Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official) Quotes

Rate this book
Clear rating
Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official) (Marathi Edition) Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official) by Sant Gyaneshwar
5 ratings, 4.60 average rating, 0 reviews
Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official) Quotes Showing 1-30 of 88
“जो योगयुक्त पुरुष तत्त्वज्ञानी होतो, त्याच्या ठिकाणी मी कर्म करतो अशी कर्तृत्वबुद्धी कधीच उठत नसते. तो आपल्याला कर्मरहित केवळ चैतन्यस्वरूप पाहतो. लोकांना तो पाहतो, ऐकतो, स्पर्श करतो, वास घेतो, खातो, जातो, निजतो, श्वासोच्छ्वास करतो, ⁠।⁠।⁠८⁠।⁠। बोलतो, मलमूत्र-विसर्ग करतो, डोळ्यांची उघडझाप करतो, असे दिसते, पण तो मात्र इंद्रिये आपआपल्या विषयाचा व्यापार करीत आहेत, त्यांच्याशी माझा (आत्मस्वरूपाचा) काही एक संबंध नाही, असे अंतःकरणात धारण करतो व मी त्याच्याहून निराळा आहे असे समजतो. ⁠।⁠।”
Sant Gyaneshwar, Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“आणि मी माझें ऐसी आठवण ⁠। विसरलें जयाचें अंतःकरण ⁠। पार्था तो संन्यासी जाण ⁠। निरंतर ⁠।⁠।⁠२०⁠।⁠।”
Sant Gyaneshwar, Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“कर्म करीत असताना ते कर्म मी करतो असा अभिमान जो धारण करीत नाही व त्या कर्माच्या फळाचीही इच्छा सोडतो, तो खरा योगी होय.”
Sant Gyaneshwar, Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“संतवचनाने चित्त निर्भय होते व जीव परब्रह्मासारखाच निःसंशय होतो.”
Sant Gyaneshwar, Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“मग अपेक्षित जें आपुलें ⁠। तेंही सांगतील पुसिलें ⁠। जेणें अंतःकरण बोधलें ⁠। संकल्पा न ये ⁠।⁠।⁠१६८⁠।⁠।”
Sant Gyaneshwar, Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“जेथ प्रवृत्ती पांगुळ जाहाली ⁠। तर्काची दृष्टी गेली ⁠। जेणें इंद्रियें विसरलीं ⁠। विषयसंग ⁠।⁠।⁠१६२⁠।⁠। मनाचें मनपण गेलें ⁠। जेथ बोलावें बोलकेपण ठेलें ⁠। जयामाजि सांपडलें ⁠। ज्ञेय दिसे ⁠।⁠।⁠१६३⁠।⁠। जेथ वैराग्याचा पांग फिटे ⁠। विवेकाचाही सोस तुटे ⁠। जेथ न पाहतां सहज भेटे ⁠। आपणपें ⁠।⁠।⁠१६४⁠।⁠।”
Sant Gyaneshwar, Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“येऱ्हवीं तरी पाहीं ⁠। जे जैसे माझ्या ठायीं ⁠। भजती तयां मीही ⁠। तैसाचि भजें ⁠।⁠।⁠६६⁠।⁠।”
Sant Gyaneshwar, Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“देहसंगें तरी असे ⁠। परी चैतन्यासारिखा दिसे”
Sant Gyaneshwar, Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः ⁠। स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत् ⁠।⁠।⁠१८⁠।⁠।”
Sant Gyaneshwar, Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“म्हणून एका अद्वैत वस्तूच्या ठिकाणी द्वैत पाहतात.”
Sant Gyaneshwar, Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः ⁠। त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ⁠।⁠।⁠९⁠।⁠।”
Sant Gyaneshwar, Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा ⁠। निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ⁠।⁠।⁠३०⁠।⁠।”
Sant Gyaneshwar, Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“जंववरी अर्जुना ⁠। तो बोध भेटेना मना ⁠। तंवचि या साधना ⁠। भजावें लागे ⁠।⁠।⁠१४९⁠”
Sant Gyaneshwar, Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“अर्जुना! जोपर्यंत आपल्याला आत्मज्ञान होत नाही, तोपर्यंतच या साधनरूप कर्मयोगाचे अनुष्ठान करायचे असते. ”
Sant Gyaneshwar, Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“ज्याप्रमाणे पाण्यातील कमळाच्या पानाला पाणी लागत नाही, त्याप्रमाणे तो कर्मांत अलिप्त असतो. ”
Sant Gyaneshwar, Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“येथे अज्ञानी असो की ज्ञानी असो, प्रत्येक पुरुष कर्म करीतच असतो. तो क्षणभरही कर्मरहित राहू शकत नाही असे सांगितले नसून प्रकृतीच्या स्वाधीन असलेला म्हणजे मी प्रकृतीहून निराळा आहे, असे आपल्याला न जाणणारा असा अज्ञानी पुरुषच क्षणभरदेखील कर्मरहित राहू शकत नाही, असे सांगितले आहे. ज्ञानी पुरुष आपल्याला जड प्रकृतीहून व कर्माहून निराळे पाहातो, म्हणून तो (ज्ञानी पुरुष) आपल्याला मी ज्ञानस्वरूप असून जड अशा प्रकृतीहून व कर्माहून निराळा आहे असे साक्षात जाणत असल्यामुळे, त्याच्या ठिकाणी प्रकृतीनुसार कर्म होत असले तरी तो त्या कर्माशी व त्या कर्माच्या कर्तृत्वाशी मुळीच संबंध वागवीत नाही.”
