“त्यो मळ्याकडं गुतला असंल.’ ‘पोटाला पोर न्हाई तर ही मिजास!’ सखा खोत उसळला. ‘कुणाच्या मढ्यावर...’ पण सखा खोताला ते पुरं करता आलं नाही. पाटलाच्या नजरेकडे पाहून ते तसेच राहिलं. पाटील म्हणाला, ‘देवाच्या पोळीवर बसून चांगलं बोलावं. झालं नवं पाणी घालून! मग आता चला घरला. देवानं गाऱ्हाणं ऐकलं तर ईल पाऊस.’ ‘पाऊस पडंलबी!’ चिंतू गुरव म्हणाला, ‘पन पीकपाणी येईपातूर मानसं जगनार कशी? त्याचा कुणी ईचार केलाय काय?’ ‘मामलेदारानं परवाच सांगितलं नवं! रेशिंनगचं दुकान उघडतो म्हनून!’ सरपंचानं धीर दिला. ‘व्हय्! पन आज कुनाच्या घरात दाणा हाय! आणि रॅशिंनग आलं तरी ते घ्यायला पैका कुणाच्या कनवटीला हाय! बोला की...’ एकजण म्हणाला. ‘गाडीला मतं दिली असतीसा तर ही पाळी आली नसती.’ काळू साळोखे खाकरत उभा राहिला. ‘आज पंडितजी पायजे व्हते. आता जन्तेची काळजी ऱ्हाईली न्हाई. गेलं ते दिस. गाडीला मत दिलं असतंसा तर...’ ‘ए! गाडीच्या! बस गप!’ पाटलांनी आवाज टाकला. ‘निवडणूक झाली. ते तुनतुनं आता चालवू नगंस.’ ‘पण... पाटील...’ ‘गप बस म्हनतो न्हवं!’ पाटलाने दटावलं. काळू साळोखे उठला तसा बसला. सारे हसले. ‘पाटील, मग काय करुया म्हंता? काय तरी करायला पायजे. न्हाई तर गाव वाचायचं न्हाई.’ ‘मी कोण सांगनार? मी नावाचा पाटील. तुम्ही गावचं सरपंच!’ ‘असं कसं... असं कसं... तुम्ही वडीलधारी मानसं. तुमीच तोड काढली पायजे. पाटील ते पाटीलच.’ सरपंच म्हणाला. पाटलाला काय सांगावं हे सुचत नव्हतं. सारे”
―
आलेख [Aalekh]
Share this quote:
Friends Who Liked This Quote
To see what your friends thought of this quote, please sign up!
0 likes
All Members Who Liked This Quote
None yet!
This Quote Is From
Browse By Tag
- love (101910)
- life (80594)
- inspirational (76760)
- humor (44687)
- philosophy (31520)
- inspirational-quotes (28789)
- god (27027)
- wisdom (24952)
- truth (24942)
- romance (24594)
- poetry (23657)
- life-lessons (22793)
- quotes (21242)
- death (20737)
- happiness (19018)
- hope (18787)
- faith (18601)
- inspiration (17924)
- spirituality (15956)
- motivational (15906)
- relationships (15856)
- religion (15506)
- life-quotes (15399)
- writing (15052)
- love-quotes (14956)
- success (14216)
- motivation (13918)
- time (12967)
- motivational-quotes (12227)
- science (12217)

![आलेख [Aalekh]](https://i.gr-assets.com/images/S/compressed.photo.goodreads.com/books/1487877151l/34382284._SY75_.jpg)