राधेय
Rate it:
Read between August 10 - August 12, 2022
1%
Flag icon
राधेय! हे कर्णचरित्र नव्हे. प्रत्येकाच्या मनात एक दडलेला कर्ण असतो. माझ्या मनातल्या कर्णाची ही कहाणी. भावकहाणी. याची सत्यता शोधायची झाली, तर त्यासाठी महाभारताची पाने चाळण्याचे काहीच प्रयोजन नाही. कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल.
3%
Flag icon
‘हे महाबाहो, अभिमन्यूच्या वधात तुझा हात नव्हता, हे फार उशिरा कळलं. पण त्याआधी तुझ्या पुत्राचा वध मात्र मी सूडभावनेनं केला होता. ते पाहत असूनही तुझ्या मुखातून शाप का बाहेर पडला नाही, हे आज समजून तरी काय उपयोग?...’
3%
Flag icon
तेजस्वी गौर वर्णाचा, सुदृढ बांध्याचा कर्ण
4%
Flag icon
रथावर भगवा ध्वज गरुड-चिह्नासह तिरप्या सूर्यकिरणांत झळकत होता. दुर्योधनाचे रथाचिह्न रत्नजडित गज होते. गरुड-चिह्न पाहून कर्णाची उत्सुकता वाढली. कर्ण रथाजवळ येत आहे, हे पाहताच रथसेवक सामोरा आला. कर्णाला प्रणाम करून त्याने सांगितले, ‘द्वारकाधीश कृष्णमहाराज आपली वाट पाहत आहेत.’
4%
Flag icon
कृष्णाच्या मस्तकी रत्नखचित सुवर्णकिरीट शोभत होता. पीतांबर धारण केलेल्या कृष्णाच्या खांद्यावर हिरवे रेशमी उत्तरीय होते. त्या मेघ-सावळ्या रूपात एक वेगळेच देखणेपण लपले होते. काळ्याभोर विशाल नेत्रांत मोहकता होती.
4%
Flag icon
कृष्णाची दृष्टी कर्णाच्या कवच-कुंडलांवर स्थिरावली होती. गौर कांतीवर सुवर्ण-तेज प्रकाशित व्हावे, तसे ते भासत होते. अंगावरचे उत्तरीय भर उन्हाच्या घामामुळे भिजून शरीराला चिकटले होते; पण त्यामुळे कवचाचे अस्तित्व लपत नव्हते. कवच धारण करणाऱ्या कर्णाचे रूप सहज कुंडलांनी अधिकच सुशोभित झाले होते.
4%
Flag icon
कृष्णा, ती कवचकुंडलं शापित आहेत. प्रवाहावर तरंगत राहणं एवढंच माझ्या दैवी लिहिलं आहे.’
4%
Flag icon
‘कर्णा, ते दुःख मीही जाणतो. त्याची व्यथा मलाही माहीत आहे. कुणाला नदीप्रवाहावर सोडून दिल जातं, कुणाला नदी ओलांडून पैलतीर गाठावा लागतो. कुणी गवळ्याचं पोर म्हणून नंदाघरी वाढतं, तर कुणाला सूतकुलात आश्रय लाभतो. मातृवियोग दोघांच्याही भाळी सारखाच लिहिलेला. सुटल्या किनाऱ्याची ओढ धरून जीवनाचा प्रवास कधी होत नसतो, अंगराज!’
4%
Flag icon
‘कृष्णा, आपल्या जीवनात ते एक स्वप्न आलं होतं, आलं, तसंच ते विरूनही गेलं. आपलं जन्मरहस्य कधीही रहस्य राहिलं नाही, पण मी... मी कोण? मला का टाकलं गेलं? माझ्या मनातून हा विचार कधीच सुटत नाही. पोरकेपणाची व्यथा भारी तीव्र असते.’
5%
Flag icon
‘अंगराज, सूर्यदाह सहन करण्याची साधना तुला प्राप्त झाली आहे. ती तुझी तपश्चर्या आहे. माझं तसं नाही. गाई चारण्यासाठी मी रानावनांतून भटकलो, तरी वृक्षसावलीतच मी वाढलो. आपण प्रासादाकडंच जावं, हे बरं, असं वाटत नाही का?’
5%
Flag icon
‘त्यात माझं कसलं कौतुक!’ कर्णाने हसून साथ दिली. ‘आपलं अलौकिक सारथ्य ही आपण आत्मसात केलेली कला आहे. मी तर सूतकुलात वाढलेला. सारथ्य आणि रथपरीक्षा हे दोन्ही आमचे सहजस्वभावच बनलेले असतात.’ ‘तेही भाग्य मोठंच! कर्णा, वासनांचे अश्व जीवनाच्या रथाला जुंपले असता, तो रथ सदैव कह्यात ठेवणं ही सामान्य गोष्ट नव्हे.’
