More on this book
Community
Kindle Notes & Highlights
कामवासना आणि प्रेमभावना यांची
सामान्य मनुष्याचा दोष थोडा आहे! तो सामान्य असतो, याचा अर्थच तो प्रवाहपतित असतो!
चिंतनाला लागणारे स्वास्थ्य त्याला कधीही लाभत नाही. चरितार्थाच्या चिंतेतून मुक्त होण्याची संधी त्याला सहसा मिळत नाही. त्यामुळे सामान्य मनुष्याचे गुण काय किंवा अवगुण काय, दोन्हीही त्या त्या काळच्या सामाजिक गुणावगुणांच्या सरासरीइतकेच असतात.
पूर्वीचा सामान्य मनुष्य परलोकाच्या कल्पनेने, स्वर्गाच्या आशेने, नरकाच्या भीतीने, ईश्वराच्या श्रद्धेने आणि अनेक धार्मिक, सामाजिक व कौटुंबिक बंधनांनी एका पोलादी चौकटीत ठाकून-ठोकून बसविला गेला होता. बिचाऱ्याला इकडे- तिकडे तसूभर हलतासुद्धा येत नव्हते. अशा रीतीने त्याच्या ठिकाणी निर्माण केलेले पावित्र्य पुष्कळ अंशी कृत्रिम होते. पण ते त्याला सन्मार्गापासून ढळू देत नव्हते.
उरली आहे फक्त राख! आणि सर्व संकटे क्षणार्धात दूर करणारी विभूती म्हणून त्या राखेची विक्री करीत सुटलेले यज्ञमंडपातले ढोंगी भटभिक्षुक!
त्याच्या मनातली जुन्या मूल्यांची पूजा उधळली गेली आहे! नव्या पूजेची मूर्ती अजून त्याला मिळालेली नाही. त्या न मिळालेल्या मूर्तीसाठी फुले वेचून ठेवण्याची भाविकताही त्याच्या ठिकाणी नाही. एखाद्या
पण आजचा मनुष्य केवळ अंध, स्वैर आणि क्रूर कामवासनेलाच बळी पडत आहे, असे नाही! त्याचे सर्वच मनोविकार अनिर्बंध आणि अनियंत्रित होऊ पाहत आहेत. त्याच्या विविध वासना उच्छृंखल होत आहेत.
चोवीस तास कुठल्या तरी फुसक्या सुखात मन गुंतवून ठेवण्याखेरीज आनंदाचा दुसरा मार्ग त्याला आढळत नाही. आत्मानंद ही भावनाच त्याला अपरिचित होऊन बसली आहे. अंतर्मुख होऊन एकांतात केलेले स्वतःविषयीचे आणि जीवनाविषयीचे चिंतन ही त्याच्या दृष्टीने मृगजळात लावलेल्या कल्पवृक्षाच्या फुलांची वंध्याकन्येने गुंफलेली माळ झाली आहे!
आत्मलोपाने ग्रासलेल्या त्याच्या यांत्रिक शरीरनिष्ठ जीवनाचे चित्र जोडने आपल्या अर्मेहम या पुस्तकात आणि एरिक फ्रोमने आपल्या र्ऐहा एदम्गूब्, र्शेह द्रे प्ग्सेती आणि र्इी र्द दण्दस् या पुस्तकांत मोठ्या सहानुभूतीने, पण स्पष्टपणे काढले
ययातीला देवयानी आणि शर्मिष्ठा या दोन सुंदर तरुणींच्या सहवाससुखाचा लाभ झाला होता; पण तेवढ्याने त्याची तृप्ती कुठे झाली? इंद्रियसुखांच्या बाबतीतली चिरंतन अतृप्ती हा मानवी मनाचा अत्यंत दुर्बल भाग आहे. एका साध्या उपाख्यानाच्या द्वारे या सनातन समस्येवर बोट ठेवण्यातच महाभारतकारांच्या प्रज्ञेचे स्वरूप पूर्णपणे प्रगट झाले आहे.
सामान्य मनुष्याच्या सर्व गरजा चांगल्या रीतीने भागविल्या जातील, तरच संतांपासून पुढाऱ्यांपर्यंत सर्व लोक ते नीतिपाठ देत असतात, ते त्यांच्या गळी उतरतील.
माणसाला चांगले बनवावे लागते. तो तसा बनला, तरी त्याचे चांगुलपण टिकवावे लागते. म्हणून या सर्व गोष्टींना अशी सामाजिक परिस्थिती निर्माण करणे हे सर्व काळी, सर्व क्षेत्रांतल्या नेत्यांचे काम असते.
पशुपक्ष्यांना न लाभलेली आत्मिक शक्ती आपल्याला मिळाली आहे, ही जाणीव त्याच्या अंतःकरणात नंदादीपाप्रमाणे सतत तेवत राहिली पाहिजे. नैतिक आणि
जीवनेच्छा व तिच्यातून निर्माण होणारी भोगेच्छा ही मानवाची प्रमुख प्रेरक शक्ती आहे, हे कोण नाकारील?
मानवी मनाची व जीवनाची रचना या गोष्टीला अनुकूल नाही. मनुष्याने मोठ्या कष्टाने निर्माण केलेली संस्कृती तर कंठरवाने या गोष्टीचा निषेध करीत आली आहे. कामवासना, कामभावना, प्रीतिभावना आणि भक्तिभावना ही या एकाच वासनेची क्रमाक्रमाने अधिक सूक्ष्म, सुंदर, उन्नत आणि उदात्त होत जाणारी चार रूपे आसेत.