Sant Gyaneshwar, Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“गूढार्थदीपिका—परी उपास्ति ते योग्यते- ⁠। आधीन असे”
Sant Gyaneshwar, Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“मार्ग तरी दोनी ⁠। परी एकवटती निदानीं ⁠। जैसी सिद्धसाध्यभोजनीं ⁠। तृप्ति एक ⁠।⁠।⁠३८⁠।⁠।”
Sant Gyaneshwar, Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“ज्याच्या पोटात अमृताचा झरा आहे किंवा ज्याच्या पोटात अमृत स्रवते, त्याला जसे भूक, तहान यांचे दुःख कधीच होणे शक्य नाही, ”
Sant Gyaneshwar, Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“जेथ काम उपजला ⁠। तेथ क्रोध आधींचि आला ⁠।”
Sant Gyaneshwar, Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये स्वाधीन असून त्याच्या इच्छेप्रमाणे वागतात, त्याची बुद्धी स्थिर झाली, असे समज. ⁠।⁠”
Sant Gyaneshwar, Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“या श्लोकात स्थितप्रज्ञ किंवा ज्ञानी पुरुषाचे एक लक्षण सांगितले आहे. ते लक्षण म्हणजे ज्याच्या चित्तातून विषयसुखाची वासना निःशेष नाहीशी झाली, तो स्थितप्रज्ञ होय. ‘वासना’ शब्द क्षणिक विषयसुखाच्या इच्छेसच बहुधा लावला जातो. क्षणिक सुखाची वासना नाहीशी झाली की, आत्मसुख प्रगट होते व स्थितप्रज्ञ पुरुष आत्मसुखानेच सदा संतुष्ट असतो.”
Sant Gyaneshwar, Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“योगः कर्मसु कौशलम्” ही योगाची व्याख्या नसून योगात कर्माचे बंधकत्व नाहीसे करण्याचे कौशल्य आहे, एवढेच दाखविले आहे.”
Sant Gyaneshwar, Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“जे बुद्धियोगा योजिले ⁠। तेचि पारंगत जाहले ⁠। इहीं उभयसंबंधी सांडिले ⁠। पापपुण्यीं ⁠।⁠।⁠२७७⁠।⁠।”
Sant Gyaneshwar, Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“अर्जुना समत्व चित्ताचें ⁠। तेंचि सार जाण योगाचें ⁠। जेथ मन आणि बुद्धीचें ⁠। ऐक्य आथि ⁠।⁠।⁠२७३⁠।⁠।”
Sant Gyaneshwar, Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“पहा, अशा रितीने होणाऱ्या बऱ्यावाईट कर्माच्या ठिकाणी जी चित्ताची समता, याचीच सज्जन लोक योगस्थिती म्हणून प्रशंसा करतात. ⁠।⁠।⁠२७२⁠”
Sant Gyaneshwar, Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“योग” या शब्दाचा ऐक्य असा अर्थ आहे. बुद्धीचे परमेश्वराशी ऐक्य करून कर्मे कर असे भगवान येथे सांगत आहेत. जीवदशेत बुद्धीचे देहादिकांशी ऐक्य झालेले असते. त्या देहादिकांकरिता कर्म केले तर ते बंधनकारक होते, पण परमेश्वराशी बुद्धीचे ऐक्य ठेवून किंवा परमेश्वराच्या आसक्तीने कर्म केल्यास ते बंधनकारक होत नाही.”
Sant Gyaneshwar, Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“तुज उचित होय…स्वकर्म हें”
Sant Gyaneshwar, Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन ⁠। निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ⁠।⁠।⁠४५⁠।⁠।”
Sant Gyaneshwar, Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन ⁠। बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम् ⁠।⁠।⁠४१⁠।⁠।”

« previous 1 3