More on this book
Community
Kindle Notes & Highlights
त्या तोरणस्फटिकेत एकटा कर्ण उरला होता. ते रत्नजडित सभागृह, ती सुवर्णासने, ते भव्य सिंहासन कर्ण पाहत होता. कर्ण आपल्या आसनावरून उठला. ऐश्वर्यसंपन्न असलेले ते सभागृह भयावह वाटत होते. एक वेगळीच उजाड उदासीनता त्यावर पसरली होती. हे ऐश्वर्य, ही मोकळी सुवर्णासनं, हे सिंहासन आणि हे धारण करणारी ही भूमी अशीच मोकळी राहणार! केव्हा ना केव्हा तरी हे घडणार आहे. ते अटळ आहे. मग ही ईर्ष्या, हा मत्सर, हा अपमान कशासाठी? यानं जन्ममृत्यूचं आह्वान टळणार आहे का?
I love the perspective that among all the pure good and pure bad characters Karna is only Human.
Losing the cool, thinking on mistakes etc.
हस्तमुद्रा! ज्या मोकळ्या हातांनी फाशांची दाने टाकली, ते हात सारे जिंकूनही मोकळेच राहिले. ज्या हातांनी द्यूतचा पट मांडला, तो द्यूत जिंकताच त्याच हातांनी तो पट उधळून दिला होता. आता द्यूतपट साधी लाकडी फळी बनली होती. फाशांना हस्तिदंती सोंगट्यांखेरीज काही अर्थ उरला नव्हता. पण याखेरीज फाशांना रूप लाभत नाही का? मानवी बुद्धीने रचलेला द्यूतत किती सहजपणे उधळला गेला! कोणत्या इच्छेने? ऐन वेळी कृष्ण कसा आला? कर्णाच्या चेहऱ्यावर एक खिन्न स्मित उमटले. ज्याला आईनं टाकलं, त्याला हे विधात्याचं भाकीत कळणार कसं?
‘काय केलं? आज सारी नगरी तेच बोलत आहे. धार्ष्ट्य असलं, तर ऐक जा- तुझ्या सल्ल्यांन तो द्यूत घडला. तू तो घडवून आणलास, असं सारे बोलतात.’ ‘खोटं! तात, मी युद्धाचा सल्ला दिला होता. या द्यूतात माझा कसलाही हात नव्हता.’ ‘पण लोकांना ते पटत नाही.’ ‘त्याला मी काय करणार?’ ‘अन् त्यांचं खोटंही नाही. तू आग्रह धरला असतास, तर युवराज द्यूत खेळले नसते.’ ‘युवराज एवढे आज्ञाधारक केव्हापासून बनले?’ कर्ण हसत म्हणाला. ‘राधेया, मी जेवढा तुला ओळखतो, तेवढाच युवराजांनाही. तुझा विरोध सहन करण्याची ताकद युवराजांना नाही, हे मला पूर्णपणे माहीत आहे... अन् हे सारं तू उघड्या डोळ्यांनी पाहिलंस, घडू दिलंस. हेच तुझं पातक आहे. कर्णा,
...more
‘अंगराज! एवढं अशुभ चिंतू नये. अंगावरच्या वस्त्रांनिशी पांडव चालत गेलेले तू पाहिलं नाहीस, वाटतं?’ शकुनीने विचारले. ‘अन् त्यांच्या पाठोपाठ नगरसीमेपर्यंत सारं हस्तिनापूर अश्रू ढाळीत जात होतं, ते तुम्ही पाहिलं नाहीत?’ कर्णाने उलट विचारले, ‘आज रडतील. उद्या हसतील.’ ‘कुणाला?’ ‘काय म्हटलंस?’ शकुनीने विचारले.
‘कशाच्या बळावर? फाशांच्या? ती कला अजून शकुनींनाही अवगत झाली नाही. युवराज, स्वतःचं रूप फाशांच्या पटावर विसरू नका. भर स्वयंवरातून राजकन्येचं हरण करण्याचं ज्याचं धार्ष्ट्य आहे, मित्रासाठी अंगदेशाचं राज्य फेकण्याचं ज्याचं औदार्य आहे, ज्याच्या हातातली गदा बलरामकृपेनं अजोड आहे, तो कौरवराज्याचा युवराज द्यूतपटामध्ये गुंततो, याखेरीज दुर्दैव कोणतं? शकुनींच्या हस्तलाघवानं राज्यं सांभाळली जात नाहीत. रणांगणावरचा जुगार निश्चितपणं द्यूतपटावर ठरवला जात नाही.’
