मृत्युंजय [Mrutyunjay] Quotes
मृत्युंजय [Mrutyunjay]
by
Shivaji Sawant11,261 ratings, 4.52 average rating, 810 reviews
मृत्युंजय [Mrutyunjay] Quotes
Showing 1-30 of 98
“पण ज्याला जग दुर्गुण म्हणतं तो दुर्गुण म्हणजे तरी काय? कुणालातरी ते निश्चितपणानं सांगता येईल काय? कारण मला माहीत आहे, दुबळ्या मनाच्या कर्तृत्वशून्य माणसांनी निर्माण केलेल्या ह्या सर्व खोट्या आणि खुळ्या कल्पना आहेत. कारण ज्या कृतीला जग एकदा सद्गुण म्हणतं, त्याच कृतीला दुसऱ्या वेळी ते दुर्गुण म्हणतं आणि ते बरोबरही असतं. उदाहरण द्यायचं झालं, तर मानवाच्या हत्येचं देता येईल. एखादा ज्वलंत देशप्रेमी माणूस आपल्या राज्यातील एखाद्या घरभेद्याला ठार मारतो. जग अशा मारणाऱ्याला राष्ट्रभक्त म्हणून ओळखतं. त्याच्या नावाचा गगनभेदी जयजयकार करतं, पण एखादा लुटारू धनाच्या लोभानं एखाद्या वाटसरूच्या डोक्यात परशू घालतो. जग त्याला हत्यारा म्हणतं. कृती एकाच प्रकारची असते. एका माणसाकडून दुसऱ्या माणसाच्या हत्येची, पण जग एका मारेकऱ्याला राष्ट्रभक्त म्हणतं, तर दुसऱ्याला वधिक म्हणतं.”
― मृत्युंजय
― मृत्युंजय
“निद्रा ही सर्वांत अधिक उदारहृदयी माता आहे! व्यक्तिव्यक्तींची विभिन्न दु:खं ती एकाच ममतेनं काही काल का होईना; पण निश्चितच आपल्या विशाल उदरात घेते!”
― मृत्युंजय
― मृत्युंजय
“श्रद्धा म्हणजे काटेरी जीवनावरची हिरवळ! स्वत:वरच श्रद्धा हवी. ज्याची स्वत:वर – स्वत:च्या दिव्य स्वरूपावर श्रद्धा नाही तो जगासाठी, इतरांसाठी काहीच करू शकत नाही.”
― मृत्युंजय
― मृत्युंजय
“कर्ण, राजकारण हा तुझा विषयच नव्हे! राजकारण केवळ दंडाच्या बलावर वा मनाच्या चांगुलपणावर कधीच चालत नसतं. ते बुद्धीच्या कसरतीवर चालत असतं! माजलेलं अरण्य नष्ट करायचं झालं, तर तुझ्यासारखा साधाभोळा वीर हातात परशू घेऊन जीवनभर ते एकटाच वेड्यासारखं तोडीत बसेल! पण... पण माझ्यासारखा एका ठिणगीतच त्याची वासलात लावील!”
― मृत्युंजय
― मृत्युंजय
“कारण कुणीही कधीच विसरू नये की, काळ हा अखंड आहे. जीवन ही भीक मागून मिळणारी वस्तू नव्हे. जीवन म्हणजे पूर्णत्वासाठी अनंताकडून अनंताकडे चालू असणारा अखंड प्रवास आहे!”
― मृत्युंजय
― मृत्युंजय
“कारण द्वेषातून कपट, कपटातून क्रोध आणि क्रोधातून युद्ध जन्म घेत असतं! युद्धांनी प्रश्न कधीच मिटत नसतात - उलट त्यांतून नवे जटिल प्रश्न निर्माण होतात.”
― मृत्युंजय
― मृत्युंजय
“सर्वच कल्पना पराक्रमावर सफल होत नाहीत म्हणून आणि राजकारण हाही एक महान पराक्रमच आहे.”
― मृत्युंजय
― मृत्युंजय
“तू राजा असूनही राजाजवळ आवश्यक असणारी व्यक्तिपरीक्षणाची दृष्टी तुला नाही. नाहीतर तुला हे नक्कीच पटलं असतं की, कोणतंही व्यसन हे कुठल्याही बुद्धिमान माणसालासुद्धा अध:पतनाच्या सखोल दरीत नेऊन पोहोचवू शकतं!”
