वपु ८५

'राणी, प्रारंभासाठी सगुण साकाराची ओढ ही महत्वाची बाब आहे; पण कितीही देखणेपणा - देखणेपणा म्हटलं, तरी त्याला सगुण साकाराच्याच मर्यादा छळतात. नावीन्य आणि परिचय ह्या दोन अवस्था एकमेकांच्या वैरिनी. मोर अधूनमधूनच, केव्हातरी दिसतो, म्हणून जास्त आवडतो. सातत्य टिकतं, ते विचार देखणे वाटतात, म्हणून; वृत्ती जूळतात, म्हणून मैत्रीची वीण जास्त पक्की होते, ती वेदना आणि संवेदना एकच होतात; म्हणून नाविण्याची ओढ ही एक सहजावस्था आहे. कोणतीही देखणी वस्तू तत्क्षणी आवडते. दीर्घ परिचयानंतरही जर व्यक्ती तेवढीच प्रिय वाटली, तर सगुण साकारापलीकडचं सौदर्य दिसू लागतयं, अनुभवायला मिळतयं अस समजावं. पुरुषाला प्रत्येक देखणी स्त्री आवडते, हा बायकांचा चुकीचा समज आहे. आकर्षण आणि प्रेम ह्या फार वेगवेगळ्या अवस्था आहेत.'


कोर्टात न्याय मिळत नसून, कोर्टात जे मिळतं त्याला न्याय म्हणावा लागतो.


जास्तीत जास्त प्रवासाचे पैसे भरून दोन दोन तास एअर पोर्टवर थांबायचं. पहाटे वेळी अवेळी उठायचं. फासावर जाणार्‍या आरोपीप्रमाणे झडती घ्यायची ह्या सगळ्या सक्तमजुरीला स्टेटस म्हणायचं.


करकचुन ताटी बांधन्यापासून चिता रचेपर्यंत, कुठेच शिस्त नाही, सौंदर्य नाही. मरण सुरेख असेलही. आपण ते रूक्ष बनवतो.
मरणातील काव्य, सौंदर्य, उदात्तता ह्याची जपणूक ख्रिश्चन लोकांनी केली आहे, हे त्यांच्या अंत यात्रेवरून कळतं. आम्हाला फक्त विध्वंस करता येतो.


'नजर आणि स्पर्श, प्रेमाची ही भावना इतकी सर्व श्रेष्ट भावना आहे की नुसते शब्द कमी पडणार आहेत, हे जाणूनच निसर्गानं स्पर्श निर्माण केला. म्हणूनच प्रेमाची सांगता स्पर्शाशिवाय होत नाही.'
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on October 29, 2007 06:06
No comments have been added yet.


V.P. Kale's Blog

V.P. Kale
V.P. Kale isn't a Goodreads Author (yet), but they do have a blog, so here are some recent posts imported from their feed.
Follow V.P. Kale's blog with rss.