‘जेव्हा शत्रूनं वेढलं, चारी दिशा व्यापल्या, अटळ पराजय समोर दिसू लागला, त्याच वेळी, वसू, साक्षात तूच समोर उभी राहिलीस अन् एका तुझ्या आठवणीबरोबर जीवनाची सारी आसक्ती उफाळून वर आली. पुरुषत्वाचा अहंकार, स्वाभिमान, अस्मिता साऱ्यांचा क्षणात विसर पडला. जीवनाची सारी आसक्ती तुझ्या रूपानं प्रगट झाली. माझ्या एकाकी जीवनातला एक ओलावा एवढा प्रबळ आहे तर ज्यांच्या जीवनांत उदंड स्नेह उदंड ऐश्वर्य असेल, त्या वीरांचं काय होत असेल? वसू, माझ्या जीवनातील तुझं स्थान किती मोठं आहे, हे मला त्या मृत्यूच्या रेषेवर उभं असता प्रथमच जाणवलं.’
कर्णाच्या ओठांवर विलसणारे स्मित पाहून भीष्मांचा संताप वाढला. ‘राधेया, हा दासीपरिवार नाही. ही कौरवसभा आहे. इथं हा अहंकार चालणार नाही.’ कर्णाने मान तुकवली. भीष्म बोलत होते, ‘घोषयात्रेचं निमित्त तुम्ही पुढं केलंत, तेव्हाच मी विरोध केला होता; पण सम्राटांची आर्जवं करून तुम्ही संमती मिळवलीत. नको ते धाडस केलंत अन् स्वतःच्या फजितीला कारणीभूत झलात. एवढं होऊनही त्याची लाज तुम्हां कोणालाच वाटू नये, याचं आश्चर्य वाटतं.’ ‘आमच्या हातून असं कोणतं कर्म घडलं, की ज्याची लाज आम्ही बाळगावी, आपला संताप वाढावा? त्याचं कारण कळेल?’ भीष्म त्या प्रश्नाने अवाक् झाले.
‘पितामह! पांडवांचं कौतुक एवढं करू नका. आम्ही मृगयेला जातो काय! त्याच सरोवरात त्याच वेळी गंधर्व क्रीडेसाठी उतरतात काय! गंधर्व युवराजांना पकडून नेतात अन् अर्जुन मदतीला धावून येतो. अर्जुन एवढा पराक्रमी झाला केव्हापासून!’
‘मला ते सामर्थ आहे. मी एकटा दिग्विजय करून कौरवांची रत्नघरं परत समृद्ध करीन.’ ‘केव्हा?’ भीष्मांनी विचारले. कर्णाने आपली दृष्टी पितामहांच्या दृष्टीला खिळवली. तो म्हणाला, ‘पितामह! पराक्रमाच्या लालसेनं नव्हे, तर मित्राचा कलंक धुऊन काढण्यासाठी मी लवकरच दिग्विजयासाठी बाहेर पडेन. पांडवांच्या राजसूयापेक्षाही भव्य असा यज्ञ पार पाडून दाखवीन. एकच विनंती आहे. ज्या वेळी मी दिग्विजयावरून परत येईन, तेव्हा आज माझ्या निर्भर्त्सनेसाठी जशी राजसभा आयोजित केलीत, तशीच राजसभा माझ्या स्वागतासाठी आयोजित करा. या राजसभेत परत येईन, तो सन्मान भोगण्यासाठीच येईन. येतो मी!’ ‘कर्णा, तुझा विजय असो.’ म्हणत दुर्योधनाने भर
...more
‘युवराज, आपण म्हणता, ते सत्य आहे; पण त्याचबरोबर एका कुलात दोन राजसूय होत नसतात. जोपर्यंत आपण युधिष्ठिराला जिंकलं नाही, तोवर आपणांस राजसूयाचा अधिकार नाही. काही कारणानं कधी युधिष्ठिराचा पराभव झालाच, तर राजसूयाचा अधिकार लाभेल.’ ‘युवराजांना यज्ञच करता येणार नाही?’ कर्णाने विचारले. ‘तसं नाही. युवराज, राजसूयाशी स्पर्धा करणारा वैष्णवयज्ञ तुम्ही करा. त्यायोगे विपुल कीर्ती तुम्हांला मिळेल. तुम्हांला करभार देणारे भूपाल आहेत. ते तुम्हांला घडविलेलं व खाणीतून काढलेलं सुवर्ण देतील. त्या सोन्याचा नांगर करून त्यानं यज्ञभूमी नांगरून द्या आणि राजसूयाइतकंच श्रेष्ठ असं हे सत्र निर्विघ्नपणे पार पाडा!’ पुरोहितांनी
...more
‘भीम म्हणाले’, दूत सांगू लागला, “त्या दुर्योधनाला जाऊन सांग. ज्या वर्षी प्रतिज्ञेची तेरा वर्षं पूर्ण होतील, तेव्हा नराधिपती धर्मराज रणयज्ञामध्ये शस्त्रास्त्रांच्या प्रदीप्त अग्नीमध्ये दुर्योधनाची आहुती देण्यास सज्ज होईल, तेव्हाच कुंतीपुत्र तिथं येतील अन् जेव्हा हा धर्मात्मा युधिष्ठिर, सर्व धृतराष्ट्रपुत्र स्वतःच क्रोधानं उद्दीपित झाले असता, त्यांना अधिक प्रज्वलित करणारा क्रोधरूपी हवीचा प्रक्षेप करील, तेव्हा मीही तिथं येईन.” सारी सभा तो निरोप ऐकून सून्न झाली.
