जागर Quotes

Rate this book
Clear rating
जागर जागर by Narhar Kurundkar
91 ratings, 4.47 average rating, 3 reviews
जागर Quotes Showing 1-3 of 3
“सत्याग्रह एकीकडे राजकीय लढ्यात लक्षावधींना सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देत होता. तशी संधी सशस्त्र चळवळ उपलब्ध करून देऊ शकत नव्हती. दुसरीकडे सत्याग्रह जनतेचा आत्मविश्वास जागा करीत होता. द्वेषाने पेटलेल्या मनाने अंधारात पोलीसठाणे जाळले तरी जाहीररीत्या सरकारची प्रतिष्ठा तशीच शिल्लक राहते. कारण पोलीसचौकी जाळणारे लोक उघड्यावर येऊन आपला हक्क व समर्थन घोषित करू शकत नाहीत. गांधीजींनी जनतेला जाहीररीत्या इंग्रजांचे कायदे मोडण्याची शिकवण दिली. मोकळेपणाने एकेक कार्यकर्ता कोर्टात सांगत असे की, हा कायदा मी तोडलेला आहे, पुन्हा संधी मिळाली तर तो मी तोडीन. मात्र सत्याग्रहाची चळवळ ही जितकी कायदा तोडण्याची चळवळ होती, तितकीच कायदा पाळण्याची चळवळ होती. सत्याग्रही तुरुंगाचे कायदे पाळीत. जेलमधून पळून जात नसत. ते पोलिसांशी झटापट करीत नसत. लाठीमारासमोर शांतपणे उभे राहत असत. मालमत्तेचा विध्वंस न करता ते कायदेही तोडू शकत असत, यातनाही भोगू शकत असत. अन्याय्य कायदा जाहीररीत्या निर्भयपणे तोडावा, कायदा तोडल्याबद्दलचे शासन शांतपणे बिनतक्रार सहन करावे, ही शिस्त गांधीजींनी लोकांना लावली. यामुळे निर्भयपणे इंग्रजांना 'देशातून चालते व्हा' म्हणून सांगण्याची मानसिक हिंमत जनतेत आली. लढ्यातून हुल्लडशाही, झुंडशाही, विध्वंस यांची लाट निर्माण झाली नाही. स्वातंत्र्यलढ्याची प्रक्रिया या मार्गाने गेली, म्हणून स्वातंत्र्योत्तर काळात लोकशाहीचा प्रयोग शक्य झाला.”
Narhar Kurundkar, जागर
“माणूस हा मोठा चमत्कारिक प्राणी आहे. तो भुकेच्यापोटी कोणते पाप करणार नाही ? सगळीच पापे करील, हे खरे आहे. पण समोर सुग्रास अन्न वाढून ठेवलेले असतानासुद्धा एकदा हा माणूस हट्टाला पेटला, की भुकेच्या बजनाखाली सारे शरीर क्षीण होत जात शेवटी मरणही पत्करले जाते, पण अन्नाचा स्वीकार केला जात नाही. मानवी जीवनात मूल्यांच्या निष्ठा प्रकृतीवर मात करण्याइतक्या प्रबल असू शकतात.”
Narhar Kurundkar, जागर
“तुमचा आमचा संबंधच काय, तुम्हांला जे वाटेल ते तुम्ही करा, आम्हांला वाटेल ते आम्ही करू, तुमच्या गल्लीत तुम्ही राहा, आमच्या गल्लीत आम्ही राहू, ही सहिष्णुतेची फारच ओबडधोबड व्याख्या झाली. सहिष्णुतेचा अर्थ परिपूर्ण होण्यासाठी एका श्रद्धेची गरज असते. ती श्रद्धा म्हणजे माझ्या विचारातील काही भाग चुकीचा असू शकेल, तो मी दुरुस्त करण्यास तयार आहे. - या भूमिकेला सहिष्णुता असे म्हणतात. सहिष्णुतेचा गाभा म्हणजे नको असणारे सहन करणे हा नसतो. सहिष्णुतेचा गाभा न पटणाऱ्या भूमिकेला सहानुभूतीने समजून घेण्याची तयारी हा असतो.”
Narhar Kurundkar, जागर