मराठी वाचनकट्टा discussion
०४. पुस्तकचर्चा | Book talk
>
पुस्तक नोंदींतील चुका
message 1:
by
Pranav
(last edited Sep 28, 2023 10:46AM)
(new)
Sep 28, 2023 10:16AM
नमस्कार, Goodreads वर मराठी पुस्तकांच्या नोंदींमध्ये भरपूर चुका आढळतात. कधी नाव चुकीचं, कधी लेखकांचं नाव, कधी duplicate नोंदी नि कधी आणखी काही. मी नुकताच Goodreads librarian झालो आहे तर बऱ्याच चुका दुरुस्तं करतो आहे. तुम्हाला काही चुका आढळल्या, तर त्या देखील इथे सांगू शकता म्हणजे मी त्या दुरुस्त करू शकेन.
reply
|
flag
नक्कीच सांगेल.. कधी कधी मराठीत अनुवाद झालेली पुस्तक शोधताना ती सापडत नाहीत. अशावेळी ती कशी शोधावी? हे सांगु शकाल का? की ही पुस्तक नव्याने ॲड करावी लागतात?
Amazon वर असलेली पुस्तकं आपोआप येतात sync होऊन. पण जर काही सापडत नसली तर त्या नोंदी निर्माण करता येतील. त्या पुस्तकांच्या लिंक्स देऊ शकता तुम्ही.
पुस्तकाचे नाव : इवान मूळ लेखक : व्लादिमिर बोगोमोलोव
अनुवादक : अनिल हवालदार
ISBN 5-05-001326-7
सारांश : खूप खूप वर्षे युद्ध माहीत नसलेली काही माणसे आहेत. त्यांच्या शहरांवर विमानांनी बाँब टाकले नाहीत, रणगाड्यांच्या चाकांखाली त्यांची पिके चिरडली नाहीत. जवळच्या माणसांच्या मरणाच्या वार्ता घेऊन येणाऱ्या मूक पोस्टमनांनी त्यांच्या घरांची दारे ठोठावली नाही. ह्या माणसांना युद्ध माहीत आहे पुस्तकांमार्फत, चित्रपटांमार्फत, म्हाताऱ्या माणसांच्या कथनामार्फत.
युद्ध माहीत नसलेल्यांना हे पुस्तक कदाचित चकित करील. ज्याने शाळेत जायचे, अभ्यास करायचा, मित्रांबरोबर खेळायचे, असा एक सर्वसामान्य मुलगा रणधुमाळीत अडकला व त्याला सैनिकाचे मरण आले, ही कथा त्यांना वास्तव वाटायची नाही. पण ह्या पुस्तकाच्या नायकाबद्दल तुम्ही जे काही वाचाल, इवान असे रशियन नाव असलेल्या रशियन मुलाबद्दल – ते सर्व खरे आहे.
त्याहून आणखी सांगतो : ही कथा म्हणजे युद्धावरील मुले नामक आश्चर्यकारक वीर - इतिहासाचे एक पान आहे, अत्यंत कठोर सत्याचा एक भाग आहे
युद्ध लढणे पुरुषांचे, प्रौढांचे काम आहे हे सर्वांना माहीत आहे. कोणे एके काळी कदाचित तसेच होते. पण आधुनिक युद्धे - साम्राज्यवादी, आक्रमक - निर्दय आहेत. ही युद्धे ना मुलांची, ना स्त्रियांची, ना म्हाताऱ्यांची गय करतात. ह्या युद्धांमध्ये आक्रमक केवळ सैनिक नसतात, तर खुनी सैनिक असतात.
फॅसिस्ट जर्मनीचे सोविएत संघाविरुद्धचे युद्ध असे होते. अत्यंत कठोर, मानवजातीच्या इतिहासातील अत्यंत विध्वंसक युद्ध.
..२१ जून रोजी रात्री उशीरा सोविएत स्टेशन ब्रेस्त इथून जर्मनीला आगगाडी रवाना झाली. मालडब्यांवर खडूने “धान्य” असा छोटा, भला शब्द होता. आम्ही पश्चिमेला धान्य धाडले होते, आम्हाला शांतता हवी होती.