5%
Flag icon
‘तेच सांगत आहे. माझ्या प्रथम पत्नी ऊर्मिलेला दोन पुत्र. शत्रुंजय आणि वृषकेतु. पण वृषकेतु लहान असतानाच ऊर्मिलेनं या जगाचा निरोप घेतला. माझा वृषालीशी विवाह झाला. त्यानंतर मी या नगरीच्या रक्षणार्थ इकडं आलो. पण वृषकेतु राधाईनं ठेवून घेतला. माझी आठवण, म्हणून.’ ‘आणि शत्रुंजय?’ ‘तो युवराज दुर्योधनपुत्रांच्या सहवासात वाढत आहे.’
7%
Flag icon
‘कर्णा, मानवी जीवन तरी काय असतं? या देहाच्या बासरीत हळुवार मनाची नाजूक फुंकर घातली, की हृदयांतरीच्या व्यथादेखील नादमुग्ध बनून जातात.’
9%
Flag icon
भेट, किती कालाची घडली, यापेक्षा, ती कोणत्या भावनेनं घडली, याला महत्त्व असतं.
9%
Flag icon
‘कर्णा, आता निरोप दे.’ ‘आपल्याबरोबर मी थोडं अंतर येतो ना!’ ‘नको! नरोप कधीही मंद गतीनं घेऊ नये. त्यानं दु:ख वाढतं. निरोप शक्य तेवढ्या लौकरच संपवावा. तुम्ही प्रासादाच्या द्वारीही येऊ नका. इथंच उभे राहा. तुझा निरोप घेत असता बराच काल तुम्हांला पाहता येईल. मग मी येऊ?’
11%
Flag icon
‘महादुर्घट पण आहे. द्रूपदानं मत्स्ययंत्र उभारलंय्, ते भेदण्याचं सामर्थ्य फक्त तुझंच आहे.’ ‘युवराज, हा हट्ट सोडा! तुमच्या कृपेमुळं मला सत्ता, ऐश्वर्य प्राप्त झालंय्. दासदासींनी संपन्न असलेल्या या प्रासादात वृषालीसारख्या सहधर्मिणीसह मी तृप्त आहे. या प्रासादात आणखी एका राज्यकन्येची आवश्यकता नाही.’ ‘आपल्या दुबळेपणाला झाकण्यासाठी केवढं सुंदर कारण सांगितलंस! व्वा! मित्रा, मी प्रसन्न आहे.’ ‘दुबळेपणा झाकण्यासाठी?’ ‘नाहीतर काय? त्या मत्स्ययंत्राचं नाव ऐकताच कौरवसभेतल्या एकेका वीरांनी अनेक कारणं सांगून माघार घेतली. पण एवढं सुरेख कारण मी ऐकलं नव्हतं.’
12%
Flag icon
तिच्या रूपाबद्दल जे ऐकले होते, त्यात तसूभरही कमतरता नव्हती. किंबहुना त्या वर्णनातच कमतरता होती. द्रौपदीच्या त्या सावळ्या रूपाने साऱ्यांनाच भारावून टाकले. तिचे नेत्र कमलदलासारखे होते. धनुष्याशी स्पर्धा कराव्यात, अशा वक्र भुवया तिला लाभल्या होत्या. साक्षात दुर्गा मानवी रूपाने प्रगटली, की काय, असा भास साऱ्यांना होत होता.
12%
Flag icon
‘मी सूतपुत्राला वरणार नाही.’
13%
Flag icon
‘हो!’ निश्चयी सुरात द्रौपदी उद्‌गारली, ‘सूतपुत्राला मी वरणार नाही, असं सांगितलं. असले दहा मत्स्यभेद यानं केले, तरी मी त्याला कधीही प्राप्त होणार नाही. दादा, सांग त्याला. म्हणावं, कावळ्यानं राजहंसीकडं पाहू नये.’ कर्ण उठून उभा राहिला. हातचे धनुष्य त्याने फेकून दिले. आपली घायाळ दृष्टी त्याने उंचावली. सूर्यदर्शन घडताच, क्रोधाने जळत असताही त्याच्या मुखावर एक विकट हास्य प्रगटले. तो सूर्याकडे पाहून हसला. ते हसणे त्याच्या क्रोधाहून तीव्र होते.
