८ ऑगस्ट १९४२ ला त्यांनी 'करा किंवा मरा' चा मंत्र दिला. गांधीजींसोबत काँग्रेस नेत्यांना अटक झाली. गांधींच्या डावपेचाने मुस्लिम लीगच्या हातात आयते कोलीत मिळाले आणि काँग्रेस नेते मोक्याच्या क्षणी राजकीय व्यासपीठावरून दूर झाले. ते तुरुंगात असताना, त्यांच्या मुस्लिम प्रतिस्पर्ध्यांनी ब्रिटनला युद्धात पाठिंबा दिला. तत्कालीन हिंदुत्वादी संघटनांनी सुद्धा जीना आणि इंग्रजांना पाठिंबा दिला.