ज्या दिशेला आगगाडीमधून धान्य पाठवले होते, त्याच दिशेने आणखी दोन तासांनंतर, २२ जून १९४१ च्या पहाटेला, आमच्या देशावर पोलादाच्या आणि आगीच्या लाव्हारसाचा वर्षाव झाला. आणि फॅसिस्टांच्या रणगाड्यांच्या झुंडी वाटेत आडव्या येणाऱ्या सर्व गोष्टींचा नाश करीत सीमा ओलांडून घुसल्या. घरे कोसळली, पिके जळली. सैनिकांशेजारीच लहान मुले ठार झाली.
मुलांचे रक्षण करण्यासाठी, युद्धाच्या आगीच्या ज्वाला जेथे पोहोचणार नाहीत अशा दूर पिछाडीला त्यांना पाठवण्यासाठी, आमच्या लोकांनी कल्पनातीत प्रयत्न केले. मुलांना सर्वप्रथम युद्ध आघाडीपासून दूर नेण्यात आले, त्यांच्यासाठी मोटारींची आणि विमानांची तरतूद करण्यात आली.
पण मोठी माणसे सर्व मुलांना वाचवू शकली नाहीत.
ब्रेस्तजवळच्या जंगलातील एक एकाकी समाधी मला आठवते. खांबाला ठोकलेल्या पाटीवर लिहिलेय: “इथे तान्या झोपलीय." कोण ही तान्या? ती फॅसिस्टांची बळी कशी ठरली? ह्या पुस्तकाचा नायक इवान ह्याच्याप्रमाणेच ती छोटी सैनिक होती, अथवा केवळ ती मायभूमीत जगत-हिंडत होती, उन्हात आनंदाने बागडत होती, म्हणून फॅसिस्टांनी दुष्टपणे तिला ठार मारून टाकले?
शत्रूच्या पिछाडीला अनेक सोविएत मुले होती आणि मोठ्या माणसांच्या खांद्याला खांदा भिडवून ती लढली.
शांतताकाळात ती कणखर बनली होती. अवघड किलोमीटर म्हणजे काय हे त्यांना हे त्यांना कवनांमधून समजले होते, शेकोट्यांपाशी त्यांना रात्र समजली होती. सहनशील होण्यास, अचूक नेमबाजी करण्यास, जखमींना बँडेज बांधण्यास, ती शिकली होती. नवजात सोविएत राज्यासाठी केलेल्या लढाया आठवून मोठ्या माणसांनी त्यांना शिकविले शाळांमध्ये त्यांना शिकविण्यात आले. पुस्तकांनी त्यांना शिकविले.
सोविएत मुलांचे आवडते लेखक आर्कादी गैदार यांनी युद्धाची भेट अशा शब्दांमध्ये घेतली होती : “मला मृत्यूचा तिटकारा आहे. मला बंदूक द्या आणि गोळ्या व संगीन यांच्या साह्यानं मायभूमीच्या रक्षणाला मी जाईन.”
हा धडा आमच्या मुलांना उपयोगी पडला.
युद्धावरची मुले. मोठ्यांना ती ओझे बनली नाहीत. अत्यंत अवघड क्षणी त्यांचे काम हलके करण्याचे सोविएत माणसांनी प्रयत्न केले. मुलांमध्ये अनेक चिवट, निर्भय योद्धे निघाले.
युद्धाच्या शेवटच्या तोफा धडाडल्यानंतरच्या दिवसापासून अनेक वर्षे उलटलीत, पण वालोद्या दूबीनिन, गूल्या कोरोल्येवा, झोया कोस्मोदेम्यान्स्काया, अशा बाल-योद्धयांची नावे लोकांच्या कायम स्मरणात आहेत. आणखी अशी खूप खूप नावे त्यांच्या ध्यानात आहेत.
