The farmstead looked as if it was unwell… Everything looked barren – not a single tree, nor anthill, nor an outcrop… How would cattle come there, or any children? Come on! Enough is enough. Better not stay here any longer. Let me gather all that is mine and move, From one moor, to another. Looking for a farmstead. There is nothing here to hold me back.
Yadav was one of the early writers of Marathi Gramin Sahitya (literature pertaining to rural life in Maharashtra). His novel "Zombi" (झोंबी) (meaning “fight against all odds”) won a Sahitya Akademi Award in 1990.The novel is an autobiographical story of a young boy, his loving mother,his life of utter poverty, and his eagerness to receive education. Yadav wrote three sequels to autobiographical "Zombi" (झोंबी): "Nangarani" (नांगरणी) (meaning “cultivation of the soil”), "Gharabhinti" (घरभिंती ) (meaning “housewalls”), and "Kachawel" (काचवेल) (meaning “a vine of pieces of glass”)
३० नोव्हेंबर १९३५ रोजी त्यांचा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे जन्म झाला होता. आनंद यादव यांनी कोल्हापूर व पुणे येथून आपले शिक्षण पूर्ण केले. आकाशवाणीत त्यांनी काही काळ नोकरी केली. पुणे विद्यापीठात प्रपाठक म्हणून नियुक्ती झाल्यावर तेथेच मराठी विभाग प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले.
मराठी साहित्यातील ग्रामीण संबंध अधिक ठळक करण्यासाठी ज्या साहित्यिकांची नावे आवर्जून घ्यायला हवीत, अशांच्या यादीत यादव आपोआप जाऊन बसले. स्वातंत्र्यपूर्व काळातील ग्रामीण साहित्यापेक्षा यादवांच्या पिढीतील लेखन वेगळे होते, कारण त्यात वास्तवतेचे भान होते. ग्रामीण निसर्गवर्णनापेक्षा, तेथील जगण्याला असलेली दु:खाची किनार आणि दाहकता आहे.
नटरंग या कादंबरीवर त्याच नावाचा मराठी चित्रपट निघाला होता.
‘ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या’ आणि ‘मराठी साहित्य : समाज आणि संस्कृती’ यांसारख्या पुस्तकांच्या रूपाने समीक्षालेखनही केले. चार कवितासंग्रह, दहा कथासंग्रह, पाच लेखसंग्रह, सात कादंबऱ्या, आत्मचरित्राचे चतुष्टक, आठ समीक्षात्मक पुस्तके असे लेखन त्यांच्या नावावर जमा झाले. विविध ठिकाणच्या पाच ग्रामीण साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद यादव यांना मिळाले. मध्यमवर्गीय संवेदनांच्या बाहेर जाऊन साहित्यात नंतर येऊ घातलेल्या दलित साहित्याला यादव यांच्यासारख्या लेखकांनी मार्ग दाखवण्याचे काम केले. महाबळेश्वर येथील अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाल्यानंतरही त्यांच्या ‘संतसूर्य तुकाराम’ या कादंबरीतील कल्पनाविलासाला जाहीरपणे विरोध झाला. तो एवढय़ा टोकाचा होता, की त्यामुळे यादव यांना 2009 संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवता आले नाही.
हे पुस्तक 1971 म्हणजे 50 वर्षा पूर्वी लिहिलंय. ज्यांनी ग्रामीण जीवन जवळून बघितलंय आणि जनावरांवर जीव लावलाय त्यांच्यासाठी हे पुस्तक जवळच वाटेल. भाषा कोल्हापूर ची त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र सोडून इतर भागातील लोकांना कदाचित वाचायला जड जाईल. नवीन आवृत्ती मध्ये अवघड शब्दांची उकल प्रकाशकाने घालायला हरकत नाही.
केवळ कथा म्हणून वाचत गेलात तर कदाचित तुम्हाला एवढी रुचणार ही नाही पण पुस्तकाचं आजच्या काळातील परिस्थिती वर मंथन केलं तर 50 वर्षांनी फार काही बदललं जाणवणार नाही. पुस्तकात ट्रॅकटर आल्याने मुकी जनावर गेली आणि त्याना सांभाळणारा घर गडी पण बेरोजगार झाला. अत्ता सुद्धा फार काही बदल नाही नवनवीन तंत्रज्ञान आल्याने जुनी लोक बेरोजगार होत आहेत आणि होत राहतील. सध्या जागतिकीकरण करताना नवीन स्वीकारावेच लागेल. फक्त आजच्या पिढीला हे पुस्तक एवढंच सांगेल की नवं घेताना जुन्यात काही जणांच्या भावनांवर पाय द्यावाच लागतो. बेरोजगार होणार्यांना कळून चुकेल की हा नवा पायंडा नसून आपण हे स्वीकारत आलोय आणि आपल्याला त्या अनुरूप बदलायला हवं.
Based on changing village life. Novel is about a Man named 'Narayan 'and all animals in the farm. Language is little bit tough to understand but evrything written is true and heart touching!!!