‘युवराज, तो भीम मुळातच संतापी. त्याच्या बोलण्याकडं लक्ष न देता क्षमाभाव जागृत करावा. जिथं यज्ञ होणार आहे, त्या भूमीत क्रोध, मत्सर, अपमान यांना स्थान नसतं.’ भीष्म म्हणाले. कर्णाच्या चेहऱ्यावर उद्वेगजन्य स्मित पसरले. तो भीष्मांना म्हणाला, ‘पितामह, हा विचार योग्य आहे, तर तो शिशुपालवधाआधी कृष्णाला का दिला नाहीत? ती यज्ञभूमी सज्ज होत असतानाच त्या भूमीवर रक्त का सांडू दिलंत? का तिथं नरबलीची आवश्यकता होती?’ भीष्म काही बोलले नाहीत. भीमाच्या त्या निरोपाने कर्णाचा संताप उसळला. तो उभा राहिला. ‘सामोपचारानं आमंत्रण पाठवलं, तर हा निरोप? वनवास भोगत असतानाही रणयज्ञात सर्व कौरवांची आहुती घालण्याचा संदेश पांडव
...more
‘जोवर मी अर्जुनाचा वध केला नाही, तोवर दुसऱ्याकडून पादप्रक्षालन करून घेणार नाही. मद्य अन् मांस वर्ज्य करीन अन् कोणाही याचकाला इष्ट वस्तू देण्याचं व्रत अखंड चालवीन. या व्रताचा मी आज नियम करीत आहे.’
‘कर्णा, आता लौकरच पांडवांचा वनवास संपेल. अज्ञातवासाचं वर्ष उलटताच ते प्रगट होतील. वर्षा-ऋतूत क्षुधेनं व्याकूळ झालेले मृगेंद्र वर्षा-ऋतू संपताच मृगयेसाठी जसे बाहेर पडतात, तसे पांडव बाहेर पडतील- पृथ्वी पादाक्रांत करण्यासाठी. त्या पांडवांच्या भावी विजयासाठी प्रत्यक्ष इंद्र उद्या तुइयाकडं येईल.’ ‘देवेंद्र इंद्र? अन् माझ्याकडं?’ ‘हो! अन् तोही याचक म्हणून.’ ‘पण इंद्रदेवांना पांडवांसाठी कष्ट घेण्याचं कारण?’ ‘कारण जसा तू साझा भक्त आहेस, तसा अर्जुन इंद्राचा.’
‘आज्ञा! देवा, आपण आपल्या तेजानं पृथ्वी प्रकाशमान करता. त्या प्रकाशात जशी पुण्यकर्मं घडतात, तशीच पापकर्मंही; पण ती पापं घडतात, म्हणून आपण आपल्या प्रकाशाला कधी आवर घातलात का? याचकाला देणं एवढंच माझ्या हाती आहे. ते कोणा, कशासाठी वापरतं, याचा विचार करण्याचा मला अधिकार नाही. तो माझा धर्मही नव्हे.’ ‘तुझ्या बोलण्यानं मी तुझ्यावर प्रसन्न आहे. क्षणभर तू माझं देवत्व विसर; पण एक गोष्ट लक्षात घे. मी असतो आकाशी अन् कर्म घडतं पृथ्वीवर. त्या पापपुण्यांचा मला स्पर्श नसतो. पण कुणी माझं तेज मागितलं, तर ते मी कदापिही देणार नाही. कारण तसं झालं, तर त्या वेळी मी सूर्य राहणार नाही. मी त्या तेजाला बद्ध आहे, तसाच तूही
...more
हिरण्यवर्णीय दीर्घबाहू इंद्राचे वज्रधारी रूप पाहून कर्ण तृप्त झाला. कर्णावर छाया पसरली. गार वाऱ्यांचा झोत अखंड वाहू लागला. कर्णाने वर पाहिले. आकाशात एक कृष्णमेघ त्या दोघांवर सावली धरून उभा होता. अत्यंत आदरयुक्त भावाने कर्णाने इंदरला वंदन केले
‘राधेया, देवांना सारंच पेलतं, असं थोडंच आहे? तुझं निर्मळ रूप सामावून घेण्याची शक्ती माझी नाही. कर्णा, तुझं दातृत्व, तुझा सद्भाव अलौकिक आहे. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला काही हवं असेल, तर मागून घे.’
त्याची दयनीय स्थिती पाहून विराटाघरी आश्रयाला राहिलेले अज्ञातवासातले पांडव प्रगट झाले. तुंबळ युद्धात पांडवांनी कौरवांचा पराजय केला. विराटाला सोडवले. त्या युद्धात अर्जुनाने कर्णाचा, भीष्मांचा, द्रोणांचा पराभव केला.
