More on this book
Community
Kindle Notes & Highlights
‘तुला अहंकारी, अभिमानी म्हणून मी नेहमीच दूषणं देत असे; पण त्या नाही. दूषणांना फारसा अर्थ नव्हता. वीराला नुसतंच कवच आणि शिरस्त्राण असून चालत नाही अभेद्य मनाची गरज असते. अभिमान, अहंकार, ईष्य ही वीराची खरी कवचं. वीराच्या ठायी प्रगटणारे हे गुण शत्रूंना नेहमीच दुर्गुण वाटतात. अरे वत्सा, मीही क्षत्रियच आहे. माझ्यासारखा अजोड योद्धा या पृथ्वीतलावर नाही, हा अहंकार मीही बाळगतो. त्या अहंकाराला डिवचण्याचं सामर्थ्य फक्त तुझं होतं तुझ्या रूपात होतं त्यामुळं माझा मत्सर भडकत असे. तुझ्या ध्यानी यायला हवं होतं. मी केलेला तुझा अपमान हा खरा तुझा सन्मान होता.’
‘काय करू? पांडवांशी सख्य कर. ते तुझे भ्राते आहेत. तू नुसता कुन्तीपुत्र तू ज्येष्ठ कौंतेय आहेस. तुला स्वीकारण्यात पांडवांना धन्यता लाभेल. एका संयमी मातेला सुख लाभेल. कृष्णाला अत्यानंद होईल. मी सदैव शमाची इच्छा बाळगली, ती तुझ्या हातून पुरी होऊ दे. बाबा, रे, माझ्याबरोबरच या वैराची समाप्ती होऊ दे आणि सर्व राजे निरामय होऊन स्वगृही परतू देत.’ ‘आणि धृतराष्ट्रपुत्र दुर्योधन... त्याची वाट कोणती?’ कर्णाच्या आवाजात रूक्षता प्रगटली. ‘अं!’ ‘पितामह, ज्यानं माझ्या भरवशावर हे युद्ध उभं केलं, त्या दुर्योधनाला कोणती वाट मिळेल? मी पांडवांना मिळालेलं कळताच त्या माझ्या मित्राची उभ्या जागी छाती फुटेल. माझ्या जीवनात
...more
This highlight has been truncated due to consecutive passage length restrictions.
‘नाही, पितामह, ती निष्ठा आता माझ्याजवळ नाही. माझी जन्मकथा मला कळली नसती, तर फार बरं झालं असतं, कृष्णानं प्रथम मला जन्मरहस्य सांगितलं, ते शिष्टाई असफल झाल्यानंतर. त्यानंतर जिचा आयुष्यभर शोध घेत होतो, त्या मातेचं दर्शन युद्धाच्या उंबरठ्यावर घडलं. माझी खरी कवचकुंडलं हरवली, ती त्या वेळी. दोघांनीही माझ्यापासून पांडव सुरक्षित करून घेतले आहेत. आता खोटा उत्साह देण्यासाठी वल्गनेखेरीज माझ्याजवळ काहीही राहिलं नाही. गुरुदेवांचा शाप खरा होवो. ब्रह्मास्त्र आठवलं, तरी ते माझ्या भावांवर कसं सोडता येईल? मी थोरला आहे ना!’ आपले अश्रु पुशीत कर्ण म्हणाला, ‘माझ्या मैत्रीला केव्हाच तडा गेला. आता दुर्योधनाच्या
...more
जीवनात फक्त एकच मोलाचा स्नेह लाभला होता, त्यालाही अर्थ उरला नाही. जीवनाचं साफल्य पाहण्याचं माझ्या नशिबी नाही.’
‘पितामह! वर द्यायचाच झाला, तर एक द्या. मृत्यूला हवं तेव्हा सामोरं जाणारं आणि प्रसंगी मृत्यूलाही तिष्ठत ठेवणारं आपलं बळ मला द्या. तेवढा एकच वर मला द्या. कारण, माझ्या एकमेव मित्राला द्यायला माझ्या प्राणांखेरीज माझ्याजवळ काहीही राहिलेलं नाही. रणवेदीवरील आत्मसमर्पण एवढंच आता शिल्लक राहिलं आहे. ते बळ मला लाभावं.’
