More on this book
Community
Kindle Notes & Highlights
by
V.P. Kale
Read between
May 21 - December 4, 2023
आपण समजतो त्यापेक्षा वस्तुस्थिती फार निराळी असू शकते हा विचारही आपल्याला शिवत नाही.
आपण रामायणकाळातील ‘राम’ होऊ शकणार नाही, पण याचा अर्थ आपण‘धोबी’ व्हायलाच हवं का?
आयुष्यातील फक्त चांगलेच क्षण टिपायला आणि तेवढेच क्षण जतन करायला नित्य कोजागिरी जागवणारं मन लाभावं लागतं.
मोहावर जेव्हा ही मंडळी मात करतात तेव्हा त्यांच्या त्या यशाला सत्काराचे हार नाहीत आणि पराभवाच्या दुःखाला सांत्वनाचा स्पर्श नाही.
पुष्कळदा सुखाची लाट भरतीसारखी आपण बेसावध असताना चिंब करून सोडते. त्यातलं काय लुटायचं ह्याचं आकलन होण्यापूर्वी ती लाट ओहोटीप्रमाणे दूर गेलेली असते.
कष्ट न करता सुधारक बनवणाऱ्या गोष्टी झटपट सर्वत्र होतात.’
स्वतःचा स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव दुसऱ्याचं ऐकतो त्याच क्षणी तो स्वतःचं अस्तित्व, निसर्गाने जगाकडे पाहण्याची दिलेली स्वतंत्र नजर हरवून बसतो.
‘आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस नक्की चांगला असणार, याची आशा सुटत नाही म्हणून आपण जगतो. उद्याबद्दलची काही ना काही स्वप्नं उराशी असतात म्हणून आज मृत्यूला कवटाळावं असं वाटत नाही.’
सुरक्षितपणाच्या भावनेसाठी आयुष्यभर कसली ना कसली किंमत मोजायला लावतो त्याला संसार म्हणतात.
बहुसंख्य माणसांना कशाची ना कशाची गॅरंटी हवी असते. ह्या मूर्ख माणसांना कसली गॅरंटी हवी असते? ह्या माणसांचा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नाही का? जगात हमी कशाची देता येते? ‘आय प्रॉमिस टु पे द बेअरर‘– ह्या शब्दाकडे गहाण पडलेल्या माणसांना यंत्र आणि मानवी मन ह्यांतला फरक समजत नाही.
दोन हात आणि एक मन. माणसाने बेदम कष्ट करावेत आणि उदंड प्रेम करावं. उदंड प्रेम करणारी माणसं कशाचीच गॅरंटी मागत नाहीत. माणसाने हे प्रेम करायची शक्ती घालवली म्हणून आता नियतीसुद्धा कसलीच गॅरंटी देत नाही. संतांचं उदंड प्रेम परमेश्वरावर असतं. म्हणून संत कसलीच हमी मागत नाहीत. ते निर्भय असतात.
धोब्याच्या पातळीवरच्या माणसांचं समाधान करण्याच्या नादात रामचंद्रांना पण सिंहासनाची पातळी सोडून घाटावरच्या धुण्याच्या दगडाची पातळी गाठावी लागली. कुणाच्या समाधानासाठी कुणाचा अंत पाहायचा हे माणसाने ठरवायला पाह्यजे.”
खऱ्या अर्थाने जी माणसं मोठी असतात त्यांची उंची न सांगता समजते. जी माणसं आपली उंची किती हे स्वतःच सांगत फिरतात ती जास्त बुटकी दिसू लागतात.
‘आपण पहिल्यांदा मन कधी मारलं हे कुणालाच सांगता येत नाही. आणि, मनासारखी मुर्दाड गोष्ट जगात कुठलीच नाही. प्रत्येक हौस पुरवून घ्यायची त्याला सवय लागली की ते जन्मभर हौस भागेल कशी हा एकच छंद घेणार. मन मारायची तुम्ही सवय जडवून घ्या. तसं केलंत, तर तृप्तीच्या क्षणीहीमन कासावीस होणार. त्यातही ते मन हुरहुर शोधायचा यत्न करणार.
“आपली मुलं म्हणजे आपले खरे परीक्षक असतात. आई, वडील म्हणजेच नवरा- बायको आपण होऊन एका टीकाकाराला जन्माला घालतात. ती मुलं परखडपणे कुणाचं चुकतं हे अचूक सांगतात.
विचारपूस केल्याचा आनंद प्रत्येक वेळी मिळतोच असं
आपली अवस्था इतरांपेक्षा वाईट आहे ह्या विचारापेक्षा, आपली अवस्था आपल्याला वाटली होती तेवढी वाईट नाही, हा विचारच त्याला तारून नेतो.
कबुतराला गरूडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं. कारण, आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.
