1942 साली दुसऱ्या महायुद्धात पाठिंबा दिल्यामुळे त्या वेळच्या ब्रिटिश प्रधानमंत्री चर्चिल यांनी जीनांना पाकिस्तान बक्षीस म्हणून देण्याचे वचन दिले होते अशी अफवा होती. तसे अनेक संदर्भ इतिहासात सापडत असले तरी त्यांच्यात तसा करार झाल्याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. स्वातंत्रपूर्व ब्रिटीश भारताच्या सशस्त्र सैन्यात सुमारे 50% लोक मुस्लिम होते यावरून चर्चिल यांना मुस्लिम लीगच्या पाठिंब्याची किती गरज होती हे समजून येईल.