साऱ्यांनाच जीवनात अशी फुंकर थोडीच लाभते? अग्नी प्रज्वलित करण्याला फुंकर मारावी लागते तीच फुंकर समईची ज्योत शांत करते. तसं पहिलं, तर मानवी देह हीच एक विधात्यानं घडवलेली बासरी आहे. त्याच्या एका फुंकरीन सजीव बनलेल्या देह. मातेच्या श्वासानी जपलेला. त्या बोटाच्या जपणूखाली सुखावलेला. बाल्यावस्थेतल्या अवखळ सुरांना केव्हातरी प्रौढत्वाचा स्थिर सूर सापडतो. तारुण्यानं घातलेल्या फुंकरीनं उन्मादक सुरांची आठवण याच बासरीतून होते. आणि वार्धाक्याच्या विकल श्वासांनी तीच बासरी अस्थिर सुरांची धनी बनते. तो सुर केव्हा तुटले कशानं तूटेल, याची भीती बाळगीत असता, कालाच्या एका धीट फुंकरीनं सारे सूर विरून जातात: कायमचे,
...more
मृत्यु म्हणजे सर्वनाश नव्हे मृत्यु म्हणजे रुपांतर. ग्रीष्मकाली सूर्यकिरणांत हिमालयाचे हिमखंड वितळतात, म्हणजे का त्या बर्फाच नाश झाला म्हणायचं? मग गंगेचा पूर. ते रूप कोणतं? तीच गंगा सागराला मिळते म्हणजे का ती नाहीशी होते? ते सागररूप तिचंच नव रूप नाही का? या रूपांतराचं भय वाटतं म्हणूनच मृत्युचं त्या विचाराने कर्णाची मान ताठ झाली. एक निराळाच विश्वास त्याच्या मनात प्रगटला. रूपांतराचं भय! परिचितातून अपरिचितात जायता एवढी भीती वाटते? प्रत्येक क्षणाला रूपांतरातून जाणाऱ्या मानवाला अंतिम रुपांतराची भीती का वाटावी? आश्चर्य आहे जीवनातलं बाल्य केव्हा सरलं, तारुण्यानं, जीवनात केव्हा पदार्पण केलं,
...more
ऐहिक ऐश्वर्य व्याहरिक समाधान वासना-तृप्ती म्हणजेच का साफल्य! ते प्राण्यांनाही भोगत येतं मानवी जीवनचं साफल्य ऐहिक तृतृप्तीत नाही. या तृप्तीखेरीज आणखी एक तपती असते. ती मी संपादन केली आहे. माझ्या मृत्यूबरोबर ती तृप्ती लुप्त पावणारी नाही. परमेश्वारनं सूर भरलेल्या या बासरीतून जसे तीव्र सूर उमटले तशीच आसंख्य कोमल सुरांचीही पखरण झाली. चारित्र्य जपता आलं. उदंड स्नेह संपादन करता आला. मित्रच नव्हे, तर शत्रूही तृप्त झालेले पाहिलेले. वैरभाव पत्करला, तोही परमेश्वररुपाशी. जीवनचं यश यपेक्षा वेगळं काय असतंय़
‘कृष्णा, कशासाठी हे युद्ध? यातून काय प्राप्त होणार?’ ‘सर्वनाश!’ कृष्णाने शांतपणे सांगितले. ‘कशासाठी?’ ‘पुरुषार्थाचा अहंकार अन् सत्तेची लालसा हेच कारण.’ ‘कृष्णा, यात तुला आनंद आहे?’ आश्चर्याने विदुराने विचारले. ‘दु:ख अन् सुख यांच्या मर्यादा ओलांडून मी हा निर्णय घेतला आहे.’
‘त्याच्या जीवनात एकच कर्तव्य उरलं आहे. मित्रप्रेम! तेवढं तो निष्ठेनं पाळीत आहे.’ ‘अधर्माशी जोडलेलं सख्य, त्याला का निष्ठा समजायची?’ ‘धर्म आणि अधर्म! त्याच्या मर्यादा सांगायच्या कुणी? विदुरा, सूक्ष्मपणे सांगायचं झालं, तर धर्म हा स्वार्थप्रेरितच असतो. जेव्हा त्या स्वार्थाला तडा जातो, असं दिसतं, तेव्हा ते कारण अधर्मी भासतं.’