झोया कोस्मोदेम्यान्स्काया पहिल्यांपैकी एक होती. ती अठरा वर्षांची होती. ती टेहळणीसाठी गेली असताना फॅसिस्टांच्या हाती सापडली. त्या कृश अंगकाठीच्या अबोल मुलीने दाखविलेले धैर्य व निर्धार पाहून फॅसिस्ट थक्क झाले. फॅसिस्टांच्या उलटतपासणीवेळी ती गप्प राहिली, तिचा छळ करण्यात आला तरी तिने स्वतःच्या सहकाऱ्यांचा विश्वासघात केला नाही. नंतर जेव्हा तिला विवस्त्र अवस्थेत, अनवाणी पायांनी, बर्फावरून चालवत वधस्थळाकडे नेण्यात आले, तेव्हा तिने दयेची याचना केली नाही. अत्यंत थंडपणे तिने मृत्यूला स्वीकारले. तिचे नाव अजरामर झाले. त्या नावाने आमच्या मुलांना पराक्रमांना उद्युक्त केले व शत्रूला धडकी भरवली.
वालोद्या दूबीनिन युद्धापूर्वी सहावीत शिकत होता. केर्च येथे भूमिगत गुंफांखाली शत्रूपासून दडून राहिलेल्या पार्तीझानांच्या तुकडीत तो टेहळ्या बनला. हा मुलगा निर्भय होता, चपळ होता, जेथे एकही मोठा माणूस घुसू शकला नसता अशा फटींमध्ये घुसायचा. शत्रूवर सूड घेणाऱ्या लोकांच्या तुकडीला त्याने खूप मदत केली. त्याला वीरमरण आले.
युद्धावरची मुले. अर्थात सर्वांनीच हाती शस्त्रे घेतली नाहीत. अनेकांनी स्वतःच्या शक्तीनुसार मोठ्यांना मदत केली.
लेनिनग्रादमधील मुलांनी स्थापन केलेल्या एका छोटया म्युझियममधील शालेय तक्ता मला आठवतो. त्यात फक्त उत्कृष्ट आणि बरे शेरे होते. आता तसे शेकडो हजारो तक्ते आहेत, पण त्यांना काही म्युझियममध्ये ठेवत नाहीत! पण तो तक्ता होता १९४१-१९४२ च्या हिवाळ्यात लेनिनग्रादमध्ये शिकलेल्या एका मुलीचा शहर जळत होते, शहर उपासमारीमुळे आणि थंडीमुळे मृत्युमुखी पडत होते, शहरावर सतत बाँब व तोफगोळ्यांचा वर्षाव चालू होता, शहराला शत्रूचा पोलादी वेढा पडला होता. अशा युद्धआघाडीवरील परिस्थितीत ती मुलगी स्वतःचे नित्याचे शिकण्याचे काम करीत होती, उत्कृष्ट शिकत होती. ह्यात तिचे धैर्य होते, तिची चिकाटी होती, शत्रूचा ती असा प्रतिकार करीत होती, अशी लढत होती.
युद्धावरील मुलांबाबत असे आणखी खूप वेळपर्यंत मी सांगू शकेन. पण मला वाटते की, ह्या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळणारी कथा पूर्ण उघडपणे, प्रामाणिकपणे आणि कठोरपणे तुमच्या समवयस्काच्या पराक्रमांचे दर्शन घडवील. तो आज हयात नाही. फॅसिझमविरोधी लढ्यात तो ठार झाला. फॅसिझम स्वतःच्या रक्तात घुसमटून गेल्यामुळे, तुझ्याकडे येताना, उद्याच्या मुलांकडे येताना अर्ध्या वाटेवरच थंडावला.
तरुण वाचका, ह्या चतुर, अवघड पुस्तकाबरोबर मी तुला एकट्याला सोडतो. हे पुस्तक लक्षपूर्वक वाच आणि छोटा रशियन मुलगा इवान ह्याच्यापासून धैर्य, शौर्य शिकून घे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मायदेशावर प्रेम करायला शीक.
-यूरी याकोवलेव
प्लीज वर दिलेलं पुस्तक तुम्ही ॲड कराल का?आणखी माहिती अन् पुस्तकाच्या कव्हर पेजसाठी खालची लिंक चेक करा.
https://archive.org/details/Ivan-Mara...
जुनी पुस्तकं असतील तर त्यांना ISBN नसतात. जर ती पुस्तकं Amazon, Archive, worldcat वगैरे ठिकाणी सापडत असतील तर टाकता येतील. Goodreads policy: https://help.goodreads.com/s/article/...