पायाखालची वाट स्वतःची असावी. ती सापडेपर्यंत, प्रवासाचा प्रारंभ करू नका. निसर्ग
‘ज्या गोष्टींवर प्रेम करण्यात रिस्क नाही अशा गोष्टींवर प्रेम करणारी माणसं खूप असतात. खरं तर ते प्रेमच नाही. त्याला मालकी म्हणतात. कारण ते प्रेम सुरक्षित असतं. तिथं समर्पणाचा प्रश्न उद्भवत नाही, प्रतिसादाची पण त्या वस्तूकडून अपेक्षा नसते.’
ठिणगी ठिणगीच असते. ती कुठे पडते ह्यावर तिचं अस्तित्व टिकतं. पाण्याच्या पृष्ठभागावर पडते की ज्वालाग्राही साठवणीच्या गुदामात? माणसाचं मनही जलाशयाप्रमाणे शीतल आहे की स्फोटक वस्तूंचं गोडाऊन आहे ते ठिणगीशिवाय समजत नाही. संशय, स्पर्धा, द्वेष, मत्सर, क्रोध अशी नाना रूपं ठिणगीला धारण करता येतात. मन इंधनाने तुडुंब भरलेलं असेल तर ठिणगी उग्र रूपाने जगते.
ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणतंही अंतर लांब वाटत नाही. एकदा विचारांची साखळी सुरू झाली की, त्या साखळीपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो.
ह्या देशावर तीनच शब्दांचं राज्य तीन तपांवर चाललं आहे. चर्चा, मोर्चे आणि खुर्च्या. हे ते तीन शब्द. हा दत्तगुरूंचा सध्याचा अवतार. विचारवंतांचा वर्ग केवळ चर्चा करतो. विचारांशी सुतराम संबंध नसलेले फक्त मोर्चा काढतात आणि ह्या अडाणी, हिंसक वृत्तींच्या मोर्च्यांवर पुढाऱ्यांच्या खुर्च्या टिकतात.
जगाच्या पाठीवर कोणत्याही देशातल्या माणसांना, मानवी रक्त हाच एक धर्म आहे ह्याचं आकलन होईल, त्यांनाच ‘निधर्मी’ शब्दाचा खरा अर्थ समजला आहे. ज्यांना तो अर्थ समजला नाही, ते सगळे सत्ता टिकवण्यासाठी, मानवी रक्त इंधन म्हणून वापरतात. वयाच्या सोळाव्या वर्षी सगळ्या विश्वात शांती नांदावी म्हणून ‘पसायदान’ मागणाऱ्याज्ञानेश्वरांनाच फक्त ‘निधर्मी’ शब्द समजला होता.
जो माणूस आदर्श मुलगा असतो तोच तारुण्यात प्रेमळ पती होतो, त्याचाच एक पालनकर्ता बाप होतो आणि वात्सल्यपूर्ण आजोबा होतो.
एकमेकांना टाकण्यापेक्षा, एकमेकांसाठी काही ना काही टाकणं ह्यालाच अर्पणभाव म्हणतात.
पण प्रामाणिक प्रयत्न करूनही आपल्या जोडीदाराचे वृत्तीदोष जात नाहीत समजल्यावर तिकडे दुर्लक्ष करायची शक्ती म्हणजे क्षमाशीलता.
वाकायचं कधी आणि कधी वाकवायला लावायचं, स्थळ, काळ, स्थिती ह्याचं भान म्हणजे तारतम्य.
वारंवार प्रकट होऊनही जे शांत होत नाही त्यालाच ‘शल्य’ म्हणतात.
‘प्रचीती आली की ती तुमची तत्त्वं होतात आणि तुमची तत्त्वं इतरांची थेअरी होतात.’
रेडीमेड उत्तर म्हणजे शॉर्टकट. आयुष्य सोपं होईल कदाचित. समृद्ध होणार नाही.
“शांत होणं किंवा असणं हा मनाचा मूळचाच धर्म नसेल, तर कोणताही बाह्य उपाय क्षणिकच असतो. ‘देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी’ म्हटलंय ते कशासाठी?
मिळालेला लौकिक म्हणजे अश्वमेधाचा घोडा दाराशी आल्याप्रमाणे. त्याचा लगाम हातात धरला की मग कायम युद्ध.
कृष्ण म्हणजे हातात हात घेऊन चालणारा सगा वाटतो आणि राम खूप वरच्या पायरीवर उभं राहून आशीर्वाद देणारा युगपुरुष वाटतो. मला नेहमीच उंचावलेल्या हातांपेक्षा हातातला हात जवळचा वाटतो.
