Palestine-Israel Quotes
Palestine-Israel
by
Atul Kahate86 ratings, 3.87 average rating, 8 reviews
Open Preview
Palestine-Israel Quotes
Showing 1-24 of 24
“दुसरे खलिफा उमर इब्न अल-खताब यांच्या नेतृत्वाच्या काळात म्हणजे इ.स. 634 ते 644 या काळात त्यावर नवं उत्तर शोधण्यात आलं. पूर्वी अरब मुसलमानांच्या टोळ्या आपसात लढत आणि लूटमार करत. त्याऐवजी सगळ्या मुसलमानांनी एकत्र येऊन मुसलमान नसलेल्यांची लूट करावी आणि त्यामधला हिस्सा संबंधित टोळीनं घ्यावा असं उमर यांनी सुचवलं. यामुळे इराक, सीरिया आणि इजिप्त इथे अरबांनी खूप संपत्ती लुटली. यामध्ये कुठलाही धार्मिक दृष्टिकोन अजिबात नव्हता. म्हणजे हे ‘धर्मयुद्ध’ वगैरे अजिबात नव्हतं.”
― Palestine-Israel
― Palestine-Israel
“भूमध्य समुद्राच्या पूर्व किनार्यावर आशिया, आफ्रिका आणि युरोप या तीन खंडांचं एकत्रीकरण ज्या भागात होतं तो पॅलेस्टाईनचा भाग मानला जातो.”
― Palestine-Israel
― Palestine-Israel
“अनेक वेळा एखादी खोटी गोष्ट ओरडून सांगितली की ती खरी वाटायला लागते या गोबेल्सच्या तत्त्वाचा वापर इस्रायलनं सातत्यानं आपली प्रतिमा उजळवण्यासाठी केला.”
― Palestine-Israel
― Palestine-Israel
“ज्यू लोकांचं स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याच्या संकल्पनेला ‘झियोनिझम’ असं म्हणतात; तर या प्रवृत्तीला ‘झियोनिस्ट’ प्रवृत्ती असं म्हणतात.”
― Palestine-Israel
― Palestine-Israel
“पूर्वीच्या काळी काही पाश्चिमात्य इतिहासकारांनी आपल्या सोयीसाठी या विभागाच्या पूर्व दिशेकडच्या प्रदेशाचे तीन भाग पाडले. त्यामधला पहिला ‘नियर ईस्ट’ हा भाग युरोपला सगळ्यात जवळ असलेल्या मध्यसमुद्रापासून पर्शियातल्या प्रदेशाचा होता. दुसरा ‘मिडल ईस्ट’ हा भाग वाळवंटी प्रदेश ते आग्नेय आशिया इथपर्यंतचा होता. तिसरा ‘फार ईस्ट’ हा भाग पॅसिफिक समुद्राकडे तोंड असलेल्या प्रदेशांचा होता. 1880”
― Palestine-Israel
― Palestine-Israel
“1950 च्या दशकात इजिप्तमध्ये धार्मिक तत्त्वांवर आधारित असलेली मूल्यं स्वीकारून अतिउजव्या विचासरणीच्या कट्टर लोकांनी ‘मुस्लीम ब्रदरहूड’ या संघटनेची स्थापना केली. हाज अमिननं आता या संघटनेशी आपली नाळ जोडली.”
― Palestine-Israel
― Palestine-Israel
“1920 साली अल-हुसेनी घराण्यामधल्या पुढच्या वंशजाच्या ऐवजी रघिब नशाशिबीची जेरुसलेमच्या महापौरपदी नेमणूक झाली. आता नशाशिबींचं पारडं खूप जड होऊ नये यासाठी पुढच्या वर्षी जेरुसलेमचा ‘मुफ्ती’ म्हणजे ढोबळमानानं स्थानिक मुसलमानांचा धर्मगुरू म्हणून हाज अमिन अल-हुसेनीची निवड ब्रिटिशांनी करवली.”
― Palestine-Israel
― Palestine-Israel
“1920 साली हर्बर्ट सॅम्युएलची नेमणूक पॅलेस्टाईनमधला ‘सिव्हिलियन हायकमिशनर’ म्हणजेच पॅलेस्टाईनमधला ब्रिटिश प्रशासक म्हणून करण्यात आली. ज्यू लोकांसाठी ही खूशखबर होती; कारण सॅम्युएल स्वत: ज्यू तर होताच; पण तो कट्टर झियोनिस्ट विचारसरणीचाही होता. त्यानं आपली या पदावरची नेमणूक म्हणजे पॅलेस्टाईनमध्ये ज्यू राष्ट्राची निर्मिती करण्यासाठीचा इशारा अशा रीतीनंच या घटनाक्रमाचा अर्थ लावला.”
