Milind Bokil > Quotes > Quote > Sheetal liked it

Milind Bokil
“मिरीकरनं माझ्या सांगण्याप्रमाणं केलं तेव्हा मी तिला उंट खाऊ दिला. मग एक प्यादंसुद्धा भेट दिलं. ​मला आता सॉलिड मजा वाटत होती. माझं मन समोरच्या डावावर नव्हतं. मी एक जगज्जेता सम्राट होतो. पण उदार आणि दयाळू. शरण आलेल्याला मारून टाकणं हा माझा धर्म नव्हता. "जा, तुझा राज्य तुला परत दिलं." माझ्यासमोर वाकलेल्या त्या राजाला मी हात झटकत बेफिकीरपणे म्हणालो. असल्या राज्याची मला पर्वा नव्हती. माझी ती विश्वविजयी सेना घेऊन मी राजधानीत मोठ्या डौलानं परतणार होतो. तिथं कुणी तरी माझी वाट बघत होतं. डोळ्यांत दिवे लावून, तबकात निरांजनं पेटवून.”
Milind Bokil, शाळा [Shala]

No comments have been added yet.