More on this book
Community
Kindle Notes & Highlights
जग माणसाच्या मनातल्या दयेवर चालत नाही. ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालतं. माणूस केवळ प्रेमावर जगू शकत नाही. तो इतरांचा पराभव करून जगतो. मनुष्य या जगात जी धडपड करतो, ती भोगासाठी! त्यागाची पुराणं देवळात ठीक असतात; पण जीवन हे देवालय नाही! ते रणांगण आहे.’
‘तू देहाचा दास आहेस, म्हणून. जितकं वैभव अधिक, तितका आत्म्याचा अधःपात मोठा! तुझ्यासारखा राजपुत्र पंचपक्वान्नं खातो आणि जिव्हेचा गुलाम बनतो. तो सुंदर वस्त्रं व अलंकार धारण करतो आणि देहाचा दास बनतो. पळापळाला तो स्पर्शसुखाच्या आणि दृष्टिसुखाच्या आहारी जातो. सुवासिक फुलं आणि सुगंधी तेलं यांचा तो मनसोक्त उपभोग घेतो आणि घ्राणेंद्रियाचा गुलाम होतो. तो प्रजेवर राज्य करतो; पण त्याची इंद्रियं त्याच्या मनावर राज्य करीत असतात. सर्व इंद्रियसुखांचा संगम स्त्रीसुखात होतो. म्हणून आम्ही योगी ते सर्व शरीरसुखांत निषिद्ध मानतो. जा, राजपुत्रा, जा. तुला माझा आशीर्वाद हवा असेल, तर सर्व ऐहिक गोष्टींचा त्याग करून तू
...more
‘माणसाच्या जिभेला गोड फळं आवडतात. ती आपण तिला देत राहिलो, म्हणजे गोड फळांविषयी आपल्या मनात आसक्ती निर्माण होते. आसक्तीनं मनुष्य शरीरपूजक होतो. देहाची पूजा करणाऱ्याचा आत्मा बधिर होत जातो. फक्त विरक्तीनंच माणसाचा आत्मा जागृत राहतो. त्या विरक्तीसाठी मी ही कडू फळं मिटक्या मारीत खात असतो.’
‘ययाति, आज ना उद्या तू राजा होशील, सम्राट होशील, शंभर अश्वमेध करशील. पण एक गोष्ट विसरू नकोस– जग जिंकण्याइतकं मन जिंकणं सोपं नाही!’
आज वासासाठी एक फूल खुडलं, तर उद्या तेवढ्याच सुखासाठी फुलामागून फुलं खुडावीशी वाटतील मला. मग दुसऱ्यांच्या फुलांचा अपहार करण्याची इच्छा माझ्या मनात प्रबळ होईल. अपहारासारखा अधर्म नाही.’
धर्म, अर्थ आणि काम हे तुझे मुख्य पुरुषार्थ आहेत. पण अर्थ आणि काम हे मोठे तीक्ष्ण बाण आहेत. रूपवती स्त्री जशी विनयानं शोभून दिसते, तसेच अर्थ आणि काम हे धर्माच्या संगतीत सुंदर वाटतात. जगानं माझ्याशी जसं वागावं, असं मला वाटतं, तसं मी जगाशी वागायला हवं, या श्रद्धेला मी धर्मबुद्धी म्हणतो. या धर्मबुद्धीचा प्रकाश जीवनात तुला सतत लाभो.’
कंपित
हात पोचू शकणार नाहीत, अशी एखादी गुहा शोधून काढावी आणि तिच्यात लपून बसावे,
‘बायकांचं लक्ष पुरुषांच्या जिभेकडं नसतं, ते डोळ्यांकडं असतं!’
मोहाचा पहिला क्षण ही पापाची पहिली पायरी असते. ती पायरी आपण उतरलो. ती मोठी मोहक, रत्नखचित अशी पायरी आहे. पण कितीही सुंदर असली, तरी ती अधःपाताची पायरी आहे!
मनुष्याचा पुनर्जन्म ही केवळ एक कविकल्पना नसेल कशावरून?
ज्याचे यौवनपुष्प नुकतेच उमलू लागले होते, तो ययाति म्हाताऱ्यासारखा निष्क्रिय आणि नीरस झाला होता; आणि जिचे जीवनपुष्प कोमेजू लागले होते, ती त्याची आई एखाद्या तरुणीप्रमाणे प्रत्येक गोष्टीत मनःपूर्वक रस घेत होती, नव्या नव्या स्वप्नांत आणि संकल्पांत गढून जात होती. तिचे सुख बाबांवर सर्वस्वी अवलंबून आहे, ही माझी कल्पना किती निराधार होती!