― Palestine-Israel
― Palestine-Israel
“1920 सालच्या ‘सॅन रेमो कॉन्फरन्स’मधल्या निर्णयानुसार ब्रिटिशांना पॅलेस्टाईनचं भवितव्य ठरवण्यासाठीचे अधिकार देण्यात आले. तसंच पॅलेस्टाईनमध्ये ब्रिटिश लष्कराच्या सत्तेऐवजी ब्रिटिश सरकारचे प्रतिनिधी कामकाज पाहतील असा निर्णय घेण्यात आला. यानंतर दोन वर्षांनी आंतररष्ट्रीय पातळीवरचे प्रश्न सोडवण्यासाठी ‘लीग ऑफ नेशन्स’ या नव्या संघटनेची स्थापना झाली. या संघटनेनं पॅलेस्टाईनच्या संदर्भातल्या आधीच्या निर्णयाला मान्यता तर दिलीच; पण त्याशिवाय बॅल्फोर करारालाही पाठिंबा दिला. कहर म्हणजे पॅलेस्टाईनच्या भूमीवरची अधिकृत भाषा हिब्रू असेल असं सांगून या संघटनेनं अरब लोकांना मोठा धक्का दिला आणि झियोनिस्ट आकांक्षांना मोठंच खतपाणी घातलं.”
― Palestine-Israel
― Palestine-Israel
“ब्रिटिशांनी ज्यू लोकांच्या वतीनं हाईम वाईझमन आणि अरबांच्या वतीनं सीरियाचा फैझल हा आघाडीचा नेता यांना प्रोत्साहित केलं. यातून झालेल्या समझोत्यानुसार 1919 सालच्या जानेवारी महिन्यात पॅलेस्टाईनच्या आर्थिक प्रगतीसाठी ज्यू लोक अरबांशी सहकार्य करतील असं वाईझमननं मान्य केलं. याच्या मोबदल्यात बॅल्फोरच्या पर्यायाला फैझल संमती देईल आणि पॅलेस्टाईनच्या भूमीवर ज्यू लोकांना स्थायिक होण्यामध्ये अरब लोक अडथळे आणणार नाहीत असं ठरलं.”
― Palestine-Israel
― Palestine-Israel
“पहिल्या महायुद्धाच्या अखेरच्या काळात पॅरिसमध्ये झालेल्या शांतता परिषदेमध्ये एक करार झाला होता. त्यानुसार पॅलेस्टाईनच्या भूमीच्या संदर्भातले सगळे निर्णय घेत असताना सीरिया, जॉर्डन, इराक आणि पॅलेस्टाईन या देशांची मान्यता घेण्यात येईल असं ठरलं. यासाठी ‘किंग-क्रेन कमिशन’ या नावानं ओळखली जाणारी एक समिती मध्यपूर्व आशियामध्ये धाडण्यात आली. या समितीनं नंतर दिलेल्या अहवालात अगदी स्पष्टपणे मध्यपूर्व आशियाच्या भागामधून स्थानिक अरब लोकांना हुसकावून लावून त्या ठिकाणी ज्यू लोकांचा देश उभा करणं साफ चूक असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं. तसंच”
― Palestine-Israel
― Palestine-Israel
“1916 साली पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान इंग्लंडला ‘अॅसिटोन’ नावाच्या रसायनाची कमतरता मोठ्या प्रमाणावर भासायला लागली. बंदुकीच्या गोळ्यांमध्ये तसंच इतर दारुगोळ्यामध्ये या रसायनाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असे. यामुळे फ्रान्समध्ये सुरू असलेली लढाई विजयात बदलायची असेल तर त्यासाठी आपल्याला किमान 30,000 टन अॅसिटोनची गरज आहे हे इंग्लंडला कळून चुकलं. तेव्हा ब्रिटिश लष्कराशी संबंधित असलेल्या विभागात काम करत असलेल्या भावी पंतप्रधान विन्स्टन चर्चिलनं ही गोष्ट एका भेटीदरम्यान वाईझमनच्या कानांवर घातली. त्यावेळी वाईझमननं तातडीनं प्रयत्न करून अॅसिटोन तयार करण्याची एक सोपी पद्धत शोधून काढली. त्यामुळे ब्रिटिश लष्करी अधिकार्यांच्या मनात वाईझमनविषयी अनुकूल मत तयार झालं. ही संधी आपण गमावता कामा नये असा चंग बांधलेल्या वाईझमनला यामुळे हुरूप चढला आणि या घटनेचा वापर आपण पॅलेस्टिनी भूमीत ज्यू लोकांच्या राष्ट्रनिर्मितीच्या मुद्द्यासाठी करून घेतला पाहिजे याचा त्यानं आपल्या मनाशी निश्चय केला.”
― Palestine-Israel
― Palestine-Israel
“पिन्स्करनंतर झियोनिस्ट विचारसरणीला मोठा पाठिंबा थिओडोर हर्झ्ल (1860-1904) नावाच्या ऑस्ट्रियन पत्रकारानं दिला. 1896 साली प्रकाशित झालेल्या आणि हिब्रू भाषेनुसार Der Judenstaat तर इंग्रजी भाषेनुसार ‘द ज्यूईश स्टेट’ असं नाव असलेल्या आपल्या पुस्तकात त्यानं झियोनिझमच्या संकल्पनेला उचलून धरलं.”