‘कृष्णा! हेच मलासुद्धा म्हणता येईल. हेच सत्य असेल, तर तू पांडवांच्या बाजूनं का उभा राहिलास?’ ‘त्याचं उत्तर मी शोधतोय्, विदुरा... निष्ठा स्नेहानं बांधली जाते. नुसत्या माझ्या पित्याची बहीण. पांडव माझ्या आत्याचे पुत्र. या नात्यानंच आम्ही जवळ आलो, असं नाही. या पांडवांच्या गुणांनी मी त्यांच्याकडं आकर्षित झालो. द्रौपदीशी पांडवांचा विवाह झाला, तेव्हा पांडवांच्या बाजूनं तिथं कोणी नव्हतं. मी ती उणीव भरून काढली. पांडवांना मी अगणित संपत्तीचा अहेर केला. त्यांच्या सहवासात अभेद्य स्नेह निर्माण झाला. त्यांना कुणाचा आधार नव्हता. त्यासाठी मी पुढ झालो. अरण्यातसुद्धा त्यांचं राज्य वसवलं. खांडवप्रस्थाचं रूपांतर
...more
पण मी सांगितलेलं कितपत आचरलं जाईल, याची मला शंकाच आहे. सूडभावनेनं पेटलेला भीम नित्य नव्या प्रतिज्ञा करतोय्. अर्जुन अहंकारापोटी स्वतःला श्रेष्ठ धनुर्धर समजतो. युधिष्ठिर, जीवनातलं यश कोणत्या क्षणी द्युतपटावर फेकील, याचा भरवसा नाही.
‘एक मी, अन् दुसरा कर्ण! दैव तरी केवढं विचित्र! मी उपदेश केला अर्जुनाला, अन् नकळत आचरला जातो, तो कर्णाच्या हातून. सुख आणि दु:ख, लाभ अन् हानी, जय अन् पराजय ही दोन्ही सारखी मानून युद्धात उतरणारा कर्णाखेरीज दुसरा वीर कोणता? उद्या रणांगणात तो सूर्यपुत्र अवतरेल, तेव्हा त्याचं तेज प्रसन्न करणारं भासेल. कोणता स्वार्थ आता त्याच्याजवळ राहिलाय्? जीवितसुद्धा त्यानं सुरक्षित राखलं नाही. निर्विकार बुद्धीनं स्नेहासाठी सर्वस्व अर्पण करणारा तो कर्ण धन्य होय. पांडव मला दैवगुणसंपत्र समजतात. आपल्या यशासाठी अर्जुनानं माझा आधार शोधला. देवत्वाचा आधार घेऊन विजय संपादन करणारा अन् मित्रप्रेमासाठी उघड्या डोळ्यांनी
...more
दुसऱ्या दिवशी कौरवश्रेष्ठांच्या मुखावर चिंता प्रगटली. अर्जुनाने सूर्यास्ताच्या आत जयद्रथवध करण्याची प्रतिज्ञा केली होती. कर्णाला ते दुर्योधनाने सांगताच कर्ण चकित झाला. कर्णाने विचारले, ‘जयद्रथवधाची प्रतिज्ञा! का?’ ‘अभिमन्यूवधाचा सूड, म्हणून!’ दुर्योधनाने सांगितले. तशा स्थितीतही कर्णाच्या चेहऱ्यावर हसू प्रगटले. ‘छान! अभिमन्यूवधाच्या वेळी जयद्रथ तिथं नव्हता. तरीही त्याच्या वधाची प्रतिज्ञा! ‘ते काही असो. पण जयद्रथाला वाचवायला हवं. तो भयभीत झालाय्.’
‘वसू! द्रोणाचार्यांनी खूप पराक्रम केला. युद्धाच्या सुरुवातीलाच त्यांनी विराटाचा आणि दुपदाचा वध केला. फार वर्षांपासून मनात रुजलेलं द्रुपदाचं वैर साधलं गेलं. पित्याच्या वधानं धृष्टद्युम्न खदिरांगारासारखा पेटला. तो द्रोणाचार्यांना रणभूमीवर शोधीत होता अन् त्याच वेळी अश्वत्थामा पडल्याची वदंता उठली.’ ‘अश्वत्थामा पडले?’ ‘तो मृत्युंजय! त्याला कोण मारणार? भीमानं अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला ती बातमी स्वत: जाऊन द्रोणांना सांगितली. अश्वत्थामा मारला गेला, एवढंच सांगितलं. द्रोणांनी सत्यवता म्हणून युधिष्ठिराला विचारलं अन् सत्यवक्त्या युधिष्ठिरानं असत्याची कास धरून ती वार्ता खरी असलतची ग्वाही दिली.