Check out this book on Goodreads: Dhag https://www.goodreads.com/book/show/1...कृपया हे पुस्तक एडिट कराल का?
Check out this book on Goodreads: Dhag https://www.goodreads.com/book/show/1...
सॉरी अमेझॉन ची लिंक द्यायची होती तर परत गुडरिड चीच लिंक दिल्या गेली.. :-|https://www.amazon.in/Dhag-Uddhav-She...
Milind wrote: "कृपया हे पुस्तक गुडरिड वर टाकाल का? गावकुसातील जित्राबं - भरत आंधळे
https://amzn.eu/d/4cfCciw"
टाकलंय: https://www.goodreads.com/book/show/1...
Dipti wrote: "सॉरी अमेझॉन ची लिंक द्यायची होती तर परत गुडरिड चीच लिंक दिल्या गेली.. :-|https://www.amazon.in/Dhag-Uddhav-She..."
आता २ एडिशन्स झाल्या आहेत. पपेरबॅक आणि किंडल.
पपेरबॅक: https://www.goodreads.com/book/show/3...
किंडल: https://www.goodreads.com/book/show/1...
Book Name : व्यस्त ओढींचा त्रिकोण - (Vyast Odhincha Trikon)Author : कृ. भ. परांजपे (K.B.Paranjpe)
Publication: प्रतिक प्रकाशन
Category:कादंबरी
ASIN: B09TFRZMZK
Language: Marathi
Print length: 190 pages
Book overview :
The period from 1950 to 1964 in Hindi cinema is important and memorable for many reasons. Guru Dutt, a talented and classical artist, was making one beautiful, beautiful and innovative film after another during this period. These films were giving the audience a new perspective on human life. They had philosophical depth.
Guru Dutt as a master director drew crucial support from his wife Geeta Dutt for the songs, Waheeda Rehman for the acting prowess and Abrar Alvi as the writer. The movies were full of captivating stories, beautiful lyrics appropriate to the occasion, and songs that lingered in the mind. It was truly passionate film making.
This novel describes Guru Dutt's amazing professional journey and the emotional tug of war in his personal life.
@प्रणवकृपया वर दिलेलं पुस्तक ॲड कराल का?
पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी खालील लिंक चेक करा..
https://images.app.goo.gl/d1xow4YEkPb...
Free Fall ऍड केलंय: https://www.goodreads.com/book/show/2...Tanvi wrote: "नमस्कार प्रणव,
गणेश मतकरी यांचा ‘फ्री फॉल’ कथासंग्रह add करू शकता का? Amazon ची link share केलीय:
Free Fall - फ्री फॉल https://amzn.eu/d/4Vz4gfl
धन्यवाद!"
ऍड केलंय: https://www.goodreads.com/book/show/2...Dipti wrote: "Book Name : व्यस्त ओढींचा त्रिकोण - (Vyast Odhincha Trikon)
Author : कृ. भ. परांजपे (K.B.Paranjpe)
Publication: प्रतिक प्रकाशन
Category:कादंबरी
ASIN: B09TFRZMZK
Language: Marathi
Print length: 190..."
नमस्कार प्रणव कृपया खालील पुस्तकाची गुडरिड वर नोंद कराल का ?
नाव गोतावळा
लेखक आनंद यादव
अमेझॅान वरील लिंक पाठवत आहे
Gotavala https://amzn.eu/d/3xtt03Q
Hii Pranav,रा. रं. बोराडे लिखित पाचोळा गुडरिड्सवर ॲड करायची होती..
कादंबरीचे नाव: पाचोळा
लेखक : रा. रं. बोराडे ,
आवृत्ती :१९७१.
पृष्ठ संख्या : ११०
प्रकाशन : मौज, मुंबई.
Pachola https://g.co/kgs/8Eug94A
https://www.loksatta.com/lokrang-news... जगण्याचा पन्नाशीपार पाला‘पाचोळा’!
Hi Dipti, ही आहे कादंबरी GR वर आधीच. https://www.goodreads.com/book/show/4...
त्याचं नाव वेगळं spelling वापरून लिहिलेलं आहे म्हणून सापडली नसावी तुम्हाला.
