पुढें जेव्हां ते महाअरी आपल्या शूद्र बांधवांस भटांच्या हातांतून सोडवावें म्हणून भटांवर हमेशा हल्ले करूं लागले, तेव्हां एकंदर सर्व भट, शूद्रांचा इतका द्वेष करूं लागले कीं ते शूद्र शिवलेलें अन्नसुद्धां खाईनासे झाले. व त्याच द्वेषावरून हल्लींचे भट शूद्र शिवलेलें अन्न तर काय; पण ते शूद्र शिवलेलें पाणीसुद्धा पीत नाहींत.

