मार्च १९४२ मध्ये जपानी शाही सेना भारताच्या वेशीवर होती, दबावाखाली असलेल्या चर्चिलने नवी दिल्लीला प्रस्ताव पाठवला. जपानच्या पराभवानंतर भारतीयांना स्वातंत्र्य, अधिराज्याचा दर्जा दिला जाईल असे वचन भारतीयांनी दिले गेले. तथापि, मुस्लिम लीगच्या इस्लामिक राज्यासाठी वाढत्या मागणीला मान्यता देण्याची तरतूद त्या प्रस्तावामध्ये होती. गांधींनी त्या प्रस्तावाला विरोध केला आणि भारताला तात्काळ स्वातंत्र्य द्यावे ही मागणी केली. 'चले जाव' चळवळीची सुरुवात झाली आणि