‘पण ते अंध...’ कृष्ण म्हणाला. ‘अंध असल्यामुळं राज्याचा अधिकार नष्ट होत नाही. तसं असतं, तर पंडूंनी जे राज्य सांभाळलं, ते राज्य अंध तातांच्या हाती देऊन, मृगयेच्या निमित्तानं वनवास गाठला नसता. कृष्णा, नम्रतेनं सांगावंसं वाटतं. गोकुळात नंदाची निवड केली जाते, त्या पद्धतीनं राज्याचा वारस निवडला जात नाही. शतकौरव असले, तरी साम्राज्याचे शत तुकडे पडत नाहीत. ते एकसंधच राहतं.’ ‘हो ना! मग त्या शतकौरवांच्या पोषणाची जशी कौरवसाम्राज्याची जबाबदारी आहे, तशीच त्याच कुलात जन्मलेल्या पाच पांडवांचीही.’ ‘पाच पांडव!’ दुर्योधन हसला. ‘कृष्णा, या राजसभेतल्या अनेक श्रेष्ठांना तुझ्या सामर्थाचं कौतुक वाटतं. ते तुला
...more
‘परिणाम कसला? फार तर युद्धात मरेन मी! एवढंच ना? क्षत्रियाला त्याहून श्रेष्ठ मृत्यू नाही. युद्धात अस्त्रांनी जर मरण आलं, तर आम्ही स्वर्गालाच जाऊ. कृष्णा, वेळूप्रमाणं अस्थानीही भग्न व्हावं, पण कुणापुढं नम्र होऊ नये, हे श्रेष्ठ वचन आहे. माझ्या पित्याकडून जो राज्यांश मला मिळालाय्, तो मी जिवंत असेपर्यंत कुणाला परत देणार नाही. जोवर राजा धृतराष्ट्र प्राण धारण करीत आहेत, तोवर आम्ही व ते पांडव यांतील कोणत्या तरी एका पक्षानं क्षत्रिय धर्माचा त्याग करून, भिक्षुकाप्रमाणं आयतं सिद्ध असलेलं अत्र भक्षण करूनच जिवंत राहिल पाहिजे.
कर्णाने गांधारीकडे पाहिले होते. निळे रेशमी वस्त्र नेसून ती उभी होती. डोळ्यांवर काळी पट्टी बांधली होती. भव्य, आतिगौर कपाळ, धारदार नासिका, पातळ गुलाबा ओठ, त्या रूपाच सौंदर्य दर्शवीत होते. त्या उंच आकृतीचा हात पुढे झाला. घंटेचा नाद हेलावावा, तशी राजमाता बोलत होती
‘नुसत्या उदात्त कल्पना बाळगून वास्तवात जगता येत नाही, युवराज!’ विदुर म्हणाला, ‘अजूनही वेळ गेलेली नाही. भगवान श्रीकृष्ण तुमच्या निरोपाची वाट पाहत आहेत. पांडव आता राज्यही मागत नाहीत. त्यांना फक्त पाच गावं हवी आहेत.’ ‘याचक म्हणून नव्हे. विदुरकाका, ते मागतात दायाद म्हणून. कौरवसाम्राज्याचे वारस म्हणून. एकदा ती चूक केलीत अन् पांडवांची मजल तात जिवंत असता राजसूय यज्ञ करण्यापर्यंत गेली. तुम्हांला सवड असेल, पण परत ते पाहण्याचं बळ मला नाही.
‘अरे, त्या थोर पंडुपुत्रांची या राधेयाशी तुलना करू नकोस.’ विदुर कळवळले.
‘दुर्योधना! अरे, तू किती जणांना दुखवणार आहेस? तुझ्या हट्टी स्वभावामुळं तू युद्ध उभारलंस, तर पांडवप्रेमानं सदैव त्यांचं हित चिंतणारे हे भीष्म, द्रोण, कृप तुझ्या बाजूनं लढतील का? फार झालं, तर तुझ्या अत्रवर वाढल्यामुळं ते कौरवांच्या बाजूनं आपलं जीवित अर्पण करतील; पण त्या युधिष्ठिराकडं क्रोधानं पाहण्यासही धजणार नाहीत.’
‘हो! उद्या पांडवांनी जिंकलं, तरी लोक ते कृष्णानं जिंकलं, असं म्हणतील. त्यापेक्षा तुमच्या दैवी गुणसंपत्र कृष्णाशी आम्ही लढलो, हे मला यशापेक्षा जास्त आहे.’