आयुष्याचं पुस्तक वाचणारा माणूस ओळखायचा कसा?– कधी? तर तो माणूस अर्थपूर्ण हसतो तेव्हा ओळखायचा. ‘मी अडाणी माणूस आहे’ ह्यासारख्या वाक्यातून अशा माणसाची विद्वत्ता बाहेर पडते. नम्रतेचा पोशाख घालून चातुर्य जेव्हा प्रकट व्हायला लागतं, तेव्हा ह्या माणसांची युनिव्हर्सिटी शोधायची नसते.
शिस्तीच्या आणि शिक्षेच्या बडग्याशिवाय कामं होत नाहीत अशा विचारांवर भिस्त असलेले सगळे मालक गुलामांसारखे दिसतात. सेवकांपेक्षा जास्त दमतात. ह्याउलट विश्वास, प्रेम, वात्सल्य ह्यांनी एकदा माणसं बांधून ठेवली की मालक मुक्त होतात.
प्रत्यक्ष विवाहसोहळ्यात तर पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींपेक्षा जास्त महत्त्व व्हिडीओ कॅमेरामनला प्राप्त झालं आहे. मंत्रसंस्कारांच्या पावित्र्याकडून किती झपाट्याने बुद्धिवान समजला जाणारा आपला समाज, यांत्रिक झगमगाटाकडे वळतोय, त्याचं हे विदारक उदाहरण.
स्टुडिओतले कॅमेरे फक्त बटणच दाबायची अक्कल असलेल्या माणसांच्या हातात आले आणि संसारात रंग भरायचं कौशल्य, अर्पणभाव ह्या गुणांशी फारकत घेऊन आम्ही फक्त सोहळे सुशोभित करायला लागलो. आम्ही इतके कुणाला विकले गेलो? का गेलो?
प्रत्येकजण एक इमेज तयार करतो. ती इमेज तयार करताना त्या मुलीच्या वागणुकीचा, हावभावांचा, एखाद्या कॅमेऱ्यासारखा फोटो घेतला जातो. तिच्या अंतर्मनाचा शोध घेऊन कोणत्याही कृतीमागची संवेदना कुणीही जाणून घेत नाही.
कष्ट हे सौंदर्य. बुद्धी हे सौंदर्याचंच रूप. नम्रता म्हणजे देखणेपणा. कोणतंही काम भक्तीने करणं हेच सौंदर्य.
ह्या अभ्यासात आपला जोडीदार आपल्याशी कसा वागतो ह्याचाच केवळ अभ्यास करून चालणार नाही. मित्र-मैत्रिणी, वडीलधारी माणसं, घरातले नोकरचाकर, हॉटेलातले वेटर्स, रेल्वेतले सहप्रवासी, टॅक्सी-रिक्षावाले,नातेवाईक, दुकानदार, थोडक्यात म्हणजे संसाराला प्रारंभ केल्यावर ज्या ज्या व्यक्तींचा समाजात समावेश होतो त्या सर्वांशी त्याचं वागणं कसं आहे ह्याचं अवलोकन तुम्ही करायला
बारीकसारीक गोष्टींतूनच देवगण, माणूसगण, राक्षसगण प्रकट होत असतो.
प्रत्येकजण त्याच्या कल्पनेतल्या सुखामागे पळतोही. पण संसार टिकतो तो कसा? तर दुःख जेव्हा सगळ्यांचं एकच होतं तेव्हा घर उभं राहतं.
नोकरी निव्वळ पगारासाठीच असते का? शरीराबरोबर ती बुद्धीची गुंतवणूक असते. संयमाची शिकवण असते. शिस्तीचा वस्तुपाठ असतो. आपल्यावाचून काही प्रमाणात इतरांचं अडतं ह्या अहंकाराला, नोकरीच्या निमित्ताने, एक सेफ्टी व्हॉल्व्ह मिळतो.
लाऊडस्पीकर्स लावून, कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात प्रार्थना म्हणणं, हा राजकारणाचा भाग आहे. भक्ती, प्रेम, श्रद्धा, दया, शांती, क्षमा ही सगळी मौनाची रूपं आहेत. बाहेरच्या कोलाहलापासून लांब गेलो म्हणजे तुम्हालाच तुमचा सूर ऐकू येतो.
अखंड उत्साह, शोधक नजर, वक्तृत्व, प्रवासाची विलक्षण हौस हे सगळे गुणविशेष व्हिटॅमिनच्या गोळ्या खाऊन येत नाहीत.
अहंकार हीच पशुत्वाची ठिणगी.”
‘आपण आपल्यात कोणतंही परिवर्तन घडवून आणलं नाही, तरी आपलं काहीही बिघडत नाही’ असं माणसाच्या ध्यानात आलं की संपलं.
घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणाऱ्याची ऐपत नेहमीच कमी असते.
माणसाबरोबर एक नवा धर्म जन्माला येतो. खरं तर तो स्वभावधर्म. स्वभावधर्माला परिवार लाभला म्हणजेच त्याचा धर्म होतो.