13%
Flag icon
वृषालीचा सारा संताप उफाळला. केतकी रंगाचा गौरवर्ण असलेली ती मुद्रा तप्त बनली. धारदार नासिकेचा अग्रभाग, कानाच्या पाळ्या तांबड्या बुंद बनल्या. सदैव हसणाऱ्या डोळ्यांत अगतिकतेची लाट उसळली.
13%
Flag icon
‘मग थांबलात का? त्या राजकन्येचं हरण का नाही केलंत?’ ‘तिचं मी हरण केलं असतं, तर ती माझी स्वामिनी बनली असती; तिची ती योग्यताच नव्हती.’ ‘मी समजले नाही...’ ‘त्यात समजायचं काय अवघड आहे? द्रौपदी मला रूपसंपन्न भासली खरी; पण ती फक्त रूपसंपन्नच होती. पुरुषार्थापेक्षा कुलाचा आणि गुणापेक्षा रूपाचा जिला मोह आहे, त्या स्त्रीला माझ्या जीवनात जागा नाही. या घरची दासी म्हणूनसुद्धा तिची येण्याची पात्रता नव्हती. म्हणूनच तो संयम पाळावा लागला.’
16%
Flag icon
‘द्रौपदी पाच पांडवांची पत्नी!’ कर्णाच्या चेहऱ्यावर खिन्नता पसरली. ‘पराक्रमाचा अपमान केवढं भयानक पाप असतं. अखेरीस याज्ञसेनी द्रौपदी पाच पांडवांची भिक्षा ठरली.’
16%
Flag icon
रथाच्या हालचालींबरोबर तोल सावरीत असलेला भीम आपल्याच गर्वात उभ्या जागी डुलणाऱ्या मत्त हत्तीसारखा भासत होता. तप्त सुवर्णाप्रमाणे शुद्ध गौर वर्णाचा, विशाल व दीर्घ स्कंध असलेला आणि पुष्ट व दीर्घ बाहूंचा तो भीम कर्णाकडे पाहत होता.
16%
Flag icon
‘राधेया... सूतपुत्रा... उद्या रणभूमीवर तुला एवढे कष्ट पडणार नाहीत. स्वगृही जाऊन विश्रांती घे, पृथ्वीतलावरची शेवटची विश्रांती मनसोक्त भोग.’ हेच ते शब्द. शस्त्रस्पर्धेच्या वेळी याच भीमाने असाच उपहास केला होता. वयाबरोबर रूपात फरक पडला, पण वृत्ती तीच राहिली- असंयमी, संतापी, गर्विष्ठ.
18%
Flag icon
‘ही विनंती, की आज्ञा?’ भीमाला उत्तर सुचले नाही. त्याने पाहिले. कर्णाच्या नजरेत एक वेगळाच शांत भाव प्रगटला होता. त्या दृष्टीला दृष्टी भिडवण्याचे सामर्थ्य भीमाच्या ठायी नव्हते. भीम अगतिक बनला. कर्णाची नजर चुकवीत तो म्हणाला, ‘अंगराज, मी विनंती करतोय् आम्ही येतो.’ ‘क्षमा!’ कर्ण म्हणाला, मध्याह्नकाळ जवळ येतोय् इथंच आपलं भोजन झालं, तर...’ पुढे कर्णाला बोलावे लागले नाही. पाठमोऱ्या भीमाचे शब्द स्पष्टपणे कानांवर आले, ‘शरणागताच्या गृही क्षत्रिय अन्नग्रहण करीत नसतात.’
24%
Flag icon
कर्णाच्या पानाजवळ सुकुमार पावले आली, नकळत कर्णाची दृष्टी वर गेली. समोर द्रौपदी उभी होती. दोघांची दृष्टी एकमेकांना भिडली होती. द्रौपदीच्या हाती पक्वान्नांचे तबक होते. पदर ढळला होता. तो ध्यानी येताच वाढण्यासाठी वाकलेली द्रौपदी न वाढताच उभी राहिली. कर्णाची दृष्टी पानाकडे वळली आणि त्याच वेळी त्याच्या कानांवर शब्द आले, ‘याचकानं दात्याकडं पाहू नये,’ कर्णाने संतापाने मान वर केली. द्रौपदी पंक्तीमधून भरभर जात होती.