‘माझं स्थान!’ कर्ण सावध होत होता. ‘हो! तुझं स्थान पांडवांकडं आहे. मानाचं! ऐश्वर्याचं! हे श्रेष्ठ कौंतेया, तू माझ्याबरोबर पांडवांकडं चल. ते तुझे धर्मनिष्ठ, वीरबाहू पाची भ्राते तुझ्या चरणांना आनंदानं मिठी घालतील. सर्व पांडवपुत्र अन् त्यांचे सहायक राजे तुझ्यापुढ नतमस्तक होतील. अन् द्रौपदी तुला सहावा पती म्हणून स्वीकारील. एवढंच नव्हे, यादवकुलाचा प्रमुख म्हणून मी तुलाच अनुसरीन. दाशार्हांसह दाशार्ण तुझे अनुयायी होतील!’
‘कर्णा, माझं ऐक! अजून वेळ गेलेली नाही.’ ‘नाही, रे कृष्णा! ती वेळ केव्हाच हरवली. शस्त्र-स्पर्धेच्या वेळी माझा अपमान झाला. कृपाचार्यांनी माझं कुल विचारलं, तेव्हा कुंती मातेनं सांगायला हवं होतं. ती वेळ होती. भर स्वयंवरात द्रौपदीनं माझा सूतपुत्र म्हणून उपहास केला होता, तेव्हा तू सांगायला हवं होतंस. ती वेळी होती...’ ‘पण अजून काही घडलं नाही.’ ‘असं आपल्याला वाटतं. पांडवांचं हित पाहत असता, दुर्योधनाकडं मात्र आपलं दुर्लक्ष होतं.’ ‘मला त्याच्याकडं पाहायचं कारण?’ ‘काही नाही; पण मला तसं वागता येईल? बाळपणापासून स्नेह लाभला, तो त्याचा. त्यात कधीही दुरावा आला नाही. शस्त्र-स्पर्धेच्या वेळी जे मातेला जमलं
...more
‘क्षत्रिय कधी मैत्रीला पारखा होत नाही, असं म्हणतात. तो संस्कार जपत असतानाच माझ्या जीवनाचा शेवट होऊ दे.’
‘कृष्णा, एक विनंती आहे.’ ‘बोल!’ ‘कृपा करून हे रहस्य असंच राहू दे. त्या युधिष्ठिराला हे सांगू नका. तो धर्मनिष्ठ, भावनाविवश, माझा जुगारी बंधू धर्म, माझं-त्याचं नातं कळलं, तर माझ्यासाठी आपल्या बांधवांसकट सर्वस्व पणाला लावील अन् कृतहस्त, अतिदेवी अशा त्या दैवा च्या अधीन मला एकटयाला करून तो आनंदानं वनवासी होऊन जाईल.’
‘छाया?’ कर्णाने पडलेल्या प्रखर उन्हाकडे पाहिले, ‘महाराज, छाया लाभणं दैवी असावं लागतं. तो अर्जुन इंद्रभक्त ना? त्याला जीवनात आपल्या कृपेची सावली लाभली. मी सूर्यभक्त तेजात होरपळून जाणं, दाहात सदैव उभं राहणं, एकाकी, हेच माझं जीवन. त्यात सावली अवतरेल कशाला?’
‘युद्धभूमीवर अर्जुनाचं सारथ्य करीत आपण सामोरे याल, तेव्हा धनुष्याची प्रत्यंचा खेचण्याचं बळ राहावं.’ ‘आणि...’ ‘जीवन निष्कलंक राहावं,.. मृत्यू वीरोचित यावा.’ कर्ण कृष्णदृष्टी टाळीत म्हणाला, ‘आप्तस्वकीयांचा वध माझ्या हातून घडू नये...’ काही क्षण उसंत घेऊन कर्ण म्हणून, ‘आणखी एक इच्छा होती...’ कृष्णाच्या गालांवरून अश्रू ओघळले. ते पुशीत कृष्णाने विचारले, ‘कसली इच्छा?’ ‘केव्हातरी आपली बासरी परत ऐकायला मिळावी, असं वाटत होतं. पण ते जमायचं नाही.’ ‘नाही, कर्णा! तुला जरूर मी बासरी ऐकवीन. त्यात कृतार्थता सामावलेली असेल.’ टापांच्या आवाजाने दोघे भानावर आले.
‘हे! तातांच्या रथपरीक्षेची पद्धत मला माहीत नाही, असं कसं होईल? तातांना समतोल रथ सिद्ध करण्याची कला संपूर्ण अवगत होती, पण तेवढंच ज्ञान रथपरीक्षेला पुरं होत नाही, हे कधीच त्यांच्या लक्षात आलं नाही. सुसज्ज, समतोल रथ बलवान अश्वांकडून जरी ओढला जात असला, तरी रथचक्र दैवगतीनंच फिरत असतं, हे कधीच त्यांच्या मनाला स्पर्शलं नाही. जीवनरथाचंसुद्धा असंच असतं. विद्या, व्यासंग आणि अनुभवानं जीवनरथ असाच सिद्ध होत असतो. केव्हातरी अहंकारापोटी संयमाच्या कुण्या काढून रथपरीक्षा करण्याची इच्छा होते; अन् सामान्य मोहाचा खळगासुद्धा जीवनावर मात करण्यास समर्थ ठरतो.’
