गुलमोहर [Gulmohar] Quotes

Rate this book
Clear rating
गुलमोहर [Gulmohar] गुलमोहर [Gulmohar] by V.P. Kale
289 ratings, 4.12 average rating, 7 reviews
गुलमोहर [Gulmohar] Quotes Showing 1-3 of 3
“प्रचंड आघातांनी माणूस तेवढा खचत नाही. कारण त्याच्या मनाची पूर्वतयारी झालेली असते. अनपेक्षित बारीकसारीक धक्क्यांनीच माणूस खचतो, कारण त्या प्रसंगांना तोंड देताना तो एकटा असतो.”
V.P. Kale, गुलमोहर [Gulmohar]
“आनंदाच्या प्रत्येकाच्या कल्पना निरनिराळ्या असतील. आनंद वेगळे आहेत; पण दु:ख एकच आहे याचं त्यांना समाधान वाटलं.”
V.P. Kale, गुलमोहर [Gulmohar]
“का वं? असं कशापायी? चांगलं बेस झाड हाय की. बांधकामात येतं की काय? अरारा, लई वंगाळ. मला वाटलं, बाभूळ वगैरं असेल. झाड वाचवा साहेब, चांगलं हाय.’’ ‘‘तू काम कर. मला शिकवू नकोस. मला हे झाड नको म्हणजे नको.’’ लाकूडतोड्या झाडावर सरड्याप्रमाणे चढला. वरच्या फांदीवर पहिली कुऱ्हाड बसली आणि त्या पहिल्या घावानं दिवाकरपंतांच्या आख्ख्या भूतकाळातील आठवणींवर तडाखा हाणला. दुसऱ्या घावासरशी त्यांचा भविष्यकाळ नष्ट केला. तिसरा घाव बसला आणि दिवाकरपंतांना प्लॉटचा वर्षवाढदिवस आठवला. घावाघावागणिक आठवणींचा मोहर झोडपला जात होता. खाली पडणाऱ्या फांद्या चुकवीत चुकवीत दिवाकरपंत तांबडी फुलं भराभर वेचत होते. वेचता वेचता त्यांना उगीचच भास्कर आठवला. त्यांना वाटलं, आपण फुलं गोळा करीत असताना तो पटकन म्हणेल, ‘‘चक्कर आहे दिवाकरपंत.’’ घावावर घाव बसत होते. झाडाची उंची कमी होत होती, दिवाकरपंतांचं स्वप्नही लहान लहान होत होतं. रस्त्यावरून जाणारे येणारे म्हणत होते, ‘‘आम्ही असतो तर झाड बचावून बंगल्याचा प्लॅन केला असता.’’ –घावाघावागणिक दिवाकरपंत तांबड्या फुलांच्या सड्यात भिजत होते.”
V.P. Kale, Gulmohar