27%
Flag icon
‘संयमाच्या कक्षा यानीच ओलांडल्या, तिथं मी त्यांचं पालन काय करणार? ज्या जरासंधाचं पाठबळ सदैव कौरवांच्या पाठीशी होतं ज्याच्या पराक्रमापुढं कृष्णाला हार घेऊन द्वारकेला पळालं लागलं, त्या जरासंधाचा वध कपटानं एकाकी गाठून त्या कृष्णानं करवला... अन् ज्या शिशुपालानं भीमाच आपल्या राज्यात स्वागत केलं, आदरानं करभार दिला, त्याचा सत्यावक्तेपणापायी गेलेला बळी या आमच्या थोर महात्म्यानं पाहिला. कौरवांच्या प्रतिष्ठेपायी चेदिराज शिशुपालावा वध झाला अन् कौरवांच्या साम्राज्याची धुरा वाहणाऱ्यात या आपल्या तिघां सल्लागारांनी ते चुपचाप सहन केलं. पांडवांच्या साम्राज्यापदाला आचार्य द्रोणांनी आशीर्वाद दिले. कौरवसभेत ...more
27%
Flag icon
‘राज्य वाटून देऊन शत्रू तृप्त होत नसतात, पण तुम्हांला तसं वाटलं. कुरुसाम्राज्याची प्रतिष्ठा असा लौकिक असणारी ही हस्तिनापूर नगरी. शत्रूंना भयभीत करणारी, वीरांना आह्वान देणारी तुमच्या खोट्या स्वप्नापायी या नगरीला निस्तेज, निष्प्रभ करून टाकलंत. ज्या नगरीच्या आश्रमांतून शस्रविद्येचे धडे दिले जायने, भूमिरक्षणार्थ वीर तयार व्हावयाचे, जी भूमी खऱ्या अर्थानं वीरप्रसू बनायची, त्या आश्रमांतून तुमची ज्ञानगंगेची सत्रं सुरू झाली. जितेपणी मृत्यूनंतरच्या स्वर्गाची चित्रं रंगविण्यात वीरांची मनं रमली. रथशाळांतून नवे नवे तेजस्वी रथ निर्माण होण्याऐवजी त्या निष्णात कलावंतांकडून शत्रूची घरंदारं उभी केलीत. ज्या मत्त ...more
28%
Flag icon
‘आत्मघात?’ धृतराष्ट्र उद्‌गारले. ‘हो! आत्मघात! त्याखेरीज दुसरा मार्ग नाही. तात, तो विचार मनात आला, तरी मनातच ठेवा. त्याचा उच्चार करू नका. या तुमच्या विश्वसनीय राजसभेत बोलली जाणारी प्रत्येक गोष्ट पांडवांच्या महालात प्रतिध्वनीच्या रूपानं उमटते. इथं तुमच्या बाजुचं कोणीच नाही. ज्यासाठी तुमचा माझ्यावर कोप झाला होता, ती गोष्ट आज मी सांगतो. राज्याची वाटणी अटळ दिसली, तेव्हा मीच पांडवांना जतुगृहात जाळून मारण्याचा कट रचला. पुरोचनाकरवी मी लाक्षागृह उभारलं, पण ज्या दिवशी पांडव त्या घरात प्रवेश करते झाले, त्याच दिवशी त्यांना सावध करणारे संदेश याच प्रासादातून गेले.’ ‘युवराज!’ विदुर कासावीस झाले. ...more
29%
Flag icon
कर्ण-दुर्योधन शकुनीकडे पाहत होते. शकुनीचा अति-गौर वर्ण अधिकच उजळला होता. कृश अंगलटीची ती उंच व्यक्तिरेखा आपल्या तंद्रीत मग्र होती. डाव्या खांद्यावरचे रेशमी उत्तरीय डाव्या मनगटावर पटबंध होऊन रुळत होते. त्याच्याशी चाळा करीत शकुनि बोलत होता
32%
Flag icon
‘युवराज, धृतराष्ट्रमहाराजांनी पांडवांना आमंत्रण देण्यास मला आज्ञा केलीय्.’ ‘ते मला माहीत आहे, काका! किंबहुना मीच तो आग्रह धरला. मी तातांना आवर्जून सांगितलं की, तुमच्याखेरीज दुसऱ्या कुणाला पाठवू नका.’ ‘असल्या गोष्टीत मला रस नाही.’ ‘का? रस नसायला काय झालं? पांडवांच्या राजसूयात तर तुमचा आनंदरस ओसंडत होता. इथंही यज्ञ होणार आहे. मयसभेऐवजी द्यूतगृह आहे.’ ‘हा तुमचा द्यूत आणि यज्ञ खरा असता, तर मी हर्षानं इंद्रप्रस्थाला गेलो असतो.’ ‘मग हा खरा यज्ञ नाही? ऐक, कर्णा, काका काय म्हणतात, ते!’ दुर्योधन हसला. विदुर म्हणाले, ‘दुर्योधना, माझं ऐक. हा द्यूत तू घडवू नकोस. निदान पांडवांना इथं आणण्याचं मला सांगू ...more