Book Name: खुलूस Author: समीर गायकवाड
ISBN: 978-3-92374-67-8
Binding Type: Paper Back
Pages : 196
Categories: सामाजिक
Book Discription:
रेडलाइट एरिया म्हटलं की, अनेकांची नाकं मुरडली जातात…. ‘कुलटा’, ‘किटाळ’, ‘वेश्या’, ‘रंडी’… असे अनेक शब्द वापरून तिथल्या स्त्रियांना हिणवलं जातं. पण व्यापकदृष्ट्या, समाजाच्या वासना शमवणाऱ्या या स्त्रियांच्या नशिबी काय येतं… दुःख- दैन्य आणि नरकासम भोगवटा !
अशी अनेक आयुष्यं जवळून बघितलेल्या समीर गायकवाड यांनी या स्त्रियांनाच या पुस्तकाच्या नायिका केलं आहे. त्यांनी या स्त्रियांची घुसमट, त्यांच्या इच्छा-आकांक्षा, त्यांची परिस्थिती- शरणता, हतबलता, त्यांचे हुंकार, त्यांच्या आर्त हाका, त्यांच्या भावभावना आणि त्यांची तगमग हे सारं या पुस्तकात संवेदनशीलरीत्या टिपलं आहे.
खुलूस म्हणजे निर्मळ सच्चेपण, आस्था आणि निष्ठा… या स्त्रियांचं जगणं त्याच सच्चेपणाने चितारणारं हे पुस्तक…. रेड लाइट डायरीज… खुलूस !
Hi Pranav..धनंजय कीर यांनी लिहिलेलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तक ॲड कराल का?
मराठी अनुवाद लेखकांच्या प्रोफाइल वर दिसत नाहीय..
Dr Babasaheb Ambedkar (Marathi Edition) eBook : Keer, Dhananjay: Amazon.in: Kindle स्टोर
https://www.amazon.in/-/hi/Dhananjay-...
pls add book discription too.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः वाचून प्रशंसा केलेले, बाबासाहेबांच्या हयातीत प्रथम प्रकाशित झालेले त्यांचे साधार चरित्र.
एवढी तेवढी प्रतिकूलता कोणाच्याही वाट्याला कधीमधी येते. पण जन्माबरोबरच प्रतिकूलता डोंगरासारखी पुढ्यात हजर असलेल्या माणसाने काय करावे? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात प्रतिकूलतेने जे तांडव घातले ते पचवून बाबासाहेब माणूस म्हणून प्रस्थापित झाले, चैतन्याने लक्षलक्ष उजळून निघाले. ती दीप्ती अशी अभिनव होती की तिने बाबासाहेबांच्या कोटीकोटी बांधवांना जागृत करून ‘मदायत्तं तु पौरुषं’चा मंत्र त्यांच्या प्राणांत भरला आणि त्यांना माणूस म्हणून जगायला शिकवले. ती अद्भुत कहाणी प्रत्यक्षात कशी घडली याची रोमांचकारी हकीकत या महाचरित्रात संयमशील समरसतेने सांगितलेली आहे. चरित्रनायकाचे प्रसाद्पूर्ण दर्शन झाल्याचे समाधान चरित्रकार धनंजय कीर यांच्या शब्दांतून मिळते.
@Dipti, हे मूळ पुस्तकाच्या वेगळ्या आवृत्तीमध्ये (edition) सापडलं: https://www.goodreads.com/book/show/4...
@Pranav Hii..विलास मनोहर लिखित नेगल भाग 1 अन् नेगल हेमलकशाचे सांगाती भाग2 हि दोन्हीही पुस्तक इथे सापडत नाहीयेत..
प्लीज काही मदत करु शकाल का?
नेगल १Language: मराठी
Author: विलास मनोहर
Category: प्राणीविषयक, अनुभव कथन, निसर्ग विषयक
Publication: ग्रंथाली
Pages: 113
Weight: 213 Gm
Binding: Paperback
Summary of the Book
गडचिरोली जिल्ह्यात खोल जंगलात आदिवासींसाठी काम करताना डॉ. प्रकाश आमटे व विलास मनोहर यांनी विरंगुळा म्हणून वन्य प्राणी बाळगले-वाढवले. त्याचीच ही लोकविलक्षण कहाणी.
https://www.bookganga.com/eBooks/Book...
