स्पंदन

मुक्तकः

ओठी केवळ भाषा नसते
ते हृदयाचे स्पंदन असते
दुसऱ्यांसाठी जगणाऱ्यांचे
जगणे म्हणजे जीवन असते!

गझलः

जगणे म्हणजे जीवन असते
ते हृदयाचे स्पंदन असते

नाती-गोती येती नंतर
प्रेम पुरेसे बंधन असते

विरह तुझा घडल्यावर कळले
सुखद कसे हे मीलन असते...

राग तुझ्या डोळ्यांतिल लटका
दो-घटकेचे रंजन असते!

फसते, रुसते, खुदकन हसते
चंचल मूल जणू मन असते

- कुमार जावडेकर
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on April 28, 2020 09:59
No comments have been added yet.