Nikhil Asawadekar

4%
Flag icon
नथुराम गोडसेने जे केले ते योग्यच केले, असा मानणारा एक समाज भारतात होता. पण आता तसे मानणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे राजकीय पक्षांद्वारे केला जाणारा अपप्रचार मानता येईल. या सर्व प्रचाराचे उगम प्रदीप दळवी यांच्या ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकांपर्यंत आणि गोपाळ गोडसेच्या ‘पंचावन्न कोटींचे बळी’ या पुस्तकापर्यंत जाऊन पोहोचतात. योग्य शहानिशा केल्यावर नाटकात किंवा पुस्तकात केलेले दावे कसे फोल आहेत हे लगेच कळून येते. वरील नाटकाची आणि पुस्तकाची समीक्षा मराठीत य. दि. फडके यांनी आधीच करून ठेवली आहे. त्यांनी 'नथुरामायण' या पुस्तकात, सर्व दावे आणि तर्क सप्रमाण खोडून टाकले आहेत. या ...more