मी तुझ्या रोज भोवती असतेएक अदृश्य सोबती असते
मी कधी रिक्त शाश्वती असते...वा कधी दिव्य आरती असते!
आसवांचे जुनेच लोलक, पण-मी नवी रंगसंगती असते
सांजवेळी तुझा विसावा मीआणि दिवसा तुझी गती असते
तू करू पाहतोस जे त्याचीफक्त मी मूक संमती असते
- कुमार जावडेकर
Published on September 27, 2020 22:10