― Palestine-Israel
― Palestine-Israel
“झियोनिस्ट विचारसरणी पुढे नेण्यामध्ये महत्त्वाची भूमिका 1882 सालच्या लिओ पिन्स्कर याच्या (Autoemancipation) या पुस्तकानं बजावली. युरोपमध्ये ज्यू लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी ते अपयशीच ठरतील अशी पिन्स्करची धारणा होती.”
― Palestine-Israel
― Palestine-Israel
“1846 साली ला बेला मेन्केन या प्रसिद्ध ज्यू नटीनं पॅलेस्टाईनच्या भूमीवर ज्यू राष्ट्राची निर्मिती करण्याची कल्पना मांडली. आपल्या वयाच्या 33 व्या वर्षी मरण पावलेल्या या नटीच्या या मताला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. 1862 साली जर्मनीमध्ये असलेल्या मोझेस हास या ज्यू माणसानं नव्यानं ही संकल्पना मांडली.”
― Palestine-Israel
― Palestine-Israel
“काही जणांनी युफ्रेटिस आणि टायग्रिस या नद्यांच्या खोर्यांमध्ये आपलं राज्य निर्माण केलं. त्यांना ‘बॅबिलोनियन’ म्हणून ओळखलं जातं.”
― Palestine-Israel
― Palestine-Israel
“अरब लोकांप्रमाणेच ज्यू लोकसुद्धा नोहाचा पुत्र असलेला ‘शेम’ हाच आपल्या वंशाचा आदिपुरुष असल्याचं मानतात. त्यामुळे ज्यू आणि अरब लोकांचा उल्लेख ‘सेमाईट’ म्हणजेच ‘शेमच्या गोत्राचे लोक’ असा केला जातो.”
― Palestine-Israel
― Palestine-Israel
“अली यांच्या अनुयायांना ‘शिया पंथीय’ असं नाव मिळालं. याचं कारण म्हणजे अरबी भाषेतल्या ‘शिया ए अली’ याचा अर्थ ‘अलीचे अनुयायी’ असा होतो.”
― Palestine-Israel
― Palestine-Israel
“मुहम्मद पैगंबरांच्या संकल्पना आणि सवयी यांना अरबी भाषेत ‘सुन्ना’ असं म्हणतात. म्हणूनच या दुसर्या गटातल्या लोकांचा पंथ ‘सुन्नी’ असतो असं म्हटलं गेलं.”
― Palestine-Israel
― Palestine-Israel
“. 661 मध्ये अली यांच्या निधनानंतर मुआवियानं इस्लामची धुरा आपण स्वीकारत असल्याचं जाहीर करून इस्लाम धर्माचं मुख्यालय मदिनेहून खेचून दमास्कसमध्ये आणलं. त्यातून आर्थिक आणि सामाजिक बदल घडले. याच पिढीनं नंतर सोन्याचं ‘दिनार’ आणि चांदीचं ‘दिरहॅम’ अशी नाणी वापरात आणली.”
― Palestine-Israel
― Palestine-Israel
“राष्ट्र”
― Palestine-Israel
― Palestine-Israel
“इ.स. 610 मध्ये इस्लामचा जन्म झाला. यानंतर 23 वर्षांनी इस्लाम धर्माचे संस्थापक मुहम्मद पैगंबर यांचा मृत्यू झाल्यानंतरच्या काळात इस्लामचा प्रसार प्रचंड वेगानं वाढला.”
― Palestine-Israel
― Palestine-Israel
“ज्यू लोकांच्या झालेल्या या छळाची भरपाई म्हणून पॅलेस्टाईनमध्ये आपल्या हक्काच्या भूमीत राहणार्या पॅलेस्टिनी अरबांना तिथून हुसकावून लावायचं, आपल्याच देशात आपण निर्वासित म्हणून राहावं अशी वेळ त्यांच्यावर आणायची आणि त्या ठिकाणी ज्यू लोकांसाठीचं राष्ट्र बनवायचं हाही प्रकार अत्यंत चुकीचाच आहे. एका महाभयानक चुकीची भरपाई दुसरी महाभयानक चूक करून करायचा हा अजब प्रकार घडूनसुद्धा सगळं जग निमूटपणे तो बघत राहतं हा विसाव्या आणि एकविसाव्या शतकामधला मानवतेला लागलेला शाप आहे.”
― Palestine-Israel
― Palestine-Israel
“पॅलेस्टाईन नावाच्या देशात अचानकपणे पण नियोजनबद्धरीत्या ज्यू लोकांनी वेगानं स्थलांतर केलं; तिथून मूळ पॅलेस्टिनी अरबांनाच हुसकावून लावलं आणि तिथे इस्रायल नावाचा ज्यू लोकांचा देश निर्माण केला हे सत्य उमगलं.”
― Palestine-Israel
― Palestine-Israel