‘माणसं जातात. माघारी राहतं, ते त्यांचं आसन. ते तसंच मोकळं राहतं. राहावं! तरच जीवनाला अर्थ! कर्णा, माणसानं एवढं कीर्तिवंत व्हावं की, त्याच्या माघारी त्याचं आसन बराच काळ तसंच मोकळं राहावं ती जागा व्यापण्याचं धाष्टर्य कुणाला होऊ नये.’
‘माते, आशीर्वाद दे!’ ‘मी कसला आशीर्वाद देऊ? माझा प्रत्येक श्वास हा तुझ्यासाठी सोडलेला आशीर्वादच होता.’ ‘जयाची आकांक्षा माझ्या मनात नाही. पराजयाची भीती मुळीच राहिली नाही. माते, एकच आशीर्वाद देऊन जा. ज्या सहजपणे तू मृत्यूला सामोरी जात आहेस, ते बळ मला लाभावं. मृत्यूचं भय मला वाटू नये.’
‘त्या प्रकाशानं माझ्या विनवणीला जुमानलं नाही. त्याच्या तेजात मी कधी बद्ध झाले, तेही मला कळलं नाही. तू माझ्या उदरी वाढत होतास. रात्रंदिवस जिवाला सुख नव्हतं. कुमारी माता! पितृकुलाला केवढा कलंक लागला असता! मी विश्वासू सखीसह आश्रमात राहू लागले. ऋषीच्या सेवेत रमलेल्या मुलीचा छंद म्हणून पित्यानंही ते सहन केलं. तुझा जन्म झाला. भर रात्री अश्व नदीच्या लाटांवर तुला सोडलं, ते उरीचा पान्हा आटला होता, म्हणून नव्हे. त्या पितृगृहाच्या निष्ठेनंच ते बळ दिलं. आई होण्याचं दुर्दैव काय असतं, हे तुला कळणार नाही.
‘माते! तुला निदान निष्ठेचं तरी बळ आहे. पण माझ्या माथी काय? वाहत जाणं! येईल त्या प्रवाहाबरोबर वाहत जाणं... एवढंच ना? तू ज्या क्षणी या मुलाला नदीप्रवाहाबरोबर सोडलंस ना, त्या दिवसापासून मी वाहतच आहे. नियतीच्या लाटांवर वाहण्याखेरीज पोरकं पोर दुसरं काय करणार?’
‘कुठं?’ कुंतीने आश्चर्याने विचारले. ‘माझ्याबरोबर! या ऐलतीरावर... जिथं मी आहे, तिथं. राजमाता म्हणून कदाचित तिथं तुझा गौरव होणार नाही; पण कर्णाची आई म्हणून कौरवश्रेष्ठ दुर्योधन तुझ्यापुढं नतमस्तक होईल, हे मी अभिमानानं सांगू शकतो.’ कर्ण असे काहीतरी बोलेल, असे कुंतीला स्वप्नातही वाटले नव्हते. कर्णाच्या बोलण्याने ती चकित झाली. तिला उत्तर सुचत नव्हते. कुंतीच्या त्या मुग्धतेने कर्ण खिन्न बनला. ‘पाहिलसं, माते! मी तुला नकोय्. तुला हवीत तुझी मुलं- जी तुझ्या प्रेमाखाली सहवासात वाढली, तुला चिंता आहे त्यांची. माझ्यापासून त्यांच्या जीवनाला धोका आहे असं वाटतं, म्हणूनच तू आज इथं येण्याचं धाडस केलंस.’ ‘कर्णा
मी कुणालाच नकोय् तसं पाहिलं, तर मला कुठंच जागा नाही. नदीप्रवाहावर सोडलेल्या या तुझ्या मुलाचा प्रवास असाच चालू राहील. एक ना एक दिवस सारे प्रवाह त्या अथांग सागराला मिळतात, असं मी ऐकतो. केव्हातरी तो सागर आपल्यात मला सामावून घेईल. हा माझा अधांतरी प्रवास कुठंतरी काठावर मध्येच थांबू नये. तो सागरापर्यंत सरळ जावा, एवढाच आशीर्वाद तू दे.’
‘मी तुझी मुळीच निराशा करणार नाही. ज्या कर्णानं प्रत्यक्ष शत्रूला सुद्धा कधी रिक्त हस्तानं माघारी जाऊ दिलं नाही, तो कर्ण आपल्या जन्मदात्रीला निराश कसा करील? माते, तू चिंता करू नकोस. तुझं इच्छित सफल होईल, माते! मी मातृ-ऋणाला बद्ध आहे पण मित्र-ऋणातही माझं पुरं जीवित गुंतवलंय् त्यासाठी मी तुझ्या पुत्रांशी युद्ध करीन. तुझे पुत्र वस्तुत: वधार्ह आहेत. मला त्यांचा संहार करणं शक्य आहे. अर्जुन हीच पांडवांची खरी शक्ती आहे. मी युद्ध त्याच्याशीच करीन. हे यशस्विनी, आम्हां दोघांपैकी कोणीही मृत्यू पावला, तरी तुझे पाच पुत्र शिल्लक राहतील, यापेक्षा दुसरं वचन मी तुला देऊ शकत नाही. ती अपेक्षाही तू करू नकोस.’