जगतो, हेच खरे. वृक्षवेलींची मुळे जशी जवळच्या ओलाव्याकडे वळतात, तशी माणसेही सुखासाठी निकटच्या लोकांचा आधार शोधतात. याला जग कधी प्रेम म्हणते, कधी प्रीती म्हणते, कधी मैत्री म्हणते; पण खरोखरच ते आत्मप्रेमच असते. एका बाजूचा ओलावा नाहीसा झाला, तर वृक्षवेली सुकून जात नाहीत; त्यांची
ययाति, मृत्यू हा जीवमात्राला जितका अप्रिय, तितकाच अपरिहार्य आहे. तो सृष्टिचक्राचा जन्माइतकाच नाट्यपूर्ण आणि रहस्यमय भाग आहे. वसंत ॠतूत वृक्षावर हळूच डोकावणारी तांबूस, कोमल पालवी जशी आदिशक्तीची लीला आहे, तशी शिशिरात गळून पडणारी जीर्ण पिवळी पर्णं ही सुद्धा तिचीच क्रीडा आहे. या दृष्टीनंच आपण मृत्यूकडं पाहिलं पाहिजे. उदयास्त, ग्रीष्म-वर्षा, प्रकाश-छाया, दिवस-रात्र, स्त्री- पुरुष, सुख-दुःख, शरीर व आत्मा, जन्म आणि मृत्यू या सर्व अभेद्य जोड्या आहेत. जीवनाचं हे द्वंद्वात्मक व्यक्त स्वरूप आहे. या सर्व आडव्या-उभ्या धाग्यांनीच आदिशक्ती विश्वाच्या विलासाची आणि विकासाची वस्त्रं विणीत असते. नहुषमहाराज मोठे
...more
या द्वंद्वपूर्ण जीवनात तत्त्वज्ञान हाच मानवाचा अंतिम आधार आहे.
पण मनुष्य तत्त्वज्ञानावर जगतो का? छे! आशेवर जगतो, स्वप्नांवर जगतो, प्रीतीवर जगतो, ऐश्वर्यावर जगतो, पराक्रमावर जगतो; पण केवळ तत्त्वज्ञानावर? ते कसे शक्य आहे? या जटाधारी ॠषि-मुनींना जिथं तिथं तत्त्वज्ञान घुसडण्याची भारी हौस असते.
नवऱ्यापेक्षा मुलावर स्त्रीचा अधिकार अधिक असतो. मूल तिच्या रक्तमांसाचं असतं.’
एका माणसाचा स्वभाव दुसऱ्याला कधी पुरतेपणी कळतो का? ही माझी आई! पण तिचा स्वभाव– छे! आकाशाचा अंत एक वेळ लागेल, पण माणसाच्या हृदयाचा?
का माझे वेडे मन त्याच्यावर अजून प्रेम करीत आहे? आणि माझे विचारी मन त्याचा द्वेष करीत आहे? प्रेम आणि द्वेष! अग्नी आणि पाणी!
‘राजकन्ये, जीवन नेहमीच अपूर्ण असतं. तसं ते असण्यातच त्याची गोडी साठवलेली आहे!’
प्रेम माणसाला स्वतःच्या पलीकडे पाहायची शक्ती देतं. ते प्रेम कुणावरही असो, ते कशावरही जडलेलं असो. मात्र ते खरंखुरं प्रेम असायला हवं! ते हृदयाच्या गाभ्यातून उमलायला हवं! ते स्वार्थी, लोभी, किवा फसवं असता कामा नये. राजकन्ये, खरं प्रेम नेहमीच निःस्वार्थी असतं. निरपेक्ष असतं;
जीवनात प्रेम ही एक उच्च भावना आहे, पण कर्तव्य ही तिच्यापेक्षाही श्रेष्ठ अशी भावना आहे! कर्तव्याला कठोर व्हावं लागतं. पण कर्तव्य हाच धर्माचा मुख्य आधार आहे. कधी काळी देवयानी तुझ्याशी मोकळेपणानं बोलली, तर तिला एवढंच सांग– ‘कचाच्या हृदयावर कर्तव्याचं स्वामित्व आहे, पण त्या हृदयातला एक लहानसा कोपरा केवळ देवयानीचाच होता, तो सदैव तिचाच राहील!’ ’
नुसता भास असेल प्रेमाचा! पण माणसाला जगायला असले भाससुद्धा उपयोगी पडतात या जगात!