33%
Flag icon
‘काका, तातांनी सांगितल्यप्रमाणं तुम्ही इंद्रप्रस्थाला जा. सम्राट युधिष्ठिरांना सर्व सांगा. द्यूताचं आमंत्रण द्या. त्यांना म्हणावं, यज्ञ हे निमित्त आहे. द्यूत हे आह्वान आहे. यज्ञभूमीतल्या सुग्रास भोजनासाठी त्यांना बोलावलं नसून, द्यूत खेळण्यासाठी त्यांना पाचारण केलंय्. त्यांना सांगा, म्हणावं, सुबलपुत्र गांधारदेशाधिपती शकुनि महाराज द्यूताला बसणार आहेत. अक्षविद्येत निपुण अशी त्यांची कीर्ती आहे. ते कृतहस्त म्हणजे आपल्या इच्छेनुसार फासे टाकण्यात निपुण आहेत. अतिदेवी-म्हणजे मर्यादेचं उल्लंघन करून द्यूत खेळणारा- असाही त्यांचा लौकिक आहे. त्यांच्याबरोबर द्यूत खेळणं म्हणजे साक्षात पराजय भोगणं. हे सारं ...more
34%
Flag icon
‘शकुनिमहाराज, सम्राटांनी सुरुवातीलाच सांगितलंय् की, द्यूत हे पापाचं मूळ आहे. द्यूतकार नेहमीच कपटाचा अवलंब करतात.’ शकुनि हसले, ‘राजा, तू ज्ञानी आहेस. या जगातलं आह्वान असंच असतं. विद्वान अविद्वानाला, अस्त्रज्ञ अकृतास्त्राला अन् बलवान दुर्बलाला असंच आह्वान देत असतो. तुला माझी भीती वाटत असेल, तर याच वेळी द्यूतातून परावृत्त हो!’ क्षणात युधिष्ठिराची मान ताठ झाली. आपले उत्तरीय सावरीत तो पायऱ्या उतरत द्यूतपटाकडे जात असता म्हणाला, ‘मी द्यूताला तयार आहे.’
34%
Flag icon
‘हां! आहे मान्य! ऐक, शकुने, जिचे नेत्र शरदऋतूतील कमलदलासारखे आहेत, जिच्या अंगाला शरत्कालीन कमलांचा गंध येतो, जिचे काळे व कुरळे केस विपुल व सुदीर्घ आहेत, जिचा मध्यभाग यज्ञवेदीप्रमाणे रेखीव आहे अन् जिच्या अंगावर विरळ केस आहेत, अशा बुद्धिमती, कलंकविधुरा सर्वांगसुंदर द्रौपदीचा पण लावून मी तुझ्याशी द्यूत खेळतो.’
35%
Flag icon
‘शकुनिमहाराज, आज आपल्या द्यूतनैपुण्यानं आपण पांडवांना जिंकलं. द्यूतामध्ये आपला अतिदेवी म्हणजे मर्यादेचं उल्लंघन करून द्यूत खेळणारा अन् कृतहस्त म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे फासे टाकण्यात निपुण असा आपला लौकिक आजच्या द्यूतपटावर आपण सिद्ध केला. आपण बोलून-चालून कृतहस्त. त्यापुढं पांडवांचं राज्य अन् ऐश्वर्य आटून गेलं... अन् अतिदेवी लौकिक सिद्ध करण्यासाठीच की काय, आपण त्या द्यूतप्रिय युधिष्ठिराला द्रौपदी पणास लावण्यासाठी उद्यूक्त केलंत; पण द्यूत हा मनोरंजनासाठीच व्हावा. भंजनासाठी, आत्मघातासाठी नव्हे. आपण व्यापारात निष्णात, अशीही आपली ख्याती आहे. या जगात जरीबासनांचा, तलम वस्त्रांचा, नेत्रदीपक रत्नांचा ...more
35%
Flag icon
