“प्रत्येक वाईट परंपरेला आपला जुना-पुराणा धर्मच कारणीभूत आहे, असं पावसाळ्यातल्या बेडकांप्रमाणे डराव-डराव करून सांगणाऱ्या आमच्या बुद्धिजीवींना खरा इतिहास ठाऊक तरी आहे का? युरोपमध्ये यंत्रयुग आलं, त्यांनी मोठाली जहाजं बांधली आणि ते आपल्या धर्माच्या प्रचारासाठी नव्या नव्या खंडांचे शोध लावत निघाले. मुद्रणकलेचा शोध लावून ज्ञानप्रसार करू लागले. त्या वेळी संपूर्ण भारतावर मुस्लिमांचं राज्य होतं ना? देशातली सगळी संपत्ती आपल्या जनान्यावर उधळत ते केवळ भोग घेत आयुष्य जगत होते, देशातील स्थानिक लोकांचं धर्मांतर करत होते, त्यांची देवळंच नष्ट करत होते असं नव्हे, नालंदा-तक्षशीलासारख्या ज्ञानकेंद्रांनाही धुळीला मिळवत होते. विद्वानांना भोसकून ठार करत होते, देशोधडीला लावत होते. तिथली ग्रंथसंपदा जाळून खाक करत होते. भारताच्या मागासलेपणाचं खापर कधी काळच्या धर्मपरंपरेवर फोडून त्याचाच प्रचार करण्यापेक्षा गेल्या हजार वर्षांमध्ये हा देश सर्व अर्थानं पौरुषहीन करणाऱ्यांचा उल्लेखही का केला जात नाही?”
―
S.L. Bhyrappa,
आवरण [Awaran]