More on this book
Community
Kindle Notes & Highlights
पण जिला उघडपणे आपल्या प्रियकरावर प्रेम करता आले नाही, अशा एका प्रेयसीने क्रूर दैवाच्या हातून त्याला नकळत काढून घेतलेल्या हा सुवर्णक्षण आहे, हे मात्र कुणाच्याही लक्षात येणार नाही.
तुझे हे विस्कटलेले केस– मुद्दाम केलेल्या केशभूषेपेक्षा यात अधिक मोहकता आहे. स्वैरतेतच सौंदर्याचा विलास प्रगट व्हावा.’
चला. नवी सृष्टी निर्माण करणारा पर्जन्य तुम्हांला सोबत करीत आहे. आकाश उजळवून टाकणारी वीज तुमच्या आईच्या हातातल्या दिव्याचं काम करीत आहे. या पर्जन्यापेक्षाही शीतल व्हायला चला, या विजेपेक्षाही तेजस्वी व्हायला चला!’
जीवन आणि मरण! किती क्रूर खेळ आहे हा! केवळ हा खेळ खेळण्याकरिता मनुष्य या जगात येतो? मनुष्य कशासाठी जगतो? तो का मरतो? माधवासारखा तरुण अगदी अकाली हे जग सोडून का जातो? मनातल्या स्वप्नांच्या कळ्या उमलू लागल्या, न लागल्या, तोच माधव कुठे गेला?
जिथे माणूस पाषाण होतो, तिथे पाषाणापासून माणुसकीची अपेक्षा करण्यात काय अर्थ आहे?
संयोग आणि वियोग यांच्या अद्भुत रसायनालाच जीवन म्हणतात का?
पूरूचे डोळे हे माझे सूर्यचंद्र होते. त्याची नाजूक मिठी हे माझे संरक्षण करणारे सुदर्शनचक्र होते. त्याचे पापे– कुबेराच्या भांडारालाही लाजविणारे माझे धन होते ते! झोपेत तो हसला, म्हणजे मध्यरात्री अरुणोदय झाल्याचा मला आनंद होई. त्याच्यासाठीच
एखाद्या विहिरीतले शेवाळ बाजूला केल्यावर आतले स्वच्छ पाणी दृष्टीला पडावे, तसा भास झाला मला त्याच्याकडे पाहून!
वातचक्रामध्ये एखादे पान झाडावरून तुटून गिरगिरत, भिरभिरत आकाशात कुठेतरी दूरदूर जाते! त्या पानाला मात्र वाटत असते, की आपण उंच-उंच जात आहो, स्वर्ग आपल्यापासून फक्त दोन बोटे दूर आहे! तसे यतीचे आयुष्य झाले होते. हे वातचक्र, हे पान,
सर्वसामान्य संसारी माणसांनी आपली बायकामुले, स्नेहीसोबती व संबंधित माणसे यांच्या उन्नतीची चिंता करावी. या सर्वांनी आपले सुख जगातल्या दुसऱ्या कुणाच्याही दुःखाला कारणीभूत होत नाही ना, हे डोळ्यांत तेल घालून पाहिले पाहिजे. व्यक्तिधर्म, संसारधर्म, राजधर्म, यतिधर्म सर्व सारख्याच योग्यतेचे धर्म आहेत. यांपैकी कुठल्याही धर्माला जीवनाचा तिरस्कार करण्याचा किंवा त्याला ज्या मूलभूत मर्यादा आहेत, त्या ओलांडण्याचा अधिकार नाही.
कच आणि यति हे पुरुष होते. घर हे स्त्रीचे विश्व असते; पण विश्व हे कचासारख्या पुरुषांचे घर असते.
जे जीवन वाट्याला आलं आहे, ते आनंदानं जगणं, त्या जीवनातला रस किंवा सुगंध शोधणं, तो सर्वांना आनंदानं देणं हा सुखी होण्याचा सर्वांत सोपा मार्ग आहे.’
पण भीती जशी त्याच्या मनाच्या एका दारातून निघून गेली, तशी प्रीती दुसऱ्या दाराने तिथे राहायला आली.
