तत्कालीन स्वातंत्र्यपूर्व भारतातील हिंदू आणि मुस्लीम जातीय राजकारणाचे निरीक्षण मांडताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खालील मत नोंदवले होते. “हे आश्चर्य वाटण्यासारखे आहे की सावरकर आणि श्री जीना यांच्यात एक राष्ट्र विरोधात दोन राष्ट्रांच्या मुद्द्यावर एकमेकांचा विरोध करण्याऐवजी पूर्ण सहमती आहे. दोघेही सहमतच नाहीत तर आग्रह धरत आहेत की भारतात दोन राष्ट्रे आहेत. एक मुस्लिम राष्ट्र आणि दुसरे हिंदू राष्ट्र. ज्या शर्तींवर ही दोन्ही राष्ट्रे जगली पाहिजेत त्या केवळ भिन्न आहेत. श्री जीना म्हणतात की भारताचे दोन तुकडे केले पाहिजे, पाकिस्तान आणि हिंदुस्थान, मुस्लिम राष्ट्राने पाकिस्तानवर कब्जा केला
...more