द्रौपदी दासी बनली असली, तरी ती स्त्री आहे, हे इथं बसलेल्या राजसभेला अन् त्या सभेतल्या धर्मगुरूंना विसरता येणार नाही. जी मर्यादा आपण सहज ओलांडलीत, ती ओलांडून निदान आम्हांला तरी जमणार नाही. ती अमर्यादा आहे.’ कर्णाकडे पाहत विदुर म्हणाले, ‘या जगात राज्य देऊन कुणी राजा होत नाही, ना राज्य हिरावून घेऊन कुणी दास. द्रौपदी ही जन्मजात राजकन्या असून, इंद्रप्रस्थाची महाराणी आहे’ मर्माघात झालेला कर्ण त्या शेवटच्या वाक्याने अधिकच संतापला. आसनावरून खाडकन उठून तो गरजला, ‘कोण महाराणी? द्रौपदी? मग राजमाता गांधारीदेवी कोण? कौरवकुलाचं अमात्यपद भोगणाऱ्या विदुरांना सम्राट धृतराष्ट्रमहाराजांचा विसर पडलेला दिसतो. ...more
35%
Flag icon
‘सन्मान? या पांडवांचा?’ दुर्योधन उसळला, ‘या द्यूतानं त्यांचा योग्य तो सन्मानच केलाय्. घरी आलेल्या अभ्यागताला कसं वागवावं, हे त्यांनीच मला शिकवलंय्. राजसूय यज्ञाच्या प्रसंगी यांनी उभारलेली मयसभा आमच्याइतकी दुसऱ्या कुणी उपभोगली? आमचा अपमान करताना घरी आलेल्या अभ्यागताची जाणीव यांना नव्हती? अन्, विदुरकाका, हे लक्षात ठेवा की, इथं पांडव जरूर आमंत्रित आहेत; पण ते आमच्या पाहुणचारासाठी नव्हे... द्यूतासाठी! तुमच्याकरवीच दिलेलं द्यूताचं ते आह्वान स्वीकारून ते इथं आलेले आहेत. शकुनि अक्षविद्येत निपुण आहेत, हे त्यांना तुम्हीच सांगितलं होतं ना? ज्वाला चुकविण्यासाठी भुयारं खोदता येतात, पाण्यावर तरंगण्यासाठी ...more
36%
Flag icon
राजसभेत द्रौपदी ढासळली होती. तिचे नीलवर्ण कुरळे केस उर्णावस्त्रावर विखुरले होते.
36%
Flag icon
‘पितामह, तुम्ही तरी मला न्याय द्या! ज्याला द्यूतातलं काही ज्ञान नाही, अशा माझ्या पतीला अक्षविद्येत निपुण असलेल्यानं आह्वान द्यावं आणि त्याचं सर्वस्व हिरावून घ्यावं, हे योग्य आहे का?’
37%
Flag icon
घनमेघाने सूर्य झाकावा, तसा भास द्रौपदीला झाला. भीष्माच्या उत्तराने दुर्योधन- कर्ण आनंदित झाले. विदुर-विकर्णासारख्या सज्जनांनी द्रौपदीची बाजू घेतली; पण भीष्मनिर्णयामुळे ते समर्थन कौरवसभेत दुबळे ठरले. भर समुद्रात, वादळात सापडलेल्पा नौकेच्या एकुलत्या एका शिडाच्या चिंध्या व्हाव्यात आणि दैवगतीच्या लाटांवर लक्ष्यहीन नाव हेलकावे घ्यावी, तशी पांचालीची अवस्था झाली.
Saurabh L
I am amazed that Pandavs are goinv to let it happen what comes next. Wouldn't you tryvto stop it
37%
Flag icon
‘द्रौपदी, तुझी जागा इथं आहे, बघ!’ म्हणत दुर्योधनाने कर्दळीच्या स्तंभाप्रमाणे सर्व लक्षणयुक्त, वज्रासारखी दृढ असलेली आपली मांडी उघडी करून द्रौपदीला दाखवली. सारी भूमी सूर्यदाहात होरपळत असता आसमंत भेदून मेघनाद उमटावा, तसा भीम गर्जला, ‘नरेंद्रहो! माझी प्रतिज्ञा ऐकून ठेवा. ज्या दुःशासनानं द्रौपदीच्या केसांना स्पर्श केला, त्याचं वक्षस्थळ नखाग्रांनी फोडून मी त्यांच रक्त प्राशन करीन अन् उन्मत्तपणं भरसभेत उघडी मांडी दाखवणाऱ्या दुर्योधनाची मांडी मी माझ्या गदेनं छिन्नविछिन्न करून टाकीन, तव्हाच माझी प्रतिज्ञा पुरी होईल.’