नेगल २हेमालाकशाचे संगती
Language: मराठी
Author: विलास मनोहर
Category: प्राणीविषयक, अनुभव कथन
Publication: ग्रंथाली
Pages: 86
Weight: 180 Gm
Binding: Paperback
Summary of the Book
पशू, पक्षी, प्राण्यांच्या अद्भूत आणि अजब विश्वात घेऊन जाणारं हे आगळवेगळ लेखन. डॉ. प्रकाश आमटे आणि विलास मनोहर यांनी संगोपन केलेल्या वन्य प्राण्यांच्या कहाणीचा हा दुसरा भाग आहे. येथे नेगली भेटते ती बाळंत झालेली. तिच्याबरोबर हेमलकशात राहणारे आणखीही प्राणी भेटीला येतात. मगर, सिंह, बिबट्या, विषारी-बिनविषारी साप, घुबड-सर्पगरुड, सरडे, अजगर, नीलगायी, खारी, कोल्हे, तरस, अस्वलं, नाग, साप, सायाळी, माकडं, खवल्या मांजर अशा कितीतरी प्राण्यांनी ही दुनिया रंगीत झाली आहे. या प्राण्यांचं गुण्यागोविंदान राहण, त्यांचं खाणं, त्यांचे आजार, मादिंच गर्भारपण असं वेगळंच चित्तथरारक विश्व वाचकासमोर उलगडत जातं. या रोमहर्षक अनुभवांतून साकारलेलं हे पुस्तक हेमलकशाच्या प्रकल्पाचं महत्वही अधोरेखित करतं.
https://www.bookganga.com/ebooks/Book...
Hi Pranav! आजच या पोस्ट कडे लक्ष गेलं. बऱ्याच दिवसापासून एका पुस्तकाच्या विवरणाबद्दल दुरुस्ती करण्यासाठी मदत शोधात होतो. पुस्तकाची लिंक आणि डीटेल्स खाली देत आहे:
नागपूरकर भोसल्यांची बखर
ISBN no: 9788194276753
Edition: Paperback
Pages: 213
Published by: Nov 2019 by Varada Prakashan Pvt. Ltd.
Author(s): Vaman Daji Oak
Edition language: Marathi
Hey Pranav,please add this book..
कार्लसनची जलपरी आणि विलक्षण गूढकथा (Marathi Edition)
Written by विजय देवधर
ASIN: B087C7CLJY
Publisher: Chandrakala Prakashan; 1st edition (19 April 2020)
Language: Marathi
Print length: 167 pages
Book Overview
ज्या विलक्षण घटनेची अद्भूत हकीकत मी इथे तुम्हाला सांगणार आहे, ती आफ्रिकेमध्ये माझं वास्तव्य होतं तेव्हा घडली. ही चमत्कारिक कहाणी सांगण्यापूर्वी काही गोष्टींचे समीकरण देणं आवश्यक ठरेल. ही घटना जेव्हा घडली त्या काळी आफ्रिका खंडामधले अतिदूरचे विस्तीर्ण जंगल प्रदेश अनेक अंधविश्वासांच्या जबरदस्त प्रभावाखाली होते. कित्येक आदिवासी जमातींमध्ये वेगवेगळे विचित्र समज होते.
जारण-मारण आणि तंत्रमंत्र विद्या जाणणारे मांत्रिक, आफ्रिकन ‘जूजू’ जादू करणारे जादूगार यांना स्थानिक अफ्रिकन्स भयंकर भीत असत. कित्येक मांत्रिकांना रात्रीच्या काळोखात आपल्या इच्छेनुसार कोणत्याही हिंस्त्र, वन्य प्राण्याचं रूप धारण करता येतं; आणि सकाळ झाली की ते आपल्या मूळ मानवी स्वरुपात परत येऊ शकतात, असा एक समज तिथे फार दृढपणे रुजलेला होता.