...more
‘का?’ कर्ण हसला. ‘मरणासाठी उतावीळ झालेले जीव मारण्यासाठी जगू इच्छीत नाहीत. फक्त कीर्तिरूप मरण ते शोधीत असतात.’
वसू, जयासाठी युद्ध खेळलं जातानाही अहंकार हे एकच त्याचं कारण असतं. पराजयानं अहंकार शामत नाही. त्याची धार अधिक वाढते.’
‘आपण विजयी व्हाल, यात मला शंका नाही.’ ‘मलाही नाही.’ कर्ण क्षणभर गंभीर झाला. दुसऱ्यांच क्षणी तो गंभीरपणे म्हणाला, ‘वृषाली, जे यश भीष्मांना, द्रोणाचार्यांना मिळवता आलं, ते सहज मलाही मिळवता येईल.’
‘वीरश्रेष्ठा! भिऊ नकोस. माझं तुला अभय आहे. हे सुकुमारा! आपली कुवत लक्षात घेऊन वैरी पत्करावा. या भयाण रणांगणावर असा एकाकी फिरू नकोस. युद्धाची मौजच पाहायची असेल, तर तुझे भ्राते भीम, अर्जुन यांच्या निवाऱ्यान जा. सुखानं आपल्या शिबिरात परत जा.’ नकुलाच्या गळ्यात अडकवलेले आपले धनुष्य कर्णाने काढून घेतले आणि नकुलाच्या नेत्रांतले अश्र् पाहावे लागू नयेत, म्हणून तो माघारी रथाकडे वळला.
‘कौरवांच्या अन्नावर वाढलेला तू कावळा. तुला ही कथा सांगणं आवश्यक होतं. ‘शल्यराज! हंस ते, की, जे बुडणाऱ्याला आपल्या पंखांवर तोलतात. पैलतारावर नऊन सुराक्षत पोहचवितात आपल्या म्हणण्याप्रमाणे मी कावळा असेनही; पण त्याचबरोबर बुडत असलेल्याला वाचविणारा हंस मला दिसत नाही.’
‘युधिष्ठिरा! निश्चिंत मनानं परत जा. ही युद्धभूमी आहे. द्यूतपटाइतकी ती सोपी नाही. रण हे तुझं क्षेत्र नव्हे. परत या युद्धभूमीवर पाऊल टाकू नकोस. टाकलंस, तरी माझ्यासमोर येऊ नकोस.’
‘मित्रा, हा पाठीत वार कुणी केला?’ चक्रधराने डोळे उघडले. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. ‘दुःशासनाला वीरशय्या देत होतो. त्याच्यावर शेला झाकीत असता कुणीतरी मागून हा वार केला. कर्णा, हे रणांगण खरं नाही. इथं धर्माला, नीतीला अवसर नाही. इथं धर्माची वल्गना चालते. कृती अधर्माचीच असते. भीष्म द्रोण, साऱ्यांची कथा तीच. या रणभूमीत तुला यश नाही. मित्रा, सावध राहा. जप. मी जातो.’
‘राधेया, योग्य वेळी आलास. मी उपस्थित नसता, तुम्ही सहा वीरांनी माझा अभिमन्यू मारला. आज मी तुझ्या पुत्राचा वध करतो, बघ. सामर्थ्य असेल, तर वाचव त्याला.’ त्या शब्दाबरोबरच तो अघोरी बाण अर्जुनाच्या धनुष्यातून सुटला होता. कर्णाच्या विचाराला अवधी मिळण्याआधीच त्या बाणाने आपले लक्ष्य अचूक टिपले होते. बाणाच्या झोताबरोबरच, प्राजक्ताचे फूल गिरक्या घेत भूमीवर उतरावे, तसा सुकुमार वृषसेन रथाखाली ढासळला.