― मृत्युंजय
― मृत्युंजय
“कारण शंका ही घायपातासारखी असते! एकदा का तिनं मूळ धरलं की, ती वाढतच जाते आणि शेवटी तिचं दाट गचपणात रूपांतर होतं.”
― मृत्युंजय
― मृत्युंजय
“பொறாமை என்பது இரண்டு கூரிய முனைகளைக் கொண்ட ஒரு வாளைப் போன்றது. பொறாமை கொள்ளுகின்றவருக்கும் அது ஆபத்தானது, யார்மீது பொறாமை கொள்ளப்படுகிறதோ அவருக்கும் அது ஆபத்தானது.”
― கர்ணன்: காலத்தை வென்றவன்
― கர்ணன்: காலத்தை வென்றவன்
“மிதமிஞ்சிய ஆடம்பரம் ஆன்மாவின் அழிவுக்கு வழி வகுக்கும்.”
― கர்ணன்: காலத்தை வென்றவன்
― கர்ணன்: காலத்தை வென்றவன்
“लक्षात ठेवा, माणसाला सर्वांत क्रूर करतो तो त्याचा स्वार्थ! भुकेनं व्याकूळ झालेला सिंह आपली भूक शमविण्यासाठी एखादा प्राणी मारून खातो, पण तो कधीच दुसरा सिंह नाही मारून खात! स्वार्थानं व्याकूळ झालेला माणूस मात्र एक नाही, दोन नाही, लक्षावधी माणसं मारण्यासही मागंपुढं पाहत नाही! सिंहाला क्रूर म्हणण्याचा कोणताच नैतिक आधिकार माणसाला नाही! विधात्यानं निर्माण केलेल्या जीवसृष्टीतील माणूस हाच सर्वांत क्रूर प्राणी आहे! तरीही विद्वान लोक मानवाला सुसंस्कृत मानतात. मानव श्रेष्ठ प्राणी आहे, पण केव्हा, जर तो स्वार्थ टाकून इतरांसाठी रक्ताचा कणन्कण झिजवीत असेल तर! नाहीपेक्षा मानव धर्म, भवितव्य, राज्यकारभार यांच्या कितीही वल्गना करीत असो त्या कवडीमोलाच्याच आहेत! माणसाला सगळ्यात मोठा शाप कोणता असेल तर तो स्वार्थाचा!”
― मृत्युंजय
― मृत्युंजय
“वीरांनो, मी ही बोलावलेली माझ्या आयुष्यातील पहिलीच सभा आहे - कदाचित शेवटीचीही असेल! मी तुमच्यासमोर उभा आहे; तो कुरूंचा योद्धा म्हणून नव्हे, पितामह म्हणून नव्हे, परशुरामशिष्य भीष्म म्हणून नव्हे, जे राज्य मी कधीच उपभोगलं नाही त्या राज्याचा सेवक म्हणूनही नव्हे; तर तुमच्यासारखाच, जीवनाचा संघर्ष - एका डोळ्यात विजयाचे आनंदाश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात पराभवाचे दु:खाश्रू घेऊन पाहिलेला एक सामान्य कुरू म्हणून उभा आहे!”
― मृत्युंजय
― मृत्युंजय
“मला वाटतं भवितव्य ही मानवानं निर्माण केलेली भयानक भूल आहे! जरा सखोलपणानं विचार करून पाहा! काळाला कधीतरी भूत आणि भविष्य आहे काय? काळ हा अखंड आहे आणि अखंडत्वाची जाणीवच मानवाला खऱ्या अर्थानं निर्भय करू शकेल!”
― मृत्युंजय
― मृत्युंजय
“जीवन ही सूर्यापासून स्फुरलेली एक दिव्य प्रकाशलाट आहे! आणि हे ज्याला नि:संदेह पटलं आहे, त्याचं जीवन प्रकाशाशिवाय अन्य काय असणार?”
― मृत्युंजय
― मृत्युंजय
“सत्य ते की, जे शाश्वत आणि नित्य असतं! त्या दृष्टीनं विचार केला तर मला सत्य केवळ एकच वाटतं. सूर्याची ही असंख्य किरणं! किती अनादी कालापासून ती पृथ्वीला जीवनदान देत आली आहेत! त्यांच्या दिव्य स्वरूपात कधी बदल झाला आहे काय? त्यांनी कधी आपला सर्वांना स्पर्श करायचा दिव्य गुणधर्म सोडला आहे काय?”
