Greekanjali Quotes
Greekanjali
by
मीना प्रभू [Meena Prabhu]71 ratings, 4.10 average rating, 3 reviews
Greekanjali Quotes
Showing 1-3 of 3
“आज रात्री जमलं तर मला इथल्या 'हेरोडिअन' या प्राचीन अॅम्फिथिएटरमधे नाटक पाहायचं होतं. मनात धास्ती होती. शहर परकं. सगळं अनोळखी. अपरात्री या हॉटेलात जागा मिळाली नाही तर तर काय करू? ही काळजी मनावेगळी करत हॉटेलच्या बाहेर पडले.”
― Greekanjali
― Greekanjali
“म्हणजे फक्त ए सोडला तर दुसरं कुठलंच इंग्रजी अक्षर त्यात सापडत नाही आणि ही म्हणे इंग्लिश मूळाक्षरांची आई!"
माझ्या वैतागावर सगळेच मोठमोठ्यानं हसले.
"हे काहीच नाही, "एक जण म्हणाला, "आमच्याकडे पाच ई आहेत."
"पाच?" मी आश्चर्यानं उद्गारले.
मराठीतल्या हस्व आणि दीर्घ या दोन 'इं'शी मुकाबला करताना नाकीनऊ येतात. या पंचकन्यांचा हल्ला कसा परतवायचा?”
― Greekanjali
माझ्या वैतागावर सगळेच मोठमोठ्यानं हसले.
"हे काहीच नाही, "एक जण म्हणाला, "आमच्याकडे पाच ई आहेत."
"पाच?" मी आश्चर्यानं उद्गारले.
मराठीतल्या हस्व आणि दीर्घ या दोन 'इं'शी मुकाबला करताना नाकीनऊ येतात. या पंचकन्यांचा हल्ला कसा परतवायचा?”
― Greekanjali
“तीनेक हजार वर्षापूर्वी तुम्हा हिंदूप्रमाणेच आमचेही अनेक देव होते. त्यांचं वागणं खूपसं मानवासारखं होतं. ते रागवा- रुसायचे. संतुष्ट होऊन आशीर्वाद द्यायचे. ते इथंच माउंट ऑलिम्पसवर राहायचे तरी तिथून खाली उतरून आपण वावरतो तसेच ते लोकांमधे मिसळायचे. खाय-प्यायचे. त्यानंतर आलेल्या गंभीर प्रकृतीच्या किहॅनिटीनं ते बदलून टाकलं. पण मूळची भाषा, देव, तत्त्वज्ञान, कला-कल्पना आणि प्रवृत्ती यांचा कायमचा ठसा आमच्यावरच नव्हे तर सबंध पाश्चिमात्य संस्कृतीवर उमटलेला आहे. भाषेचंच बघ ना. नुसतं इंग्लिश पाहिलं तरी त्यातले वीस टक्के शब्द ग्रीक आहेत किंवा ग्रीकवरून आलेले आहेत.”
― Greekanjali
― Greekanjali