37%
Flag icon
त्या आज्ञेने सारी सभा जागच्या जागी थिजून गेली. दास पुढे सरसावलेले पाहताच युधिष्ठिराने आपली राजभूषणे उतरवली. वस्त्रे सोडून ठेवली, इतर पांडवांनी त्याचे अनुकरण केले. पतींची ती केविलवाणी अवस्था पाहून द्रौपदीने डोळ्यांवर हात घेतले. द्रौपदीच्या त्या कृतीने कर्णाचे लक्ष तिच्यावर खिळले. त्याने दुःशासनाला आज्ञा केली, ‘दु:शासना! हे दास जसे विवस्त्र झाले, तसेच या पांचालीला विवस्त्र कर! राजहंसी कशी असते, ते आज या सूतपुत्राला पाहायचंय्. सामान्य स्त्रीपेक्षा राजस्त्री केवढी वेगळी असते, हे जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. पाहतोस काय? त्या एकवस्त्रेला विवस्त्र कर!’ आधीच चेतनाशून्य बनलेले भीष्म, विदुर त्या ...more
38%
Flag icon
सूतकुलात जन्मलेल्या, हीन वृत्ती धरणाऱ्या पुरुषाला मी दोष देत नाही; पण त्याच्या सल्ल्यानं अघोरी कृत्याला उद्दीप्त झालेल्यांचा विवेक गेला कुठं? ही या सभेची अमर्यादा आहे. जोवर हा भीष्म इथं उभा आहे, तोवर अबलेला विवस्त्र करण्याचं धाडस कुणीही करू नये. दुःशासना, मागं फीर ही माझी आज्ञा आहे.’ दुःशासन तसाच उभा राहिला. त्याने दुर्योधनाकडे आशेने पाहिले. दुर्योधनाने स्वत:ला सावरले. आपला संताप आवरीत त्याने विचारले, ‘पितामह, ही आज्ञा कशाच्या बळावर देता आहात?’ ‘काय विचारतोस?’ भीष्म चकित होऊन म्हणाले. ‘ही आज्ञा कशाच्या बळावर देता?’ दुर्योधनाने शांतपणे पुन्हा विचारले.
39%
Flag icon
‘कृष्णा, फार उशीर झाला. जे घडू नये, ते केव्हाच घडून गेलंय्. मी एकवस्त्रा, पण पुरुष म्हणवून घेणाऱ्यांनी ती अवस्था जाणली नाही. प्रत्यक्ष पतींनीच मी अशा अवस्थेत राजसभेत यावं, असा आग्रह धरला. त्या दुःशासनानं अंत:पुरात प्रवेश करून माझ्या केसांना धरून फरफटत आणलं. कृष्णा, मी यज्ञसेन द्रुपदकन्या. मला या सभेत ओढून आणलं जातं अन् त्याची लाज कुणालाही वाटत नाही!’ आपले मृदू, नीलवर्णीय कुरळे केस डाव्या हातात धरून ते कृष्णासमोर दाखवीत द्रौपदी म्हणाली, ‘मधुसूदना, या केसांची लाज तू बाळग. दुःशासनानं ओढलेला हा केशपाश कधीही विसरू नकोस. कृष्णा, या सभेत काय घडलं नाही? या सभेत नेत्रसंकेत झाले. उघडी मांडी दाखवली गेली. ...more
39%
Flag icon
‘कृष्णे, पृथ्वीतलावर जे जे घडतं, ते फक्त ईश्वराच्या इच्छेनं, आज्ञेनं. दुष्टांचा विनाशकाल यायचा झाला, तरी पापांच्या राशी उभारण्याला संधी मिळावी लागते. तू या सुटल्या केसांसाठी कष्टी होऊ नकोस. तुझ्या पदराला स्पर्श झाला, म्हणून खंत बाळगू नकोस. अपशब्द ऐकून घ्यावे लागले, म्हणून दुःखी होऊ नकोस. या सभेतील ज्यांनी ज्यांनी हा प्रकार केला, पाहिला, सोसला, त्या सर्वांचा रणांगणावर विदारक मृत्यू पाहूनच मी देह ठेवीन. साऱ्या कौरवस्त्रिया अशाच आपल्या सुटल्या केसांनी आणि मोकळ्या कपाळांनी शोक करीत जाताना तुला दिसतील. ते घडेपर्यंत माझ्या मनाला शांती लाभणार नाही. त्यासाठीच या सभेला साक्ष ठेवून मी प्रतिज्ञाबद्ध होत ...more
40%
Flag icon
‘प्रजापालन हा सम्राटपदाचा प्रथम गुण. सम्राटांना प्रजा ही मुलासारखी. तुमच्या मनात पांडवांबद्दल वैरभाव असेल; पण ज्या क्षणी ते द्यूतात हरले, दास बनले, तेव्हा ते तुमचे प्रजानन झाले नाहीत का? ही द्रौपदी दासीच नव्हे, प्रजानन आहे, हे तुमच्या कुणाच्याच कसं ध्यानी आलं नाही? जे सम्राट प्रजेला नग्न करू इच्छितात, ते सम्राट कसले?’
