‘सारे जहाँसे अच्छा’ हे गाणं लिहिणारे कवी ‘मोहम्मद इक्बाल’ यांनी 1930 साली पहिल्यांदा मुस्लिमांसाठी स्वतंत्र देश असावा अशी संकल्पना मांडली. पुढे 1937 साली झालेल्या अहमदाबाद येथील हिंदू महासभेच्या खुल्या अधिवेशनात सावरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात असे सांगितले होते की, ‘भारत आज एकतावादी व एकसंघ राष्ट्र म्हणून म्हणून गृहीत धरला जाऊ शकत नाही. याउलट तिथे दोन राष्ट्रे आहेत हिंदू आणि मुस्लिम.’