प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या गोष्टीवरुन तरी गांधीजींनी ‘हे राम’ म्हटले होते हे सिद्ध होते. उलट बाजूचे तर्क अलीकडच्या काळातले आहेत. जर तुम्हाला कुणी गांधीजींच्या मृत्यूनंतर चार तासांत नोंदवलेल्या FIR वर किंवा प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्याऐवजी त्यांच्या मृत्यूनंतर २३ वर्षांनी मांडलेल्या तर्कावर विश्वास ठेवायला सांगितला तर तुम्ही काय कराल?