वृषसेनाच्या मृत्यूने डोळ्यांत गोळा झालेले अश्रु त्या शब्दांच्या दाहात कुठच्या कुठे आटून गेले. त्याने संतापाने वळून पाहिले. त्या आरक्त विशाल नेत्रांत प्रज्वलित झालेली आग अर्जुनाला जाणवली. कर्णाने कृष्णाकडे पाहिले. कृष्ण रथात अधोवदन बसून होता. तशा परिस्थितीतही कर्णाच्या चेहऱ्यावर कटू हास्य प्रगटले. उभ्या धनुष्याला उजवा हात विसावून पराक्रमाच्या अहंकाराने उभ्या राहिलेल्या अर्जुनाला कर्ण म्हणाला, ‘अर्जुना, कृतार्थ तू नाहीस. आज कृतार्थ मी झालो. आज माझ्या मुलाचा वध करून तू सूड उगवला नाहीस, उलट, मला उपकारबद्ध केलंयस. त्याबद्दल तुझा मी ऋणी आहे. बालवयाचं कौतुक घरी करायचं- रणांगणावर पाठवण्याआधी. रणांगण
...more
‘सावध हो, वृषाली! शोक आवर. या रणांगणावरची मोहरी आज जरी वेगवेगळी उधळली गेली, तरी त्या विधात्याच्या एकाच संदुकीतील ती सोबती आहेत. कुणास ठाऊक, कदाचित याच वेळी स्वर्गात अभिमन्यू आणि वृषसेन सोंगट्यांचा पट मांडून बसले असतील.’
‘ती माझी योग्यता असेलही; पण, वृषाली, नुसत्या योद्धयाच्या कौशल्यावर युद्ध जिंकलं जात नाही. सारथ्याला तेवढंच बळ असावं लागतं. दुबळ्यांनाही वज्रबळ मिळवून देणारा सारथी तो कृष्ण कुठं अन् आपल्या निंदेनं सूर्यालाही झाकळू पाहणारा शल्य कुठं! वृषाली, मी उद्या नसलो, तरी चालेल. माझ्यामागं मला जाणून घेणारं कुणी भेटेल, असं वाटत नाही. मला संपूर्ण समजून घेणारी तू....तू तरी मागं राहशील, त्याचा आनंद मला आहे.’
‘मी उद्या परतलो नाही, तर... तर... मागं राहील, त्याला निदान शाप देऊ नाकोस. ते सोसण्याचं बळ त्याला राहणार नाही. त्यापासून त्याला वाचवणं कृष्णालाही जमायचं नाही’ रात्री वृषाली कर्णाच्या मिठीत झोपी गेली होती. झोपेतसुद्धा वृषालीचे हुंदके उमटत होते. तिच्या मिठीची तीव्रता कर्णाला जाणवत होती. कर्णाचे नेत्र सताड उघड़े होते.
कर्णाने पाठ फिरवली आणि तो जाऊ लागला. वृषाली पाठमोऱ्या कर्णावडे पाहत होती. तिचा श्वास गुदमरला होता. भान हरपत होते. वृषालीचे नेत्र भीतीने विस्फारले गेले आणि ती किचाखली, ‘नाथ S’ त्या हाकेबरोबर कर्णाचे पाय उभ्या जागी थिजले. मनात असूनही त्याला पुढे पाऊल टाकता आले नाही. त्या हाकेच्या सामर्थ्याने कळसूत्री बाहुलीप्रमाणे तो वबला. झंजावाती वारे शरीराला भिडावे, तशी वृषाली रणवेष धारण केलेल्या कर्णाला भिडली होती. कर्णाचे हात तिच्या पाठीवरून नकलत फिरत होते. शक्य तेवढया कठोरतेने कर्णाने हाक मारली, ‘वृषाली...’ वृषालीने मान वर केली आश्रूंनी भरलेले तिचे नेत्र अस्थिर बनले होते. एक प्रचंड अनोळखी भीती त्या दृष्टीत
...more
‘वृषाली, असलं वेडेपण मी तुझ्यावडून अपेक्षिलं नव्हतं, तुझी-माझी सोबत असल्या मृत्युनं तुटणारी नाही. ती अखंड राहील. वेडे, उजव्या हाती शस्र पेलून मृत्यूचं आह्वान स्वीकारीत शत्रूला भिडत असता, वीराचा डावा हात वमरेच्या शेल्याचा आधार शोधीत असतो. पती, पत्नी ही का दोन रूपं? दोन भिन्न रूपांत काया, वाचा, मनानं गुंतलेला एकच आत्मा असतो, म्हणून तर पत्नीला अर्धांगी म्हणतात. आज मृत्यूचं भय न बाळगता मी रणांगणी जातोय्. म्हणूनच मी तुला आवडतोय् ते भय बाळगून मी घरी बसलो, तर तुला माझ्याकडं पाहवणारही नाही. खोटया भीतानं तू व्याकुल होऊ नकोस.’
