर पाणी त्याच्याशी झुंज देत बसत नाही, थांबत नाही, स्वतःची वाट शोधून बाजूने निघून जातं. ह्या वाहण्यात सातत्य असल्यामुळेच खडक हळूहळू लहान होत जातो आणि प्रवाह रुंदावत जातो. सातत्य
साथीदाराला सुधारण्याच्या खटाटोपात पडू नकोस. त्याच्या दृष्टिकोनातून त्याचं वागणं योग्यच असतं. तिथे डोकं आपटत बसण्यापेक्षा त्याला वळसा देऊन पुढे जाणं चांगलं. जलधार हो, वाहत राहा.’
मार्गदर्शन हा प्रकार खऱ्या अर्थाने संभवतच नाही. आपल्या वृत्ती वेगळ्या, आयुष्य वेगळं, पूर्वानुभव वेगळे, समस्या वेगळ्या. मग त्यांची उत्तरं दुसऱ्याजवळ कशी असतील?
धनुष्यावरचा बाण तुम्हाला कायमची चिरनिद्रा देऊन तुम्हाला मुक्त करतो. वाग्बाण निद्रा घालवतो आणि तुमच्या स्मृती जितकी वर्षं टवटवीत राहतील, तितकी वर्षं तुमची हत्या करीत राहतो. माणूस जेवढा जवळचा, तेवढा त्याचा बाण जास्त जहरी.
गुणवत्तेचं भांडवल वाममार्गासाठी करण्यात, ह्या देशात खूप चतुर माणसं आहेत. म्हणूनच माणसं श्रीमंत होत गेली आणि देश आहे तिथेच राहिला. आपल्या देशात पैसा प्रचंड प्रमाणावर आहे. अपघातानेच तो कुणाकडे आहे हे कळतं.
आजचा खरा धर्म ‘पद‘, ‘पैसा’ आणि ‘प्रतिष्ठा’ ह्या तीन शब्दांतच टिकलाय. प्रतिष्ठेचा बळी देऊन ‘पद’ मिळवलं की ‘पैसा’ आलाच. ‘कोणतं सरकार टिकतं ते बघू’ ह्या विधानात देशाचा विचार कुठं आहे?
‘माणूस बिघडला’ ह्याचा थोडक्यात अर्थ ‘तो मी म्हणतो तसं वागत नाही’ हाच आहे.
आई-बाप व्हायला वेळ लागत नाही आणि झोपडपट्टीत तर वेळ घालवतही नाहीत. पालक होणं अवघड. जन्माला जीव घालणं सोपं, त्या ‘जिवाचं’ जीवन घडवणं अशक्य.
प्रत्यक्ष समस्या जरी सुटली नाही तरी कोणत्या कारणामुळे ती सुटत नाही याचं आकलन झालं तरी तो समाधानी होतो.
बुद्धी थकली, आपल्यावर अन्याय का होतोय ह्याचं उत्तर मिळालं नाही म्हणजे ती माणसं पत्रिका घेऊन धावत सुटतात किंवा कोणत्या तरी महाराजांच्या मठात गर्दी करतात.
माणूस कितीही बुद्धिवान असला तरीसुद्धा बुद्धीलाही सीमारेषा असते. प्रत्येकाच्या वैचारिक कुवतीनुसार प्रत्येकाची सीमारेषा वेगळी असते. बुद्धी थकली रे थकली की त्या सीमारेषेवर ’ भक्ती‘चीच पाटी असते. म्हणूनच
ज्या मार्गाने गरज पूर्ण होते तो मार्ग म्हणजे गुरू.’
युद्धाच्या प्रसंगी मन जास्तीत जास्त शांत ठेवावं लागतं. संघर्ष आणि क्रोध ह्याही वेळेला मन शांत हवं. हे विधान विनोदी वाटेल, पण त्यात एक गर्भितार्थ आहे. विलक्षण संताप आला की, त्याचा निरीक्षणशक्तीवर परिणाम होतो. हवी असलेली वस्तू समोर असून दिसत नाही.
HAMLET IS A TRAGEDY OF OVERTHINKING, WHEREAS MACBETH IS A TRAGEDY OF OVER-AMIBITION. ह्या ठिकाणी ‘ओव्हर’ हा शब्द जास्त महत्त्वाचा. अतिविचार केला म्हणजेच योग्य कृती घडते असं नाही. विचारसाखळीतला कृती करायला लावणारा शेवटचा दुवा चुकीचा ठरू शकतो. त्याचप्रमाणे एका झटक्यात एखादी कृती केली आणि अपयश आलं, तर ‘हा अविचाराचा परिणाम’ असा शिक्काही तयार ठेवायचं कारण नाही. आयुष्यात यश अनेकदा जाता-जाता मिळून जातं आणि एकदा यश मिळालं की, माणूस जास्त खोलात जात नाही. यशस्वी माणूस विचारवंतच मानला जातो आणि तो आपल्या यशाचं श्रेय नियतीला देत नाही. आपली दूरदृष्टी, अचूक योजना, निर्णय घेण्याची क्षमता अशी अनेक पिसं टोपीत
...more
प्रेम निसर्गाने निर्माण केलंय आणि लग्नसंस्था समाजाने.