― मृत्युंजय
― मृत्युंजय
“आहे! मनाचं पटांगण! या पटांगणावर आकांक्षांचे सजविलेले रथ घेऊन सहस्र वर्षं मानव या स्पर्धेत भाग घेत आला आहे. पण काळाच्या नि:पक्ष पंचानं त्याला या स्पर्धेत कधीही विजयी म्हणून घोषित केलेलं नाही.”
― मृत्युंजय
― मृत्युंजय
“माणूस बुद्धीच्या आणि संपत्तीच्या जोरावर जगाला सहज फसवू शकतो, पण आपल्या मनाला फसविता येणं कुणालाच शक्य नसतं. ज्याच्या-त्याच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंब ज्याच्या-त्याच्या मनाच्या दर्पणात स्पष्ट पडलेलं असतं. प्रत्येक माणूस आपल्या एकांतवेळी या दर्पणात स्वत:चीच विविध रूपं पाहत असतो. काही-काही वेळा ही रूपं आकर्षक व आभिमान वाटण्यासारखी असतात, पण बऱ्याच वेळा ही रूपं डोळ्यांपुढं येऊसुद्धा नयेत असं वाटतं.”
― मृत्युंजय
― मृत्युंजय
“माणूस बुद्धीच्या आणि संपत्तीच्या जोरावर जगाला सहज फसवू शकतो, पण आपल्या मनाला फसविता येणं कुणालाच शक्य नसतं.”
― मृत्युंजय
― मृत्युंजय
“सत्य हे राजाचा मार्ग ठरवीत नसतं. राजा ठरवील तोच मार्ग सत्य म्हणून समाज स्वीकारीत असतो!”
― मृत्युंजय
― मृत्युंजय
“निखळ विजय किंवा मरण! माझ्या गुरूनं अर्ध्या तपाच्या ज्ञानसाधनेत मला एकच शिकवलं होतं, ‘‘विजय किंवा मरण!”
― मृत्युंजय
― मृत्युंजय
“स्वत:च्या पुत्राचा जन्मत:च अश्वनदीत त्याग करणाऱ्या त्या मातेच्या लौकिकाचा ती वैभवाच्या शिखरावर असताना खरा जर कोणी सांभाळ केला असेल, तर तो कर्णानं आणि तोही स्वत:ची सर्व प्रकारची शारीरिक, मानसिक आणि आत्मिक कोंडी पत्करून! भरसभेत पांचालीची विटंबना करून ओढवून घेतलेलं पाप त्यानं कुंतीसारख्या महान स्त्रीचा गौरव याप्रकारे राखून अंशत: धुऊन काढलं नव्हतं काय?”
― मृत्युंजय
― मृत्युंजय
“ज्या समाजात आणि राष्ट्रात स्त्रीत्व लज्जित होतं तो समाज आणि ते राष्ट्र विनाशाच्या खोल गर्तेच्या काठावर आपसूक जाऊ शकतं!”
― मृत्युंजय
― मृत्युंजय
“प्रकाशासाठी ठेवलेल्या छिद्रातून निघून गेली. तिची ती धडपड पाहून जीवन म्हणजे विश्वाच्या भयाण भुयारातून बाहेर पडण्यासाठी धडपडणारं पाखरू आहे, असा एक विचित्र विचार माझ्या मनात येऊन गेला. झटकन मी ती दगडी खुंटाळी डावीकडे फिरविली. तो भाग होता”
― मृत्युंजय
― मृत्युंजय
“உறக்கம்தான் மிகவும் அன்பான தாய். அவள் எல்லோருடைய துன்பங்களுக்கும் சிறிது நேரம் ஆறுதல் வழங்குகிறாள். சிறிது நேரம் மட்டுமானாலும், அவள் கச்சிதமாகவும் நிச்சயமாகவும் ஆறுதல் வழங்குகிறாள்.”
― கர்ணன்: காலத்தை வென்றவன்
― கர்ணன்: காலத்தை வென்றவன்
“நேரம் எல்லோருக்கும் சௌகரியமாக இருக்கிறது. ஆனால், ஓர் அசௌகரியமான நேரத்தை ஒரு சௌகரியமான நேரமாக ஆக்கிக் கொள்ளுகின்றவன்தான் ஓர் உண்மையான வீரன்,”
― கர்ணன்: காலத்தை வென்றவன்
― கர்ணன்: காலத்தை வென்றவன்