कर्णाकडे न पाहता मद्रराज घोडी घेऊन जात होता. ते दृश्य हताशपणे पाहत असता कानांवर आलेल्या घनगंभीर आवाजाने कर्णाला सावध केले. त्याने पाहिले, तो अर्जन-रथ कर्ण-रथाच्या दिशेने येत होता. कर्णाने क्षणात स्वत:ला सावरले आणि त्याने रथाखाली उडी घेतली. रथचक्राच्या आऱ्यांना हात घातला. सारी शक्ती पणाला लाबून तो चक्र वाढण्याचा प्रयत्न करू लागला. दंडाचे स्नायू तटतटले, पण चक्र तसूभरही हलले नाही कर्णाचे मन व्याकुल झाले. त्याच्या कोणत्याच प्रयत्नाला यश येत नव्हते. तप्त वाळूत रुतलेले चक्र तसेच अचल होते.
‘अर्जुना, थोडा थांब! माझ्या रथाचं चक्र या भूमीत फसलंय्?, ते काढण्याचा अवधी मला दे. रथचक्र भूमीनं ग्रासलं असता युद्ध करणं हा धर्म नव्हे! माझा रथ सज्ज होऊ दे. म्हणशील त्या आयुधानं आपण युद्ध करू. ते युद्ध धर्ममान्य असेल. त्यात लाभलेला जय अथवा पराजय कीर्तिरूपच होईल.’ कर्णाची ती अवस्था अर्जुनाला दिसत होती. त्या नि:शस्त्र कर्णावर शरसंधान करण्याचं धाष्टर्य अर्जुनाला होईना. कृष्णाने अर्जुनाची ती अवस्था जाणली. प्रसंगाचे गांभीर्य ध्यानी आले. कर्णाला तो उच्चरवाने म्हणाला, ‘राधया, फारर लौकर तुला धर्माची आठवण झाली! जव्हा एकवस्त्रा द्रौपदी राजसभेत खेचून आणली, तेव्हा विवस्त्र करण्याचा संकेत करताना ही
...more
हे कृष्ण बोलतो? मला? कृष्णा त्या दुबळ्या अर्जुनाच्या हातांना बळ यावं म्हणून हे आरोप? कृतहस्त आणि अतिदेवी असा लौकिक असणाऱ्या कपटनीतमिध्ये अत्यंत कुशल अशी कीर्ती लाभलेत्न्या शकुनबिरोबर द्यूतठ खेळला जाणार आहे, हे का त्या युधिष्ठीराला माहीत नव्हतं? तरीही त्यानं द्यूताचं आह्वानं स्वीकारलं, हा धर्म; अन् द्यूतात तो सर्व हरला, हे मात्र आमचं पाप.. रजस्वला द्रौपदिला राजसमेत येण्याचा आग्रह युधिष्ठिरानं धरला, ते त्याच्या धर्मस्वभावाचं प्रतीक, अन् पाची पाडवांत वाटल्या गेलेल्या द्रौपदीला दासी बनल्यानंतर संतापाच्या भरात विवस्र करण्याची आज्ञा दिली, तर ते मात्र धर्माचं अधःपतन
विजय हवा ना? अर्जुनाला सुरक्षित राखून विजय हवा ना? तो तुमचाच आहे. विजयाची राजवैभवाची वासनापूर्तीची आसक्ती असती, तर तुझ्या एका विनंतीचा स्वीकार करून मी सारं मिळवलं नसतं का? ज्येष्ठ म्हणून जगता आलं असतं, सम्राटपदाचा अभिषेक माझ्या मस्तकावर झाला असता अन् द्रौपदीवर माझा प्रथम अधिकार राहिला असता हे तूच सांगितलं होतंस ना? जीवनाच मोल मला वाटत असे; पण तूच फुंकर घातलीस अन् त्यानंच ते नाहीसं झालं: मृत्युचं भय मला वाटत नाही, जीवरक्षण करायचं असेल तर ते या क्षणीही करता येईल सहज करता येईल त्या अर्जुनाला मी जर सांगितल ‘हे पार्था तुझ्या धनुष्याची प्रत्यंचा खेचण्याआधी त्या कृष्णाला तुझं-माझं नातं विचार,’तर