न टिकणाऱ्या वस्तूलाच टिकली म्हणायचं हे ‘नांदा सौख्यभरे’ ह्या आशीर्वादाचं विडंबन आहे.
पत्नीचा साथीदार होण्याऐवजी तिचा वापर करणारा पुरुष म्हणजे पत नसलेला पती.
Nobody is perfect हे सूत्र मनात हवं. शुद्ध हेतूबाबत कधीच शंका नसावी आणि खूप चांगलं चांगलं करण्यावागण्याची इच्छा असूनही, मधल्या Steps चुकू शकतात, ह्यावर श्रद्धा असावी.
who is wrong ह्याऐवजी What is wrong ह्याचाच शोध घ्यायचं दोघांनी ठरवलंत तर संसार बहरलाच पाहिजे.
‘दिसण्यात काय आहे? माणसाचं मन पाहावं’ हा युक्तिवाद बुद्धीचा. तो मनाचा कौल नाही.
पण व्यवहारात येणारी संकटं आणि समस्या निवारण्यासाठी जे वेगळं रसायन लागतं, त्याला ‘मित्र’ म्हणतात.
धरित्रीची सेवा केली की तिच्या कृपेच्या वर्षावाखाली शेतकरीं चिंब होत असत. शेतीसाठी कर्ज काढून, ते सरकारी कर्ज कालांतराने माफ करायचं अशी प्रथा नव्हती. कारण त्या काळात भंपक लोकशाही नव्हती आणि म्हणून निवडणुका नव्हत्या. मातृभूमीवरचं अलोट प्रेम, त्या काळातले राज्यकर्ते भूखंडामागून भूखंड विकत घेऊन व्यक्त करीत नव्हते.
जमीन विकली जात नव्हती, तिची शान लिलावात काढली जात नव्हती, म्हणून धरित्रीचा पुत्र संपन्न होता.
कर्तृत्वाला प्रयत्नांचे अश्व जुंपायचे असतात. एकच दिशा ठरवायची असते. निग्रहाचे लगाम हातात ठेवायचे असतात आणि सातत्याचा चाबूक स्वतःवरच उगारायचा असतो. असं केलं तरच ‘व्यक्ती’च्या गावापासून ‘व्यक्तिमत्त्वा’च्या महानगरीपर्यंतचा प्रवास होतो.
अत्यंत महागडी, न परवडणारी, खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती गोष्ट म्हणजे आयुष्य.
पैसा, प्रतिष्ठा, ऐपत, मोठी जागा, नवनवीन वस्तू, प्रलोभनं ह्या सगळ्यामागे धावण्यात एक जीवघेणी शर्यत पाहतोय. एकही शांत मन, निवांत चेहरा आणि तृप्त वास्तू अनेक वर्षांत पाहिलेली नाही. आपल्याला काय हवंय हे अनेकांना समजलेलं नाही. ज्यांना समजलंय त्यांना ते मिळालेलं नाही. ज्यांना मिळालंय तेवढ्यावर ते राजी नाहीत. सतत हुरहुर, सतत काहूर.
समाजाचा आणि तुमचा सहवास तीन तासांचा. पण चोवीस तासांचं नातं घराशी. माणूस म्हणून ज्या काही उणिवा असतील, त्याचे काटे घरातल्यांना खुपत असतात.
जनतेने गळे कापून सुखात नांदणारे राज्यकर्ते आठवा. आपण गुन्हेगार नाही, हे ठामपणे मानल्याशिवाय ते मिळालेल्या संपत्तीचा उपभोग घेऊ शकणार नाहीत. तसं शांत व्हायला तुम्हाला जमलं तर आत्मघाताचा विचारही तुम्हाला शिवणार नाही.
“निवडणुका कॅन्सल करायच्या. कोणत्याही पक्षाचा उमेदवार उभा राहिला की तो निवडला गेल्याचं जाहीर करायचं. सगळे निवडून येतील. मग दिल्ली, महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा सगळीकडे स्टेट बँकेप्रमाणे विधानसभेच्या शाखा काढायच्या. सभा घ्या, ठराव पास करा, मायक्रोफोन तोडा, राजदंड पळवा, काहीही करा. सगळे निवडून आले तर हे प्रकार बंद होतील. विधानसभांना त्यांच्या त्यांच्या पक्षांची नावं द्या. जी विधानसभा जास्तीत जास्त लोकोपयोगी काम करील तिला राष्ट्रपती पुरस्कार द्या. मतदान, बोगस मतदान, मतमोजणी, फलक, बॅनर्स– किती खर्च वाचेल! प्रचार नको, लाऊडस्पीकर नको, सगळेच विजयी. मग खरं लोककल्याण कोण करतो ते आपोआप कळेल.”
प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या तीन गोष्टींच्या टप्प्यापलीकडचा प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो.
माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काही सापडलं नाही तर? ह्याची त्याला भीती वाटते.
बोलायला कुणीच नसणं ह्या शोकांतिकेपेक्षा, आपण बोललेलं समोरच्या माणसापर्यंत न पोचणं ही शोकांतिका जास्त भयाण.