इतिहासातील अनेक गोष्टी आपल्यासारख्या सामान्य माणसाला माहित नाहीत किंवा एकाच बाजूने होणाऱ्या प्रचारामुळे आणि सतत सांगितल्या जाणाऱ्या अर्धसत्यामुळे त्या गोष्टी काळाच्या पडद्याआड जात आहेत. उदाहरणच सांगायचे तर गांधीजी मरताना ‘हे राम’ म्हटले नव्हते, असा नथुरामवाद्यांकडून केला जाणारा प्रचार किंवा पाकिस्तानला 55 कोटी द्यायला भाग पाडले म्हणूनच नथुराम गोडसेने गांधीजींना मारले हा तर्क इ. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नथुरामवाद्यांचे तर्क वरवर पटण्यासारखे वाटतात, पण इतिहासाची व्यवस्थित पडताळणी केल्यावर सत्य समोर येते. या विषयावर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत, पण क्लिष्ट, जाडजूड आणि संदर्भांनी भरपूर वेळखाऊ पुस्तके वाचणार कोण? याउलट व्हाट्सअपवर आलेला एखादा मेसेज लोकांप
आजच्या काळात गांधी बद्दल बऱ्याच काही चुकीच्या गोष्टी समाजमाध्यमांमध्ये फिरत असतात. आतापर्यंत ज्या थोर लोकांची हत्या झाली त्यांच्या हत्यारांना कोणी फारसे ओळखत नाही वा त्यांच्या बद्दल चर्चा होत नाहीत परंतु भारताचे राष्ट्रपिता असलेले गांधीजी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे आजही बऱ्याच लोकांना नायक वाटतो. गांधींना प्रतिनायक करण्यासाठी ज्या माहितीचा वापर केला जातो त्याचा समाचार लेखकाने घेतला असून त्यातील बरेच मुद्दे पुराव्यानिशी खोडून काढले आहेत. जसे की महात्मा गांधींनी मरण्यापूर्वी हे राम म्हंटले होते का नाही, भारताच्या फाळणीत गांधींचा सहभाग, मुस्लिम तुष्टीकरण, पाकिस्तानला 55 कोटी देण्यासाठी केलेले उपोषण, गोडसे आणि इतर जणांनी केलेला हत्येचा कट, लाल किल्ल्यातील सुनावणी आणि त्याचा निष्कर्ष, कपूर कमिशन वगैरे. गांधीजी तसेच इतर कोणी थोर व्यक्ती परिपूर्ण कधीच नसतो, प्रत्येकात उणिवा आणि दोष असतात पण आपण त्यांचे चरित्र आणि केलेले बहुमूल्य कार्य न पाहता फक्त काही मुद्यांवर आक्षेप घेत एका महापुरुषाची बदनामी करतो हे निंदनीय आहे.