‘माते! या कर्णानं एकदाच असत्याची कास धरली- गुरुदेव परशुरामांकडून ब्रह्मास्त्र मिळवण्यासाठी.’ ‘कर्णा, मी ऐकलंय् की, द्रौपदी राजसभेत दासी म्हणून गेली, तेव्हा तिच्या वस्त्रहरणाचा सल्ला तू दिलास. मला ते खरं वाटत नाही. माझ्या कुशीत जन्मलेलं पोर असल्या अधर्माला प्रवृत्त होईल, यावर माझा विश्वास बसत नाही. ते शल्य माझ्या मनाला सदैव बोचतं. सांग, कर्णा, ते खोतं आहे हे ऐकायला मी आतुर झाले आहे.’ कर्ण क्षणभर त्रस्त झाला. त्या आठवणीबरोबर साऱ्या भावना उफाळून आल्या. ‘अगदी खरं! ते मी सांगितलं, हे अगदी खरं आहे.’
‘तीच द्रौपदी दासी म्हणून कौरव राजसभेत आली, तेव्हा तिचं मी लावण्य पाहत नव्हतो. असहाय स्थिती मी जाणत नव्हतो. दिसत होता फक्त तिचा अमर्याद अहंकार. वासनेचा तिथं लवलेशही नव्हता. आठवत होते फक्त तिचे कठोर शब्द. सारा अहंकार उफाळून आला अन् मी ती आज्ञा दिली. सामान्य स्त्रीपेक्षा राजहंसी काय वेगळी असते, हेच मला पाहायचं होतं...’
‘द्रौपदीबद्दल माझ्या मनात एवढी प्रबळ वासना असती, तर ती राजसभेत आली, तेव्हाच दुर्योधनाला टाकलेल्या एका शब्दानं ती माझ्या अनेक दासींपैकी एक दासी बनली नसती का? वासनेला मर्यादा नसते. तिला फक्त आपलं उद्दिष्ट माहीत असतं. कृष्णाच्या एका विनंतीचा स्वीकार करूनही मी तिचा सहावा पती बनलो असतो. माझ्या कृतीबद्दल तू मला दोष देऊ नकोस. दोष द्यायचाच झाला, तर तुझ्या धर्मबुद्धी युधिष्ठिराला दे. अंध धर्म भावस्वरूपही पारखा करतो, हे त्याला समजावून सांग. नाहीतर एकवस्त्रा स्त्री, रजस्वला द्रौपदीला त्या अवस्थेत दरबारी येण्याचा आग्रह त्यानं धरला नसता.’
‘कर्णा, मी तुला दोष देत नाही; पण सांगावंसं वाटतं, तू द्रौपदीला ओळखलं नाहीस. ती तशी का वागते, हेही तुला कळायचं नाही. कारण तू पुरुष आहेस. स्त्रीमत्सर कसा व्यक्त होतो, तुला तरी कसं कळणार? संयम आणि असूया एकाच ठिकाणी कसे नांदणार? सूर्य-चंद्र एकाच वेळी आकाशात राहू शकत नाहीत. जरी राहिले, तरी एकाला तेजोहीन व्हावंच लागतं. कर्णा, येते मी. फार वेळ झाला.’
‘आई, चिंता करू नकोस, तुझ मन व्यथित होईल, असं मी काहीही करणार नाही. ज्या माझ्या वचनाचा आज तू स्वाकार करात आहस, त्यात तुला आनंद नाही, हे मी जाणता. माझ्यासाठा फक्त एकच कर. जव्हा तुझ्या या मुलाचा प्रवास संपेल, तो सागराला मिळाल्याचं तुला समजेल, तेव्हा मात्र त्याच्यासाठी दोन अश्रु ढालव समाधानचे...सुटकेचे. कारण... कर्णाला बोलणे जड जात होते. कष्टाने तो म्हणाला, ‘कारण... त्या वेळी पृथ्वीतलावर या दुर्दैवी कर्णासाठी फार थोडे अश्रु ढळतील. वृषाली. दुर्योधन, यांच्या डोळ्यांत माझ्या मृत्यूनं अश्रु तरळतील खरे, पण त्यांनाही स्वार्थाचा स्पर्श असेल. पण तुझे निखळ अश्रुः स्वर्गाची वाटचाल करण्यास मला बळ देतील.’
