काँग्रेसच्या नेत्यांना लोकभावनेचा आदर करावा लागला होता. जनमानसातील फाळणी बद्दलची भावना इतकी तीव्र होती की त्याला दुसरा पर्याय नव्हता. स्वातंत्र्याची चाहूल लागल्यानंतर दोन्ही गटात हिंसाचार सुरु झाला होता. अजून भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा पण झाली नव्हती तेंव्हा जातीय दंगली पेटू लागल्या होत्या. गांधीजी भारताच्या विविध भागात जाऊन हिंसाचार कमी करण्याचा प्रयत्न करत असताना, त्यांचा पट्टशिष्य असलेल्या नेहरूंनी शेवटी भूमिका बदलली. "मलम घेऊन फिरत भारताच्या अंगावरील फोड एकामागून एक बरे करण्याऐवजी, फोड फुटण्याच्या कारणाचे निदान करून संपूर्ण शरीराच्या उपचारात भाग घ्यायला हवा." पटेल आधीच फाळणीसाठी अनुकूल
...more