...more
कर्णाने एक अत्यंत तीक्ष्ण असा बाण निवडला. तो साक्षात अग्री भासणारा बाण आपल्या धनुष्याला जाडून कणाने आकर्ण प्रत्यंचा खचला, अर्जुनाच्या छातीचे लक्ष्य धरून कर्णाने बाण सोडला. वारुळात नाग शिरावा, तसा तो बाण अर्जुनाच्या छातीत शिरला. त्या आघातान अर्जुन आतावाद्ध हाऊन उभ्या जागा कापू लागला. त्याच्या हातचे गांडीव धनुष्यही गळून पडले आणि तो रथात ढासळला. कर्णपराक्रमाने चकित झालल्या कृष्णाने कर्णावर एकदा क्रुद्ध दृष्टी टाकला आणि मूर्चिछत पडलेल्या अर्जुनाला सावध करण्यासाठी तो वळला. कर्णाने आपल्या भात्यातला दुसरा बाण खेचला. प्रत्यंचा खेचीत असता त्याचे लक्ष अर्जुनावर स्थिरावले, अर्जुनाच्या कमरचा शेला काढून
...more
अहंकाराच्या अभिमानापोटी कसलं भयानक कृत्य हातून घडणार होतं.., माते! योग्य वेळी सावध केलंस! तू निवडलेले पाचच तुला मिळतील सहावा पाचवा कसा बनेला पहिला असूनही, सहावा बनण्याचा पराजय मी तुझ्यासाठी आनंदान पत्करीन.
मध्यान्ह ढळली होती. अशा अपराह्मण काळी कर्ण नदीतीरावर पुरश्चरण संपवून दानाला उभा राहत असे. याचकांच्या बाबतीत शत्रू, मित्र असा भेद त्याने कधी मानला नव्हता. जीवनातल सर्वात मोठे दान करण्यासाठी कर्ण सिद्ध झाला होता. अर्जुनाचा नेम चुकू नये, म्हणून त्याने आपली रुंद छाती किंचित कलती केली. ‘स ऽ प्ऽ ऽ’ विद्युल्लता दिसावी, तसे त्या बाणाचे क्षणदर्शन झाले. एक भयंकर वेदना मानतून आरपार गेली. रथ उचलण्यासाठी जमिनीला टेकवून तणावलेले हात सैल पडले. रथछायेत पडलेल्या कर्णाने पाहिले, तो अर्जुनाचा रथ वेगाने दूर जात होता. निळा शेला वा-यावर तरंगत रणभूमीवर उतरत होता. त्या शेल्याकडे पाहत-पाहत थकलेल्या कर्णाने नेत्र
...more
‘कर्णा! तू गेलास! या मित्राला सोडून! काय केलंस हे? मित्रा, तुझ्याविना हा दुर्योधन पोरका झाला, रे! अंगराजा, तुझ्या बळावर मी कुरुक्षेत्रावर रणांगण उभारलं. तूच मला विजयाची ग्वाही दिली होतीस ना? मग, मृत्युंजया, दिल्या वचनाची आठवण विसरून कुठं गेलास? तुझ्याविना मी पराजित झालो, रे! शत्रूच्या नावाच्या उच्चारानंदेखील तुझ्या अंगाचा दाह होत होता. मग आज तुझ्या पतनाचा विजयोत्सव साजरा करणारे पांडव तुला दिसत नाहीत का?’
‘युवराज! भर मध्याहृकाळी सूर्यास्त होताना कधी तुम्ही पाहिलात का?’ दुर्योधनाने भीतीने आकाशातल्या सूर्याकडे पाहिले. सूर्य तळपत होता. त्याचा दृष्टी कर्णाकडे वळली. कर्णाचे डोळे तसेच उघडे होते. सूर्यबिंबाकडे पाहत. दुर्योधनाची मान खाली झाली. कर्णाने मिटलेली उजवी मूठ उघडली होती... दुर्योधनाचे अश्रु त्या हातावरून ओघळत होते. कर्णाच्या उघड्या तळहातावर पडणारे अश्रु जमिनीकडे ओघळत होते. - जणू त्या मोकळ्या हाताने कर्ण शेवटचे दान देत होता.