‘तसं नाही, वृषाली...देवानं देऊनच माणसाचं जीवन समृद्ध होता नाही ती कल्पना चुकीची आहे. सामान्यांच्या जीवनात थोडी जरी देवकृपा अवतरली, तरी ते जीवन समृद्ध बनतं. ते खरं असलं, तरी या पृथ्वीतलावर असेही काही महाभाग जन्मतात की, ज्यांच्याकडं परमेश्वर घेण्यासाठी येतो. हक्कानं. त्यातूनच ते जीवन सफल होतं. उजळून निघतं. आज जीवन सफल झाल्याचा आनंद मी भोगीत आहे. सारं ओझं कमी झालं. मनावर काही दडपण राहिलं नाही. बसू, आज मी तृप्त आहे. कृतार्थ आहे.’
‘पितामह, महारथी कर्णाबद्दल आपण काहीच बोलत नाही.’ पितामहांच्या चेहऱ्यावर उपहास प्रगटला. ते म्हणाले, ‘राधेयाचं नाव या वीरसभेत घेतोस कशाला? तो राधेय साधा रथीही नाही, मग महारथी कुठला?’ ‘पितामह?’ कर्ण संतापाने उठला. त्याच्याकडे बोट दाखवीत पितामह म्हणाले, ‘तो अर्धरथी आहे.’ सारी सभा गोठून गेली. कर्णाचा चेहरा लालबुंद झाला. अधिरथ-राधाई वियोगापेक्षाही तो घाव मोठा होता. आपल्या साऱ्या भावना संयमित करीत कर्ण म्हणाला, ‘पितामह, कशाच्या आधारावर मला अर्धरथी समजत आहात?’
‘मैत्री!’ कर्ण उसळला, ‘आचार्य, मैत्री काय असते, माहीत आहे? प्रत्येक पूजेबरोबर बदलणाऱ्या मंत्राइतकी मैत्री अस्थिर नसते. निदान तुम्ही तरी मैत्रीचा उच्चार करू नका. तुमची अन् दुपदाची मैत्री सर्वांना माहीत आहे. एकाला राजैश्वर्याचा अहंकार, तर दुसऱ्याला ज्ञानाचा विश्वास. खडग म्यानयुक्त असतं, तरी जेव्हा खडूगाला प्रगटावं लागतं, तेव्हा आवरण फेकूनच द्यावं लागतं त्या आवरणार्च अन् खडूगाचं साहचर्य असतं, म्हणून कुणी त्याला मैत्री समजू नये. मैत्रीचा अर्थ तुम्हांला कधी कळला नाही. दुपदाबद्दल स्नेह असता, तर मित्रानं केलेली चूक क्षम्य ठरली असती. पण तिर्थ उद्भवला अपमान, खोटा अहंकार, अन् त्याच अहंकारापोटी आपलं तेज,
...more
सर्वांच्या पुढे आलेल्या चक्रधराला कर्णाने विचारले, ‘आज पितामह पराक्रमाची शर्थ करतात ना?’ ‘हो! त्यांच्या पराक्रमाला तोड नव्हती. आजचा सूर्यास्त पांडवांनी पाहिला नसता.’ ‘चक्रधर!’ ‘भीष्मांच्या समोर पांडवांनी शिखंडीला आणलं. भीष्मांनी शस्र खाली ठेवलं अन् शिखंडीमागून अर्जुनानं...’ ‘भीष्मांचा वध केला? ‘नाही. पितामह धारातीर्थी पडले आहेत. ते स्वेच्छामरणी आहेत. सध्या दक्षिणायन सुरू आहे. उत्तरायणापर्यंत जीव धारण करण्याचा त्यांचा निग्रह आहे.’ ‘पितामहांना शिबिरात आणलं?’ ‘नाही. रणांगणावर जिथं ते पडले, तिथंच ते विश्रांती घेत आहेत. शरीरात घुसलेले बाणही काढण्यास त्यांनी नकार दिला आहे. दुर्योधन महाराजांनी
...more
कर्णाकडे पाहून कृष्ण जाण्यासाठी वळला. कर्ण त्वरेने उठला. त्याने हाक मारली, ‘कृष्णा S S’ कृष्ण थांबला. वळला. तो कर्णाकडे पाहत होता. त्या कृष्णरूपाला निरखीत कर्ण पुढे झाला. कर्णाचे अश्रु तसेच गालांवरून ओघळत होते, ते भरले नेत्र टिपण्याचेही भान कर्णाला नव्हते. कृष्णाच्या मुखावर मंदस्मित उमटले. त्याचा उजवा हात उंचावला गेला. त्या हाताने कर्णाचे अश्रु हळुवार निपटले गेले. कृष्णकृतीने कर्णाला अधिकच उमाळा दाटून आला आणि त्याच वेळी तो कृष्णाच्या मिठीत बद्ध झाला. क्षणभर कृष्णाचे हात कर्णाच्या पाठीवर विसावले. दुसऱ्या क्षणी कृष्ण मिठीतून दूर झाला. त्याचा उजवा हात कर्णाच्या खांद्यावर स्थिरावला. डोळे कर्णावर
...more