सारखा

श्वास मीही घेत होतो सारखा
दूर मृत्यू नेत होतो सारखा

वृत्त कळता तेच आले धावुनी
दोष ज्यांना देत होतो सारखा

माहिती माझा कुणाला चेहरा?
थांबलो छायेत होतो सारखा...

भेट घेण्या पोचतो दारी तुझ्या
रद्द माझा बेत होतो सारखा...

एक तोही पूल आता मोडला
ज्यावरी मी येत होतो सारखा

- कुमार जावडेकर
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on April 28, 2020 09:54
No comments have been added yet.