हरिण, मोर, हंस– किंबहुना सारे पशू-पक्षी ही सौंदर्याची निधाने आहेत. दाणा टिपायला येणारी चिमणी, भुर्रकन उडून जाणारी चिमणी, पिलांसाठी कुठून तरी काड्या आणि कापूस गोळा करणारी चिमणी– काऊ- चिऊ हे काही केवळ लहान मुलांचे सोबती नाहीत. ते मोठ्या माणसांचेही मित्र होऊ शकतात
तिथे प्रेमाविषयीची कुतूहलबुद्धी होती, नकळत चाळविली गेलेली प्रणयपूर्तीती अतृप्त इच्छा होती.
अतृप्त शरीर आणि संतप्त मन यांच्या कात्रीत रात्रभर माझ्या मनाचे तुकडे-तुकडे होत होत
मला आईचा राग आला! त्या क्षणी मी निश्चय केला, कोणत्या ना कोणत्या मार्गाने अलकेच्या मृत्यूचा सूड घेतलाच पाहिजे!
अतृप्त शरीर आणि अपमानित मन यांची टोचणी मोठी विचित्र असत
हास्य नुसत्या प्रेयसीचे नव्हते. ते एका मानिनीचेही होते! रूपाच्या बळावर आपण पुरुषाला शरण आणू शकतो, या अहंकाराची धुंदी चढलेल्या रमणीचे हास्य होते ते!
ब्रह्मानंद प्राप्त करून देणाऱ्या आत्मविश्वासाच्या गोष्टींची चर्चा जर चार-चौघांत होऊ शकते, तर स्त्री-पुरुषांना तेवढाच आनंद प्राप्त करून देणाऱ्या प्रीतीविषयी उघडपणे बोलावयाची चोरी का असावी?
तिथे अष्टौप्रहर मला मैत्रीण हवी होती. जिच्याशी बोलून, जिची थट्टा करून, जिला आपले हृद्गत सांगून, मी माझे दुःख हलके करू शकेन, अशी मैत्रीण मला हवी होती. जिच्या मांडीची उशी करून मी शांतपणे झोपी गेल्यावर पायाला विंचू चावला, तरी माझी झोप मोडेल, या भयाने जी हलणार नाही, अशी मैत्रीण मला हवी होती. जिला माझी सारी सोनेरी स्वप्ने सांगता येतील आणि ती सांगता-सांगता हातून घडलेल्या चुकांची कबुली जिच्यापाशी देता येईल, अशी मैत्रीण मला हवी होती. या निर्जन बेटावर काही खायला मिळाले नाही, तरी आपण एकमेकांच्या ओठांतल्या अमृतावर जगू, असा आत्मविश्वास माझ्यामध्ये निर्माण करणारी मैत्रीण मला हवी होती! मृत्यू मला घेऊन जायला
...more
कुठल्याही गोष्टीतून आपल्या पूर्वग्रहांना पोषक असे जे असेल, तेवढेच देवयानी शोधून काढी.
मनुष्य नकळत स्वतःभोवतीच फिरत राहतो!
शरीर आणि आत्मा, स्त्री आणि पुरुष, अशा अनेक द्वंद्वांवर आपलं जीवन अधिष्ठित झालं आहे. मानवाच्या या मूलभूत अधिष्ठानांविरुद्ध यतीनं बंड पुकारलं. ते कसं यशस्वी होणार?
स्वतःच्या क्षणिक समाधानासाठी जिच्यावर आपले प्रेम आहे, त्या व्यक्तीला दुःख होईल, अशी गोष्ट करायची? छे! मग ते प्रेम कसले? जे मोकळ्या मुठीने आपले सर्वस्व देते, ते खरे प्रेम!
खरी दासी आहे देवयानी! वैभवाची, प्रतिष्ठेची आणि अहंकाराची गुलाम होऊन बसली आहे
पुरुष अमूर्त गोष्टींच्या मागे सहज धावतो; कीर्ती, आत्मा, तपस्या, पराक्रम, परमेश्वर अशा गोष्टींचे त्याला झटकन आकर्षण वाटते, ते यामुळेच! पण स्त्रीला त्याची चटकन मोहिनी पडत नाही. तिला प्रीती, पती, मुले, सेवा, संसार अशा मूर्त गोष्टींचे आकर्षण अधिक वाटते. ती संयम पाळील, त्याग करील; पण तो मूर्त गोष्टींसाठी!
समुद्र शिंपल्यात घालून कधी कुणाला दाखविता येईल का? फुलाचे चित्र काढून त्याचा सुगंध कुणाला देता येईल का? प्रीतीची अनुभूतीसुद्धा अशीच आहे!