प्रेम ही काय बाजारातली वस्तू आहे? जेवढे मोल मिळेल, तेवढ्याच किमतीची वस्तू द्यायची, हा बाजारातला न्याय झाला!
अजूनही एखाद्या उदास क्षणी ती किंचाळू लागते : ‘तू आपल्या धर्माला जागली नाहीस, तू आपलं कर्तव्य जाणलं नाहीस. प्रेम काय बाह्य गोष्टींवर अवलंबून असतं? प्रीती एका हृदयातून उगम पावणारी आणि दुसऱ्या हृदयाला जाऊन मिळणारी महानदी आहे. वाटेत कितीही उंच डोंगर येवोत, त्यांना वळसा घालून ती पुढे वाहत जाते. ज्या दिवशी कुठलंही माणूस आपलं होतं, त्याच दिवशी त्याच्या गुणांचा नि अवगुणांचा मनुष्याच्या मनातला हिशेब संपतो. मागे राहते, ती केवळ निरपेक्ष प्रीती! अडखळत, ठेचाळत, धडपडत, पुनःपुन्हा पडत, पण पडूनही भक्तीच्या शिखराकडं जाण्याचा प्रयत्न करणारी प्रीती! परमेश्वराची पूजा करताना त्यानं आपल्याला काय दिलं आहे आणि का
...more
ही पडली ओढाळ गुरांची जात! मुसक्या बांधल्या, तरी जाता-जाता जवळच्या शेतात तोंड घातल्याशिवाय कधी राहायची नाही.
नाजूक पापण्यांची वल्ही घेऊन प्रीतीचा शोध करायला निघालेल्या या चिमण्या नौका! या नौकांत बसून मी अगणित वेळा स्वर्गाचा
तो तांबडा, लालभडक, संध्यारंग! मृगयेतल्या आनंदाचा हा मूर्तिमंत आविष्कार आहे. काळ्या भिल्लिणीच्या हातांतून पहाटे निसटलेले दिवसाचे सावज आता तिच्या आटोक्यात आले आहे. तिचा बाण त्याच्या उरात खोल रुतला
जगात तीनच गोष्टी खऱ्या आहेत- मद्य, मृगया, मीनाक्षी. या तिन्हींच्या सहवासात मनुष्य आपली सर्व दुःखे विसतो. मद्यामुळे माणसाच्या मनाला पंख फुटतात. त्या पंखांच्या फडफडाटाने त्याच्या पायांतल्या शृंखला तुटून पडतात. नीतीच्या, कर्तव्याच्या, पापपुण्याच्या साऱ्या साऱ्या कल्पना मद्याच्या मोहक दाहकतेत वितळून जातात! या जगात ज्याला आपली शिकार होऊ द्यायची नसेल, त्याने सतत इतरांची पारध करीत राहिले पाहिजे. जीवनातले हे अंतिम सत्य शिकवणारा मृगयेसारखा दुसरा गुरू नाही. हे सत्य कठोर वाटते, क्रूर भासते; पण जीवनाच्या महाकाव्यातला हा सर्वांत महत्त्वाचा श्लोक आहे. पवित्र, सुंदर, निष्पाप हे दुबळ्या सज्जनांनी निर्माण
...more
त्या सर्वांचे सार एकच होते. धर्म, नीती, पुण्य, आत्मा, इत्यादी पवित्र शब्दांची मनुष्य हरघडी पूजा करीत असतो. पण ती जगाच्या डोळ्यांत धूळ फेकण्याकरिता. मनातल्या मनात तो एकाच गोष्टीसाठी झुरत राहतो. ती म्हणजे सुख- शरीराच्या द्वाराने मिळणारे प्रत्येक प्रकारचे सुख!
मिळणारा प्रत्येक क्षण हा माणसाने सुवर्णक्षण मानला पाहिजे. त्यातला रस, सुगंध, आनंद अगदी कठोरपणाने पिळून घेऊन, माणसाने आपली सुखाची तृष्णा शांत केली पाहिजे, हे तत्त्वज्ञान मंदारने मला शिकवले.