भारतात आणि आफ्रिका खंडात नोकरीनिमित्त राहिलेल्या ब्रिटिश अधिका-यांना आलेले काही ’विलक्षण गूढ’ अनुभव या कथांमधून वाचायला मिळतात. अदभूत असल्या- तरी या ’सत्यकथा’ आहेत!
for further details please check the link below
https://amzn.in/d/1fASHwL
@Diptiनेगलच्या नोंदी दुरुस्त केल्यात:
https://www.goodreads.com/book/show/2...
https://www.goodreads.com/book/show/3...
@Rahul,Updated https://www.goodreads.com/book/show/2... with details from Amazon. Couldn't update page count because of lack of evidence.
Hey hi Pranav,pls हृषिकेश गुप्ते यांच अंधारवारी हे पुस्तक चेक कराल का? ते इथे दोनदा ॲड झालं आहे वाटत.. कदाचित merge करावं लागेल.
2 वेगवेगळ्या इंग्रजी स्पेल्लिंग मुळे गडबड झाली होती. मराठी नाव ठेवलं आणि दोन्ही प्रोफाईल्स जोडल्यात आता.
Book Name : Kedarnath 17 June ( केदारनाथ १७ जून )Author :Prakash Suryakant Koyade
ISBN No. :9789394266186
Publisher :Ellora Publications
Binding :paperback
Pages :376
Language :Marathi
Edition :2023
तो गिधाडाकडे पाहात राहिला... अगदी शेवटपर्यंत ! नदीमध्ये अडीच - तीन वर्षाच्या बाळाच्या हाडांच्या सांगाडा पाण्यावर हेलकावत होता ! सिद्धार्थने सर्रर्रकन आपली नजर वळवली... त्याच्या बाजूला मूल कधी येऊन थांबलं होतं याचंही त्याला भान नव्हतं. मुलगाही त्या हाडाच्या सांगाड्याकडे पाहात असावा. सिद्धार्थ गुडघ्यावर बसला. दोन्ही हातांनी त्याचे खांदे धरले आणि मुलाच्या डोळ्यात खोलवर बघत म्हणाला, भीती वाटतेय ? मुलाने मान हलवून होकार दिला.
त्याच्या नजरेला नजर भिडवून सिद्धार्थ आत्मविश्वासाने म्हणाला, घाबरू नकोस... जोपर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत ही गिधाडे जवळ येत नसतात ! ते आपल्या मरणाची वाट पाहत घिरट्या घालत आहेत, म्हणूनच आपण मरायच नाही...
आपल्याला जिवंत रहावंच लागेल !
एका सत्य घटनेवर आधारीत कादंबरी केदारनाथ १७ जून !
Book Name : Kedarnath 17 June ( केदारनाथ १७ जून )Author :Prakash Suryakant Koyade
ISBN No. :9789394266186
Publisher :Ellora Publications
Binding :paperback
Pages :376
Language :Marathi
Edition :2023
तो गिधाडाकडे पाहात राहिला... अगदी शेवटपर्यंत ! नदीमध्ये अडीच - तीन वर्षाच्या बाळाच्या हाडांच्या सांगाडा पाण्यावर हेलकावत होता ! सिद्धार्थने सर्रर्रकन आपली नजर वळवली... त्याच्या बाजूला मूल कधी येऊन थांबलं होतं याचंही त्याला भान नव्हतं. मुलगाही त्या हाडाच्या सांगाड्याकडे पाहात असावा. सिद्धार्थ गुडघ्यावर बसला. दोन्ही हातांनी त्याचे खांदे धरले आणि मुलाच्या डोळ्यात खोलवर बघत म्हणाला, भीती वाटतेय ? मुलाने मान हलवून होकार दिला.
त्याच्या नजरेला नजर भिडवून सिद्धार्थ आत्मविश्वासाने म्हणाला, घाबरू नकोस... जोपर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत ही गिधाडे जवळ येत नसतात ! ते आपल्या मरणाची वाट पाहत घिरट्या घालत आहेत, म्हणूनच आपण मरायच नाही...
आपल्याला जिवंत रहावंच लागेल !
एका सत्य घटनेवर आधारीत कादंबरी केदारनाथ १७ जून !
Hi @Pranav,pls add this book..
for more information please check the link below
https://akshardhara.com/products/9789...
Books mentioned in this topic
Avakali Pavasachya Daramyanchi Goshta (other topics)Kedarnath 17 June (other topics)
इवान (other topics)