40%
Flag icon
‘वीरहो! मी असं ऐकलंय् की, पुण्यसंचयासाठी यज्ञ योजला जातो, तेव्हा यज्ञाचा नाश करण्यासाठी दुष्ट राक्षस आकाशातून अवतरतात. त्या यज्ञभूमीचा नाश करतात; पण आज ते खोटं असावं, असं वाटतं. यज्ञामध्ये मंत्रोच्चाराबरोबर जी तुपाची धार धरली जाते, यज्ञकुंडात जी सुगंधी काष्ठं प्रज्वलित होतात, त्या समिधा अग्निरूप घेत असतात. धुराचे लोट उठतात. त्यातूनच अहंकाराचे राक्षस उद्‌भवतात. वासनेची आसक्ती, ऐश्वर्याचा मद अन् सत्तेचा अहंकार यांनीच तुमच्या ज्ञानयज्ञाचा नाश झाला आहे, हे सत्य इथं बसलेल्या द्रोणाचार्यांनी, कृपाचार्यांनी तुम्हांला सांगायला हवं होतं, पण ज्यांच्या विवेकावर दास्याची पुटं चढली आहेत, त्यांची जिव्हा हा ...more
40%
Flag icon
‘पांडवांनी मनोरंजनासाठी उभारलेली मयसभा करमणुकीसाठी होती. यज्ञाचा शीण घालवण्यासाठी ती उभारली होती. ती मयसभा खरोखरीच अलौकिक होती. ज्यांवर मानवाचा संपूर्ण विश्वास, ते कान, नाक व डोळे किती फसवे आहेत, हे ती मयसभा दाखवून देत होती; पण ही तोरणस्फटिका म्हणजे विश्वासघाताचं मूर्तिमंत प्रतीक. या द्यूतगृहाला नरकातसुद्धा जागा नाही. एका रजस्वलेच्या दर्शनानं रक्तलांछित झालेली ती तोरणस्फटिका कसली, ती तर साक्षात रौरववर्तिका! आपल्या क्षुद्र, हीन, दुर्बल मनोवृत्तीचं तोरण आपल्याच हातानं त्या यज्ञवेदीवर चढवताना लाज कशी वाटली नाही?’
Saurabh L
So starting the book I was on Karna's side. Then starting this scene,I did realize how Karna - Duryodhan did wrong by letting their emotions take over. They had won but did not need to go insult everyone so much. But at the same time I hate Draupadi's ego, Krushna being biased. Communication is the key, why couldn't Krushna change Karna, Duryodhan or more than that Draupadi. Maybe I am missing the whole Mahabharat point that this all needed to cleanse stuff but that will just prove that many people had to just take the loss
41%
Flag icon
‘पूज्य भरतश्रेष्ठा! आपल्या अभयामुळं मी निश्चिंत झालेय्. द्यायचाच असेल, तर एक वर द्या. धर्माचं अनुर्वतन करणारे माझे सर्व पती अ-दास होवोत. माझी मुलं दास्यातून मुक्त होवोत.’ सारी सभा त्या वराने चकित झाली. धृतराष्ट्र म्हणाला, ‘तसंच होवो! हे भद्रे, तू योग्य तोच वर मागितलास. मी प्रसन्न आहे. आणखी वर माग. तू एका वराला योग्य नाहीस, म्हणूनच मी तुला दुसरा वर मागण्यास सांगत आहे.’ ‘पाची पंडुपुत्र आपापले रथ, शस्त्रं यांसह कौरवांच्या दास्यातून मुक्त होवोत.’ ‘तथास्तु! पण, याज्ञसेने, वर मागून घेताना संकोच कसला करतेस? तुमचं राज्य, ऐश्वर्य सारं मागून घे. मी तुला आनंदानं ते देईन. त्यासाठी मी तुला तिसरा वर देत ...more
Saurabh L
Wth though uno reverse
42%
Flag icon
कृष्ण द्रौपदीसह जाताना पाहून दुर्योधन सावध झाला. महाकष्टाने आखलेला डाव कृष्णाच्या येण्याने पुरा उधळला गेला होता. दुर्योधन संतापाने उभा राहिला. त्याचवेळी कृष्णाने मागे वळून पाहिले. ती दाहक दृष्टी पाहताच दुर्योधन नकळत उठला, तसा परत आसनावर बसला. त्याची दृष्टी परत जेव्हा सभागृहाच्या द्वाराकडे गेली, तेव्हा तेथे कृष्ण व द्रौपदी नव्हती. राजद्वार मोकळे होते.
« Prev 1 3