पाप किती भित्रे असते!
खरेच, मनुष्य किती चांगला आहे! तो दुसऱ्यावर किती विश्वास ठेवतो! विश्वास, श्रद्धा, निष्ठा, प्रीती, भक्ती, सेवा यांच्या बळावर तो जगतो.
बुद्धी, भावना आणि शरीर यांचा त्रिवेणी संगम म्हणजे मानवी जीवन. संगमाचे पावित्र्य एकेका नदीला कसे येईल?
प्रेम कसे करावे, हे तुला शिकायचे आहे ना? तर मग नदीला गुरू कर. वृक्षाला गुरू कर. मातेला गुरू कर.
उपभोग घेऊन वासना कधीही तृप्त होत नाही. आहुतींनी अग्नी जसा अधिकच भडकतो, तशी उपभोगाने वासनेची भूक अधिक वाढते!
काल-परवाचे ज्वलंत प्रश्न हे बेरीज-वजाबाकीच्या उदाहरणांइतके सोपे वाटावेत, अशा नव्या सामाजिक, राष्ट्रीय आणि जागतिक समस्या दत्त म्हणून पुढे उभ्या राहिल्या आहेत! अशा वेळी आजच्या कादंबरीकाराने कथासूत्राकरिता पुराणांकडे धाव घेणे हा वैचारिक पळपुटेपणा नाही का?
पण खरोखर आपल्या पुराणकथा या साहित्यिकाच्या दृष्टीने सोन्याच्या खाणी आहेत.
सत् व असत् यांमधला तो चिरंतन कलह आहे, हे मला त्या वेळी बिलकुल कळले नाही. नैतिक शक्ती व भौतिक शक्ती यांचे मानवी जीवनात अखंड सुरू असलेले भांडण
मी महाकवी होण्याचा तो योग– खरे सांगायचे म्हणजे, काव्यसृष्टीवर येऊ घातलेली एक मोठी आपत्ती– अशा रीतीने टळली; पण उत्कृष्ट
भारतीय संस्कृतीच्या ऐसपैस गप्पा मारीत पांढऱ्या टोप्या घालून समाजकंटकांनी केलेला काळा बाजार, तिरंगी झेंड्याकडे अभिमानाने
पतीला पत्नीकडून जे प्रेम हवे असते, त्यात जी आर्तता, आर्द्रता, उत्कटता आणि उदात्तता लागते, ती अशा देवयानीकडून ययातीला मिळण्याचा मुळीच संभव नव्हता! अशा
असल्यामुळे आणि या प्रगतीच्या प्रयत्नात धर्म, नीती, कला, शास्त्र, संस्कृती, इत्यादी नव्या सामर्थ्यांचा साक्षात्कार त्याला होत असल्यामुळे, वृद्धिंगत होऊ शकणारी आत्मिक शक्ती– ही त्याच्या जीवनातील एक अपूर्व शक्ती होऊन बसली आहे. तो सर्व चरावर सृष्टीपेक्षा भिन्न आहे, तो
वैयक्तिक व सामाजिक जीवनात वासनांचे आणि विकारांचे नियंत्रण किंवा उदात्तीकरण करणारा मानव जोपर्यंत निर्माण होणार नाही, तोपर्यंत मानवतेला सुख आणि शांती यांची प्राप्ती होण्याचा संभव नाही.
कच हा आत्मविकासाची धडपड करणाऱ्या मानवाचा प्रतिनिधी आहे. ययाति हा अष्टौप्रहर सुख भोगण्याच्या निराधार नादात आत्मलोपाला– अंतरीचा दिवा मालवायला प्रवृत्त झालेल्या मानवाचा प्रतिनिधी आहे.
केव्हाही झाले, तरी जगात कच थोडे, ययाति फार!
अशा रीतीने चाळवल्या जाणाऱ्या असंख्य वासनांमुळे आधुनिक मानवाचे मन हा एक अतृप्त, हिंस्र प्राण्यांनी भरलेला अजबखाना बनत आहे.