सांग का सारे अचानक नवल भासू लागले?सत्यही स्वप्नाप्रमाणे तरल भासू लागले...
कळत-नकळत होत गेल्या नजरभेटी जसजशा...शांत मन इतके कसे चल-बिचल भासू लागले
मुग्ध डोळ्यांनी सुचवली उत्तरे जेव्हा मलाअंतरीचे प्रश्न सारे गझल भासू लागले
वेड जडले, अंतरे बेचैन झाली, हे खरेमात्र हेतू सर्व अपुले सफल भासू लागले
नेहमीची वाट ही अन् खाच-खळगेही जुनेसाथ क्रमता आज सारे प्रतल भासू लागले
लाभले ते देत गेलो मी जगाला, शेवटी-एकले आयुष्य माझे सकल भासू लागले
- कुमार जावडेकर
Published on September 05, 2020 23:31